×

सनरायझर्स हैदराबादची आघाडी! आयपीएल २०२२ साठी लॉन्च केली जर्सी; सात वर्षांनी केला बदल

सनरायझर्स हैदराबादची आघाडी! आयपीएल २०२२ साठी लॉन्च केली जर्सी; सात वर्षांनी केला बदल

[ad_1]

जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम (आयपीएल २०२२) (IPL 2022) मार्च महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, खेळाडूंचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) १२ व १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे आयोजित केला गेला आहे. या लिलावात सर्व संघ आपल्या संघाची बांधणी करतील. त्याचवेळी, २०१६ आयपीएल विजेता संघ सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आगामी हंगामासाठी त्यांनी आपली जर्सी प्रसिद्ध केली आहे. आपल्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी ही माहिती दिली. (SRH New Jersey)

सनरायझर्सची नवीन जर्सी लॉन्च

आयपीएलच्या प्रमुख संघांपैकी एक असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने बुधवारी (९ फेब्रुवारी) आयपीएल २०२२ साठी आपली अधिकृत जर्सी लॉन्च केली. तब्बल सहा वर्षानंतर त्यांनी आपल्या जर्सीमध्ये महत्त्वाचा बदल केला. ऑरेंज आर्मी (Orange Army) या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने यावेळी आपल्या जर्सीमधून सोनेरी रंग पूर्णपणे हटविला आहे. यावेळी त्यांची जर्सी ही केशरी व काळ्या रंगाची असेल. तर, ट्राऊजर पूर्णपणे केसरी रंगाचा दिला आहे.

तीन खेळाडूंना केले आहे रिटेन

सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२२ पूर्वी केवळ तीन खेळाडूंना रिटेन केले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार असलेला केन विलियम्सन (Kane Williamson) याला १५ कोटी रुपयांमध्ये संघाने रिटेन केले. तोच या संघाचे नेतृत्व करताना दिसेल. त्याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीरचे दोन युवा खेळाडू अष्टपैलू अब्दुल समद व वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांना प्रत्येकी ४ कोटी रुपये देत संघाने आपल्या ताफ्यात कायम ठेवले आहे.

याबरोबर संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये देखील मोठा बदल झाला आहे. टॉम मूडी मुख्य प्रशिक्षकपदी कायम असून, मुथय्या मुरलीधरन देखील गोलंदाजी सल्लगाराच्या स्वरूपात संघाचा आणखी एक हंगाम भाग असेल. याव्यतिरिक्त ब्रायन लारा, डेल स्टेन व हेमांग बदानी बदानी संघाला यावेळी मार्गदर्शन करताना दिसून येतील.

[ad_2]

Post Comment