नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा! प्रदेशाध्यक्षपद सोडलं तरीही काँग्रेसमध्येच राहणार
[ad_1]
नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. आज पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला. यामागे काही महत्वाची कारणे आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना झाले असून ते आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या राजीनाम्याला याचीही किनार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
खरं तर, जेव्हा पंजाबमध्ये मंत्र्यांची नावे ठरवली गेली, तेव्हा राहुल गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी चर्चा करुन ठरवली होती. यात नवज्योतसिंग सिद्धू यांचा कुठेही समावेश नव्हता. पहिल्या दिवसाच्या बैठकीत त्यांना निश्चितपणे बोलावण्यात आले होते. पण, जेव्हा राहुल गांधी शिमलाहून परतले तेव्हा सिद्धू यांना बैठकीत सहभागी करण्यात आले नव्हते. दुसरं कारण असेही मानले जाते की ज्या लोकांची नावे सीएम चन्नी यांनी निवडली मग डीजीपी असो किंवा अॅडव्होकेट जनरल यामध्येही सिद्धू यांचा विचार केला गेला नाही.
[ad_2]
Post Comment