Connect with us

देश

मिठबाव येथे ३०० वर्षांनंतर श्री देव रामेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सवाचा भव्य सोहळा

Published

on

Rameshwar mandir mithbav

देवगड तालुक्यातील मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या तीन गावांचे ग्रामदैवत असलेल्या मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात सुमारे ३०० वर्षांनंतर बुधवार, दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य आणि दिमाखदार त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पवित्र सोहळ्याचे औचित्य साधून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हजारो दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघणार आहे. भक्तिमय वातावरणात हा तेजस्वी सोहळा पार पडणार आहे.

वेळ कार्यक्रमाचे तपशील
सायं. ४:०० श्री देव रवळनाथ मंदिरातून श्री देव रामेश्वर मंदिराकडे सर्व देवतांच्या साज-शृंगारासह देवस्वारीचे आगमन
सायं. ६:३० ते रात्री ११:३० स्थानिक कलाकारांकडून सुश्राव्य भजने व गायन कार्यक्रम
सायं. ७:०० दीपोत्सवाचा शुभारंभ
रात्री ११:३० ते १२:०० भव्य पालखी प्रदक्षिणा सोहळा
रात्री १२:३० ते पहाटे २:३०

वारकरी दिंडी सोहळा

या त्रिपुरारी पौर्णिमेच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाने श्री देव रामेश्वर देवस्थान समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा वार्षिक उत्सव भक्तिभाव, ऐक्य आणि दैदिप्यमान वातावरणात साजरा होणार असून, गावातील सर्व नागरिकांनी या पवित्र सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, अशी विनंती देवस्थान समितीने केली आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या या मंगलदिनी सर्व श्रद्धाळूंनी श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन दीपोत्सवाचा नयनरम्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2021 Kokanshakti. Theme by MVP Themes, powered by WordPress.