Connect with us

ब्लॉग

कोकण्यांनू कृषी पर्यटनाकडे वळा

Published

on

अ‍ॅग्रो टुरिझम Agro Tourism

(सादर लेख हा मालवणी भाषेत लिहला गेला आहे.)
कोकणचो कॅलिफोर्निया होवक होयो म्हणान घोषणा झाले. पण प्रत्येक्षात मात्र शरद पवार साहेबांनी कोकणात १०० टक्के अनुदानावर फलोद्यान योजना राबवली आणि अनेकांना त्यांचो लाभ गावलो. त्याआधी बॅ. अंतुले सायबांनी कोकणात रस्त्यांच्या दुतर्फा आकेशिया, ऑस्ट्रेलियन वृक्ष सुरुची झाडा वगैरे लागवड कोकणात केली त्यामुळे रस्ते हिरवे गार दिसाक लागले. ह्या गोष्टींक आता बरोच काळ उलटानं गेलो. आता ही झाडा मोठी झाली लोकांनी तोडून सुद्धा नेली.

काही झाडा वादळ वाऱ्यांनी पडली. त्याचकाळात मृदसंधारण खात्यानं काजू लागवड मोठ्या प्रमाणात केली. त्येचीव चव आता जुनी झाली. मागे अनेक  योजना इले  नि गेले सुद्धा. पण त्या योजनांचो म्हणवो तसो प्रभाव दिसलो नाय. म्हणान आमी आजुनव इचारताव की, काय रे बाबानु, कोकणचो कॅलिफोर्निया केव्हा होतलो ? तर आता ह्या विषयावर कोणाचं बोलत नाय.

पूर्वी प्रत्येक पुढारी सांगायचो, आमी कोकणाचो कॅलिफोर्निया करून ईकास करणार. मग त्यासाठी वेग वेगळे परीषदो मुंबईत नाय तर मागे कोकणात भरवले जायचे. एका एका नेत्याची तसं तासांची भाषणा आयकाक खूप खूप बारा वाटायची. पन खरो कॅलिफोर्निया कसो असा ह्या आजुनव कोकणाच्या लोकांक चित्रफितीफितीतून दाखवला जायत नाय.

आमच्याकडे एक म्हण असा, ‘लंकेक सोन्याचे विटो गावतांत’ पन ते बगल्यान हतं कोनी ? कॅलिफोर्निया कोकणासारखो दिसता. त्येंच्यानी फळ फुला बागबगीच्यातून म्हणे आपला उत्पन्न वाढवला. सुजलाम सुफलाम केल्यानी. थंयसारच वातावरण नि हयसरचा वातावरण म्हणे सारख्याच असा. कोणीतरी खयतरी एखादो उद्द्योगपती नायतर नेतो फॉरेनाक जावन  इलो काय थंयसरची माहिती सांगता नि म्हणता आमच्याकडे असा होव शकता.

तेव्हा राज ठाकरे गुजरात दौऱ्यावर गेले होते. त्येंच्यांनी थंयच्या बऱ्याच उद्द्योग धंद्याक भेटी देवन ते महाराष्ट्रात का नाय असो प्रश्न केलो. थंयसरच्या अमूल डेरीच्या विकासाप्रमाणे महाराष्ट्रातल्या आरे ब्रॅंडचो विकास का झालो नाय? तर सहकारातला राजकारण. कोकणातलो माणूस मुंबयत कित्या धांवता? तर कोकणात कारखाने नाय. छोटे छोटे उद्योग नाय.

सगळ्यांनीच किराणा मालाची नि पानांच्या टपरेची दुकाना घातली तर गिऱ्हायक कोनाक म्हणान गावताला?   कारण कोकण्यात पिकणाऱ्या आंब्यावर, काजूवर, जांभळावर, रातांब्यावर, करंडीवर, प्रक्रिया करणारे सरकारी किंवा सहकारी पातळीवरचे उद्द्योग नाय.

आंबो पीकलोच तर दरवर्षी त्येच्यावर संक्रांत येताहा. मात्र गुजरात रत्नागिरीतलो कोकणी माणूस जावन अनेक प्रकारच्या कलमी आंब्याचा उत्पन्न एकरी १२ टन घेता. पण कोकणात जास्तीत जास्त ४ टन निघता. हेचो अभ्यास कोनी करायचो ? सर्व सामान्य शेतकरी थंयसार पोचू शकत नाय. राजस्थानात वेग्वेगळ्या प्रकारची वाईन मिळता. गोव्यात काजू फेणी खुले आम विक्री केली जात.

मग कोकणात त्येंच्यावर बंदी कीत्या ? कोकणात काजू फेणी आंबा वाईन, जांभूळ वाईन, कारखाने निघाले तर स्थानिक लोकांना रोजगार मिळात. पर्यटन उद्योगांक वाईन उद्द्योगामुळे बळ मिळात. द्रांक्षांच्या प्रदेशांत द्राक्षांत वाईन काढूक परवानगी मिळता. पण कोकणात साधी वाईन शॉपी दिसत नाय.

तर बियर शॉपी दिसतत. दुसऱ्यांची बिअर विकण्यापेक्षा कोकणचो कायतरी चांगली ब्रँड निर्माण होवाक होयो आणि तोच मोठ्या प्रमाणावर विकूक होयो. पण कोकणात सगळा गाडा सरकारी परवान्यांवर अडान बसलाहा.   

कोकणातल्या उद्योगांसाठी मध्यंतरी १:९ प्रमाणे भांडवल देण्याचे घोषणा झंझ=झाले. उद्योगांका सबसीडीद्वारे वीज आणि पाणी पुरवठो करण्याचे घोषणा झाले. पन कसला काय ? गुजरात राज्यात धडाधड उद्योग वाढले. मग महाराष्ट्रातले उद्योग वाढत का नाय ? उलट हजारो उद्योगधंदे बंद का पडतत ? तर म्हणे परवडत नाय.

अशा बंद पडलेल्या उद्योजकांका आणि व्यवसायिकांका विश्वासात घेऊन त्येंच्या समस्यांची चर्चा त्येंच्या जाग्यावर जावन करूंक होयी आणि केवळ सरकारी नियमांवर बॉट ठेवून न चालता काही नियम-अटी शिथिल करून असे उद्योग पुन्हा सुरु होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करूक होयी.

कारण आज तरुणांका नोकरीचे संधी खयसर द्यायचे ह्यो सरकारपुढे सगळ्यात मोठो प्रश्न असा. वाढणाऱ्या बेरोजगारीवर जलद उपाय योजना होवक होये.    मोठ्या मोठ्या कारखान्यांच्या उद्योगातून ५०० ते १००० लोकांका मिळू शकता. पण कोकणात जर कृषी पर्यटन करणारे छोटे छोटे १००० व्यवसाय उभारले तर किमान ५००० ते १०००० बेरोजगारांक रोजगार मिळू शकात.

कृषी पर्यटनासाठी छोट्या छोट्या बागांतुन पर्यटकांच्या राहण्याची, जेवणाची, नाष्टा, चहा – पाण्याची सोय केली. म्हणजेच त्याच जागेत नि त्याच बागेत दोन चार बेडरूम चे निवास व्यवस्था केले तर समुद्री पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनाकडे लोक वळतील.

त्याच बागेत त्येंका फिरवान आणायचा. बागेतल्या फळ फुलांची माहिती द्यायची. वनस्पतींची माहिती सांगायची. थंयसरचोच आंबो काढून त्येंका कोकणी पद्धतीने हातांच्या कोपरा पर्यंत रस गळापर्यंत खावंक लावायचो. मस्तपैकी रात्रीचो शेकोटीचो कार्यक्रम कारवायचो.

एखादी लोककला दाखवायची आणि मागे पारड्यातच फिरणाऱ्या कोंबड्याच्या किंवा कोंबडीच्या मागे लागून ती पकडून हाडायाची नि रात्री गरम गरम मटणाचो रसो वाढायचो. सकाळी कांदा पोहे, उपीट, घावणे, खपूरले, आंबोली, नाचणीचे शेवयो नि खोबऱ्याचो गोड रस, चटणी, भाकरीं चपाती, भाजी जेवणापूर्वी उकडीचे मोदक, वारं भात, माशाची आमटी, तळलेले मासे, सोरकुलातली माशांची आमटी, चुलीत भाजलेलो सुको मसो गोलम्याची चटणी वगैरे कोकणी मालवणी पदार्थांची रेलचेल असलेला जेवण दिसला तरी पर्यटक खुश होयत. पण त्याच बरोबर सर्व प्रकारची स्वच्छता ठेवचा काम आपणाक करूंक होय.   

अशा कृषी पर्यटन केंद्रासाठी किमान ५/१० गुंठ्यांपासून ते ५/१० एकरांपर्यंत जागा तरी हरकत नाय. कारण तुमच्याकडे जागा नसत तर गावातल्या ज्या शेतकऱ्याकडे अशा प्रकारची व्यवस्था असात थंयसून त्येंका फिरवून आणू शकतास.

गावातल्या नदीवर, गावातल्या डोंगरावर, गावातल्या मंदिरापर्यंत त्येंका फिरव शकतास.    मात्र सरकारान कृषी पर्यटन करणाऱ्यांसाठी ती जागा एन. ए. करण्याची अट कोकणासाठी शिथिल करूंक  होई. सौरऊर्जा व लाईट आकारणी घरगुती दरानं करूंक होई.

नायतर कायद्यात सगळा असला तरी एखादो आपल्या बागेत घर बांधीत असलो तरी त्येंका नियमांचे नोटीसही येततं. कृषी पर्यटनासाठी सगळे कर माफ करून होये. एकीकडे कृषी पर्यटनाक एन. ए. ची अट नाय म्हणून सांगितला जात असला तरी कृषी आणि पर्यटन हेंची शब्दफोड करून तुमी पर्यटन ह्यो व्यवसाय करतास म्हणान तुमका कर आकारणी केली  जाता.

कारण एमटीडीसीच्या ‘निवासी न्याहारी’ योजनांचा असाच झाला. त्येंका मगे सेल्स टॅक्स, लक्झरी टॅक्स, महसूल हेंच नोटिशीं येवक लागले. ‘निवासी न्याहरी योजना म्हणजे आपल्याच राहत्या घरात एखाद्या खोलीत पर्यटकांची केलेली राहण्याची व्यवस्था. पण त्यासाठी सुद्धा बेडरूम, अटॅच संडास बाथरूमची व्यवस्था पहिली जाता. त्याप्रमाणे कृषी पर्यटनात आपल्याच बागेत, आपल्याच नर्सरीत दोन चार बेडरूम निर्माण करून येणाऱ्या पर्यट्कांका निसर्गाच्या सानिध्यात दोन तीन दिवस घालवक द्यायचे.

अशाचप्रकारे कृषी पर्यटनटलो मामाचो गाव ही संकल्पना गावांनी राबवक हरकत नाय. दोडामार्ग तालुक्यातल्या डिंगने गावात तुमका ‘मामाचो गाव’ ही कृषी पर्यटनातली वेगळी संकल्पना बगूक गावातली. थंयसार बेडरूम वगैरे काय नाय, मामाच्या गावक गेल्यावर जसा तुमका ऱ्हावंक लागता तसाच ऱ्हावायचा आणि स्थानिक जेवणाचो फिरण्याचो लोककलांचो आस्वाद तुमि घ्यायचो.

ह्यो गाव गोवा हद्दीक लागण असल्याने आता थंयसार पर्यटक येवंक लागले. अशाच कृषी पर्यटनासाठी मुलांचे सहली आयोजित करून निसर्गातल्या झाडांची, फळांची, फुलांची माहिती देणे, त्येंचो नाष्टा चहा पाणी जेवणाची व्यवस्था केली तरी कृषी पर्यटनाक चालना मिळता.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुद्धा अशा निवास न्याहारी योजनांसाठी चांगली कर्ज योजना काढलेली हत . बँक ऑफ इंडियाकडे देखील अशा योजना हत. फक्त पर्वण्यांबाबतचे नियम/अटी शासनानं शिथिल करून कृषी पर्यटन व्यावसायिकांका कमीत कमी व्याजदराने आणि सवलतींचे, सबसिडीचे काही योजना लागू केल्या पाहिजेत.  

समुद्री पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनाचो वारो कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत व्हावक लागलो तर परदेशी पर्यटक सुद्धा गोव्याप्रमाणे कोकणात घुटमळुक लागलो काय तुमची आर्थिक कमाईची उंची वाढाक मदत होईल. फक्त सरकारनं जातीनिशी कृषी पर्यटनावर भर देवक होय ह्या निश्चित.  -चंद्रशेखर उपरकर 

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *