×

अय्यर-सिराजचे ‘झिंगाट’ थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन; पाहा मजेदार व्हिडिओ

अय्यर-सिराजचे ‘झिंगाट’ थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन; पाहा मजेदार व्हिडिओ

[ad_1]

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी देखील घेतली आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने केल्यानंतर संपूर्ण भारतीय संघ आनंद साजरा करत आहे. अशात भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (shreyas iyer) याने एक  खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मोहम्मद सिराज (mohammad siraj) सोबत डान्स करताना दिसत आहे.

भारतीय संघाचा दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) दिवशी सुरू झाला होता. पहिल्या सामन्यान संघातील सर्वांनी दिलेल्या योगदानामुळे दक्षिण अफ्रिकेला ११३ धावांनी पराभूत करता आले. भारताने सेंचुरियनमध्ये मिळवलेला हा पहिला कसोटी विजय असल्यामुळे संघातील खेळाडू उत्साहात आहेत. विजयानंतर जेव्हा भारतीय संघ त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा त्याठिकाणचा स्टाफ संघाच्या स्वागतासाठी बाहेर आला होता आणि खेळाडूंसोबत त्यांनी डान्स देखील केला. अशात विजयाच्या दुसऱ्या दिवशीही खेळाडूंचा उत्साह कमी झाल्याचे दिसत नाही.

श्रेयस अय्यरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ ३१ डिसेंबरलच्या रात्री शेअर केल्यामुळे चाहत्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. व्हिडिओत अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हॉटेमधील कर्मचाऱ्यासोबत पारंपारिक संगीतावर डान्स करताना दिसत आहेत. अय्यर आणि सिराजचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. काही चाहत्यांनी अय्यरला भारतीय संघाचा सर्वोत्तम डान्सर असेही म्हटले आहे. चाहते अय्यरच्या या पोस्टवर रिएक्ट करत आहेत आणि कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्तही होत आहेत.

दरम्यान, भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने देखील यापूर्वी स्वतःच्या इंस्टाग्रामवरून एक खास व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत अश्विन, चेतेश्वर पुजार आणि सिराज हॉटेलच्या स्टाफसोबत डान्स करत होते. एकंदरीत पाहता सेंचुरियनमध्ये मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाने चांगलाच एन्जॉय केल्याचे पाहायला मिळते.

महत्वाच्या बातम्या –

‘भारतीय संघ भित्रेपणाने खेळला, असे वाटले’, टी२० विश्वचषकातील कामगिरीबाबत रवी शास्त्रींचे मोठे भाष्य

रोहित-विराट वादाविषयी निवडसमिती म्हणातायेत, “ते दोघे…”

शास्त्री ‘लगे रहो’ म्हणाले आणि गाबामध्ये गिल-पंतने इतिहास रचला; वाचा सविस्तर

व्हिडिओ पाहा –

[ad_2]

Previous post

ड्रायव्हिंग लायसन्स अन् आरसीचे नूतनीकरण करण्याकरता RTO मध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या प्रक्रिया

Next post

Video: स्वस्तात बाद झाल्याने राहुलच्या संयमाचा तुटला बांध, द. आफ्रिकेच्या खेळाडूंसोबत केली शाब्दिक बाचाबाची

Post Comment