Online पैसे कसे कमवायचे?
Online पैसे कसे कमवायचे? खरंच ऑनलाईन पैसे कमावता येतात का की जस कधी कधी आपण ऑनलाईन खरेदी करतो आणि फसतो; तस तर होणार नाही ना. बिलकुल नाही तुम्ही ऑनलाईन नक्कीच पैसे कमवू शकता आणि ते देखील एका नोकरी पेक्षा ही जास्त.
नोकरी सारखी झंझट नसेल, व्यवसायाचं टेन्शन नसेल. तुम्ही एक चांगल आयुष्य जगू शकता. पण तुमच्यातल्या बराच जणांना हा प्रश्न पडला असेल की नक्की ते कस काय, पैसे कमवायचे तरी कसे?
Online पैसे कमावण्याचे मार्ग अनेक आहेत. तुम्हाला तुमचा मार्ग निवडावा लागतो. कोणी YouTube सारखा प्लॅटफॉर्म वापरतो, कुणी फेसबुक, कोणी इंस्टाग्राम तर कोणी ऑनलाईन वेबसाईट बनवून आपल्या वस्तू विकतात. पण ऑनलाईन वस्तू विकून पैसे कमावणं हा एक मात्र मार्ग नाहीय.
मुळात मी ऑनलाईन वस्तू विकण्यासाठी तुम्हाला प्रेरित नाही करीत आहे. जर तुमच्याकडे आधीच एखादा प्रॉडक्ट असेल तर तो तुम्ही नक्कीच ऑनलाइन विका. पण खास पैसे कमावण्यासाठी तुम्ही म्हणाल मी एखादा प्रॉडक्ट बनवतो आणि ऑनलाईन विकतो तर ते तेवढं सोपं नाहीय. इंटरनेटचा उपयोग करून तुम्ही तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्विस ऑनलाइन विकू शकता, पण ह्या सर्वांमध्ये खूप खर्च असतो. तर बिना खर्च करता तुम्ही कसे पैसे कमवाल तेच आपण आज पाहणार आहोत.
ऑनलाइन अर्निंग्स म्हणजे काय?
इंटरनेटच्या माध्यमातून येणाऱ्या कामातील इनकमला ऑनलाइन अर्निंग्स म्हणतात. आता ऑनलाइन अर्निंग हा शब्द आला की आपण लगेचच YOUTUBE या माध्यमाचा विचार करतो. त्याशिवाय देखील आजून काही मार्ग आहेत कि ज्यातून तुम्ही ऑनलाइन पैसे कमावू शकता. तर ते कोण कोणते मार्ग आहेत. ते आपण पाहूया.
- YOUTUBE
- BLOGGING
- AFFILIATE MARKETING
- FREELANCING
या शिवाय आजून अनेक मार्ग आहेत की त्यातून तुम्ही ऑनलाईन पैसे कमावू शकता. जसे ऑनलाईन सर्वे, भाषांतर (TRANSLATOR), उत्पादन (प्रॉडक्ट) ऑनलाईन विकणे, डेटा एन्ट्री, इत्यादी. पण हे बाकीचे मार्ग मला तेवढे उत्तम नाही वाटत अधिक त्यातील बऱ्याच गोष्टींमध्ये गंतवणूक आहे आणि त्यातून येणारे सुरुवातीची कमाई फारच कमी आहे.
1. युट्युब (YouTube)
युट्युब ही गुगल या अमेरिकन कंपनीची सर्व्हिस आहे. तिची सुरुवात २००५ साली जावेद करीम, चाड हर्ले आणि स्टिव्ह चेन. २००६ साली गुगल ने युट्युब ला विकत घेतलं आणि मग काय जगातल्या कितीतरी लोकांची लाईफस्टाईल चेंज झाली.
युट्युब हा एक विडिओ प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती रोज लाखो व्हिडिओज अपलोड होतात आणि त्याच्या शंभरपट पहिले जातात. त्यामुळेच युट्युब वरून ऑनलाइन अर्निंग करण्याची संधी निर्माण होते.
तर प्रश्न असा येतो कि तुम्ही कसे पैसे कमवू शकता?
युट्युब वरून पैसे कमावता येण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे एक उत्तम विषय असला पाहिजे जेणेकरून खूप कमी वेळात तुमचे विडिओ पहिले जावेत. आता तर एखादा नवीन विषय शोधणं पण अवघडच आहे म्हणा, कारण बराचश्या विषयांवर युट्युब वर माहिती उपलब्ध आहे. तरी पण एखादा विषय तुम्हाला चांगला येत असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर काम करायला सुरुवात करा.
विषयाची निवड झाली की तुम्हाला तुमचं गुगल अकाउंट वापरून युट्युबवर एक चॅनेल बनवावा लागेल आणि विडिओ शूट करून त्यावर नियमित विडिओ टाकावे लागतील.
हे सगळं ठीक आहे पण पैसे कसे मिळणार ? याचाच विचार करता आहेत ना ? तर तुम्ही जे विडिओ अपलोड करता आणि जेव्हा ते दुसरे युसर्स पाहतात त्यावेळी युट्युबच्या पार्टनर प्रोग्राम त्यावरती जाहिरात दाखवतो आणि त्याच्यातुनच तुमची कमाई होऊ शकते.
2. ब्लॉगिंग (Blogging)
युट्युब मध्ये तुम्ही तुमचे विचार विडिओच्या माध्यमातून मांडता तर ब्लॉगिंग वर ते वेबसाइट्सच्या स्वरूपात असते. इथे देखील तुम्ही गूगलच्या जाहिराती वेबसाइट्स वर दाखवून ऑनलाईन पैसे कमावू शकता.
ब्लॉगिंग करण्याकरता सर्वात जास्त प्रसिद्ध असे दोन प्लॅटफॉर्म्स आहेत ते म्हणजे गूगलच ब्लॉगर (Blogger) आणि वर्डप्रेस.
जर तुम्ही चांगलं लिहू शकता तर ब्लॉगिंग ट्राय करायला हरकत नाही. कारण ब्लॉगर वरती तुम्ही अगदी थोड्या पैशात म्हणजेच ₹५०० ते ₹८०० मध्ये एक डोमेन नाव रेजिस्टर करून एक परिपूर्ण वेबसाइट बनवू शकता आणि त्यावर देखील गूगलच्या जाहिराती लावून इनकम करू शकता.
वर्डप्रेस हा थोडा ऍडव्हान्स आहे आणि हा प्लॅटफॉर्मला वापरताना तुम्हाला वेब होस्टिंग (Web Hosting) घ्यावी लागते.
3. आफिलियत मार्केटिंग (Affiliate Marketing)
आफिलियत मार्केटिंग ही सगळ्यात प्रभावशाली अशा ऑनलाईन अरनिंग पैकी एक आहे. जगातील बहुतांश अनुभवी ऑनलाईन युजर्स ह्या प्रणालीचा वापर करतात.
आफिलियत मार्केटिंगचा जर सरळ भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या कंपनीची सर्विस किंवा प्रॉडक्ट तुह्मी अप्रत्यक्षरीत्या विकणे होय. उदा. ऍमेझॉनचा एखादा प्रॉडक्ट तुम्ही विकण्यात ऍमेझॉनला मदत केली की त्याचे तुम्हाला कमिशन मिळते.
पण त्यासाठी तुम्हाला आधी आफिलियत मार्केटिंग प्रोग्राममध्ये स्वतःला रजिस्टर करावं lagat.
4. फ्रीलांसन्ग ( Freelancing )
फ्रीलांसन्ग ( Freelancing ) मध्ये तुम्ही काही मोफत करत नसता. जर तुमच्याकडे काही स्किल्स असतील उदा. तुम्ही चांगलं लिहत असला, उत्तम चित्रकार असाल, जर तुम्हाला प्रोग्रामिंग येत असेल , तुम्ही एक कंसल्टंट असाल वैगरे तर फ्रीलांसन्ग ( Freelancing ) करत असलेल्या वेब्सिते वर जाऊन तुम्ही स्वतःला रजिस्टर करून पैसे कमावू शकता.
या व्यतिरिक्त आजून बरेच मार्ग आहेत ज्यातून तुम्ही चांगलं इनकम करू शकता. वर म्हटल्या प्रमाणे तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम यांचा वापर करून देखील कमवू शकता.
2 comments