ब्लॉग
घरापुढे हे झाड लावा आणि बघा त्या झाडामुळे घरात काय काय घडते..
Published
2 years agoon
By
Kokanshaktiवास्तुशास्त्रानुसार गुलाबाचे रोपटे आपल्या वास्तूमध्ये लावणे शुभ आहे की अशुभ आहे आणि जर गुलाबाचे रोपटे लावायचं असेल तर त्यासाठीची शुभ दिशा कोणती? कोणत्या दिशेला गुलाबाच रोपटे चुकूनही लावू नये यासं-बंधी बऱ्याचदा मनात शंका असते किंवा गोंधळ उडतो कारण आपल्या घरावरती या बारीक सारीक गोष्टींचा खूप प्रभाव पडत असतो.
पण आपल्याला समजत नसते की त्रास होतो कशामुळे? त्यामुळे सर्वानाच प्रिय असणारा गुलाब आणि त्याचं रोपटे कुठे लावावे हे जाणून घेणं खूपच लाभदायी ठरेल. लाल रंग हे प्रमाचे, त्यागाचे प्रतीक आहे. लाल रंगाचा गुलाब प्रेमाची निशाणी असल्यामुळे आपलं प्रेम जर दुरावल असेल तर ते परत मिळवण्यासाठी गुलाब मदत करतो.
जसे की जर पती-पत्नीमध्ये प्रेम कमी झाल असेल, तुमचा प्रियकर अथवा तुमची पत्नी जर दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत नसेल तर अशा वेळी गुलाबाचा हा उपाय तुम्ही करू शकता. जर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न नसेल, घरात पैसा येत नाही तर लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी काही उपाय आहेत,
पुढील उपाय म्हणजे शत्रुपीडे पासून मुक्तता हवी असल्यास, गुलाबाच्या पानांचा व फुलांचा वापर करावा. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आसपास काटेरी झाडे अशुभ मानली जातात कारण या काटेरी झाडाझुडपातून मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते मात्र गुलाब यामध्ये अपवाद आहे.
गुलाबाचे काटे त्याच्या पानांनी आणि फुलांनी झाकले जातात, परिणामी या काट्यातून निघणारी नकारात्मक ऊर्जा ही त्याच ठिकाणी थांबते आणि गुलाबाचा सुगंध सुद्धा या नकारात्मक ऊर्जेला मोठ्या प्रमाणावर कमी करतो. गुलाबाचे झाड हे माता लक्ष्मीस आत्यंतिक प्रिय आहे आणि म्हणूनच प्रत्येक सोमवारी आपण माता लक्ष्मीच्या चरणी लाल रंगाचे गुलाबाचे फुल वहावे.
तुमचं अंगण असेल किंवा बा’ल्क’नी असेल तर या गुलाबाच्या झाडांची लागवड तुम्ही करू शकता. मात्र आपल्या घराचं जिथे ब्रह्मस्थान आहे, ब्रह्मस्थान म्हणजे घरातील जो मध्यभाग आहे त्याला घराचा ब्रह्मस्थळ असं म्हणतात, या ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार चुकूनही गुलाबाचं झाड लावू नये.
गुलाबाच्या झाडाची लागवड केल्यास आपल्या घराची प्रगती होते, यामध्ये तुम्हाला विविध रंगी गुलाब दिसून येतील, लाल-पिवळा अगदी निरनिराळ्या प्रकारचे गुलाब हे अत्यंत शुभ मानले जातात. मात्र आपल्या घरात किंवा घराच्या आसपास लाल गुलाब सोडून इतर गुलाबाची लागवड चुकूनही करू नका.
काळ्या रंगाचा गुलाब नकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो, त्यामुळे घरात वादविवाद होतात. या गोष्टीची काळजी नक्की घ्या. तुमची पत्नी अथवा तुमचा पती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असेल, तुमच्या दोघांचं प्रेम खूप कमी झाले असेल तर हे प्रेम वाढवण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही राधा-कृष्णाच्या मंदिरात जा आणि त्या ठिकाणी 11 गुलाब त्यांच्या चरणी मनोभावे श्रद्धेने अर्पण करा आणि प्रार्थना करा तुमच्या वै;वाहिक दांपत्य जीवनासाठी,
तसेच हा उपाय सलग 7 शुक्रवार करा. सात शुक्रवार मनोभावे जर हा उपाय पुनरावृत्त केला तर तुमचं प्रेम तुम्हाला पुन्हा प्राप्त होतं. यासोबत एक छोटीशी गोष्ट करा, त्याच मंदिरामध्ये जर दुसर्या एखाद्या व्यक्तीने चढवलेली गुलाबाची फुले असतील तर त्या गुलाबाची पान घ्या,
घरी येऊन ती व्यवस्थित सुकवायचे आहेत आणि सुकल्यानंतर या पानांमध्ये थोडंसं बेसन थोडीशी मलई लिंबाचे रस टाकून घोळ बनवा आणि हा घोळ राधाकृष्ण यांच्या चरणी ठेवून नंतर तो तुमच्या शरीरावर लावा. यातून एक प्रकारची एनर्जी येते, सकारात्मकता येते जी तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी मदत करते.
पण हा घोळ शरीरावर लावण्यापूर्वी तो प्रभूंच्या चरणी राधाकृष्ण यांच्या पवित्र चरणी ठेवायला विसरू नका. तुम्हाला जर नजर बाधा झाली असेल, कुणी काही केलेला असेल तर अशा वेळी आपण गणपतीबाप्पांना शरण जाऊ शकता. बुधवार हा श्री गणेशाचा वार आहे, नागिणीचे म्हणजेच विड्याचे पान घेऊन त्यावर गुलकंद टाका, आणि ते गणपतीबाप्पांना अर्पण करा.
घरच्या घरी आपण हा उपाय करू शकता, गणपती बाप्पाला अर्पण करून त्याची पूजा करा, फक्त अकरा गुरुवार उपाय केल्यास कितीही मोठी बाधा असेल , दोष असेल या सर्वातून मुक्ती मिळते. ज्यांच्या घरात गरिबी आहे त्याच्यासाठी काही उपाय लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी आहेत. शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही शिवालयांत जाऊन भगवान शिव शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिं’गावर किमान एक किलोभर गुलाबाची पाने अर्पण करा,
गुलाबाची पानेच हवीत गुलाबाची फुले नव्हे, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहेत. फक्त सहा शुक्रवार हा उपाय करा. भोलेनाथ शिवकडे प्रार्थना करा, आपल्या जीवनात कधीच गरिबी येत नाही. सुख वैभव ऐश्वर्य धनसंपदा प्राप्त होतो. तुम्हाला शत्रुपिडा असेल तर हा एक उपाय मंगळवारपासून सुरू करा.
मंगळवारी अनवाणी म्हणजे चप्पल, बूट न घालता आपल्या घरापासून ते मारुतीच्या मंदिरापर्यंत जायच आहे, जाताना दोन गुलाबाची फुले घ्या , देशी गुलाब अतिउत्तम आहे, त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो म्हणून गुलाबाच फुल हनुमान यांच्या चरणी अर्पण केल्यानंतर त्यावरती थोडंसं शेंदूर आपण टाकायचा आहे, प्रार्थना करायचे आहे की तुमच्या शत्रूंपासून तुमचं रक्षण करावे.
अजून एक उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी हा उपाय करावा. कोणतीही एकादशी चालते, एकादशीच्या दिवशी आपण बाजारामध्ये गुलाबाच्या फुलांचं अंतर घ्या आणि तिची छोटीशी डबी कोणत्याही राधा-कृष्णाच्या मंदिरात जाऊन राधा-कृष्णाच्या चरणी थोडा वेळ ठेवायची आहे, नंतर ती डबी स्वतःजवळ घ्या.
ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवायओम नमो भगवते वासुदेवाय हा महामंत्र जो विष्णु मंत्र आहे त्याचा जास्तीत जास्त शक्य असेल तितका जप करा, प्रार्थना करा तुमची जी काही समस्या आणि लक्ष्मी येत नाही, पैसा मिळत नाही,ती प्रार्थना करा आणि त्यानंतर हे अत्तर ते सातत्याने स्वतःजवळ ठेवाव, रुमालात स्वतःजवळ ठेवत चला, दररोज सकाळी स्नान करताना पाण्यामध्ये
एक दोन थेंब अत्तराचे टाका आणि त्या पाण्याने स्नान करा,
रात्री झोपताना नाभीला लावून आपण झोपी जाऊ शकता. जो शुक्र ग्रह आहे, आपल्या कुंडलीत शुक्र ग्रह प्रचंड प्रभावी करतो या उपायाने, असे उपाय केल्याने प्रिय व्यक्ती आपल्याकडे येते, समोरची व्यक्ती आपल्या हो मध्ये हो म्हणते, विरोध करत असेल तर विरोध सोडून देते, आपली आपल्या घराची कुटुंबाची भरभराट होऊ लागते. गुलाब लावण्यासाठी अत्यंत शुभ दिशा आहे ती म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशा होय. यामुळे जीवन सुखी आणि समृद्ध होते.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.