चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यात भूमिपुत्रांनाकडे दुर्लक्ष | सरपंचाना साधे निमंत्रणही नाही
[ad_1]
चिपी येथील सिंधुदुर्ग एअरपोर्टच्या उद्घाटनाची पूर्ण तयारी झाली आहे. ९ ऑक्टोंबर रोजी या विमानतळावर पहिले प्रवासी विमान उतरणार आहे. पण ज्या भूमीवर हे विमान उतरणार आहे त्या भूमिपुत्रांना मात्र उद्घाटन प्रसंगी कोणताही सन्मान देण्यात आलेला नाही.
या निमंत्रण पत्रिकेत चिपी व परुळे ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा नामोल्लेख नाही. तसेच त्यांना या उद्घाटनासाठी आजमिती पर्यंत साधे निमंत्रणही एमआयडीसी आणि आयआरबी कंपनीकडून देण्यात आलेले नाही. या उद्घाटनाप्रसंगी भूमिपुत्रांचा विसर पडल्याने दोन्ही गावांच्या ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
[ad_2]
Post Comment