चिपी विमानतळ आमच्यामुळंच | आजच्या कार्यक्रमातही सांगणार : नारायण राणे
[ad_1]
मुंबई : दि. ०९ : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विमानतळाचं श्रेय माझं आणि भाजपचं असल्याचं ठणकावून सांगितलं. ‘मुख्यमंत्र्यांनी पाहुण्यासारखं यावं. पाहुणचार करू,’ असं नारायण राणे म्हणाले.
चिपी विमानतळासाठी मी अनेक प्रयत्न केले आहेत. प्रफुल्ल पटेलांपासून अनेक केंद्रीय मंत्र्यांना भेटलो आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना घेऊन दिल्लीला गेलो आहे. मात्र, शिवसेनेचे लोक काही न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याच्या उद्योगमंत्र्यांचं काम शून्य आहे. चिपी विमानतळामध्ये इतर कोणाचंही योगदान नाही. त्यामुळं पाहुणे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलवलंय. पाहुणे म्हणून या, पदाप्रमाणं काही तरी द्या आणि जा,’ असं राणे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले.
[ad_2]
Post Comment