×

ब्रावोची विकेट हंसरंगासाठी ‘विश्वविक्रमी’! आपल्याच देशाच्या दिग्गजाला पछाडत ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान

ब्रावोची विकेट हंसरंगासाठी ‘विश्वविक्रमी’! आपल्याच देशाच्या दिग्गजाला पछाडत ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान

[ad_1]

अबुधाबी। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत गुरुवारी (४ नोव्हेंबर) श्रीलंका संघाचा प्रवास संपला. त्यांनी सुपर १२ फेरीतील अखेरचा सामना गतविजेते वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. या सामन्यात २० धावांनी विजय मिळवत श्रीलंकेने शेवट गोड केला. दरम्यान श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली.

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १८९ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला १९० धावांचे आव्हान दिले होते. यावेळी वेस्ट इंडिजला १९० धावा करण्यापासून रोखताना वनिंदू हसरंगाने ४ षटकांच्या कोट्यात १९ धावा देत २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

दरम्यान, त्याने डावाच्या १७ व्या आणि त्याच्या वैयक्तिक चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ड्वेन ब्रावोला २ धावांवर बाद केले. ही त्याची सामन्यातील दुसरी विकेट ठरली, तर संपूर्ण स्पर्धेतील १६ वी विकेट ठरली. तो सध्या २०२१ टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याने टी२० विश्वचषकाच्या इतिहासात एका स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. विशेष म्हणजे हा विक्रम त्याने २०२१ टी२० विश्वचषकातील त्याचा वैयक्तिक अखेरचा चेंडू टाकत असताना नावावर केला.

यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्याच अंजता मेंडिसच्या नावावर होता. त्याने २०१२ साली झालेल्या टी२० विश्वचषकात १५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या डर्क नॅन्सच्या नावावर हा विक्रम होता. त्याने २०१० साली झालेल्या टी२० विश्वचषकात १४ विकेट्स घेतल्या होत्या.

वनिंदू हसरंगाने २०२१ टी२० विश्वचषकात ८ सामने खेळताना ३० षटके गोलंदाजी केली आणि ९.७५ च्या सरासरीने १६ विकेट्स आपल्या नावावर केल्या.

श्रीलंकेचा विजय 
श्रीलंकेने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २० षटकांत ८ बाद १६९ धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक ८१ धावांची नाबाद खेळी केली. तसेच निकोलस पूरनने ४६ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगा व्यतिरिक्त चमिका करुणारत्ने आणि बिनुरा फर्नांडो यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच दुश्मंता चमिरा आणि दसून शनकाने प्रत्येरी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी, श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि चरिथ असलंका यांनी अर्धशतके केली. पाथम निसंकाने ५१ धावांची आणि असलंकाने ६८ धावांची खेळी केली. तसेच कुशल परेराने २९ धावांचे आणि शनकाने नाबाद २५ धावांचे योगदान दिले. त्यामुळे श्रीलंकेने २० षटकांत १८९ धावसंख्या उभारली. वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसलने २ विकेट्स आणि ड्वेन ब्रावोने १ विकेट  घेतली.

[ad_2]

Post Comment