×

तब्बल १२ वर्षांनी टी२० विश्वचषकात इंग्लंडने वेस्ट इंडिजविला पहिल्यांदा हरविले

तब्बल १२ वर्षांनी टी२० विश्वचषकात इंग्लंडने वेस्ट इंडिजविला पहिल्यांदा हरविले

[ad_1]

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत इंग्लंड संघाने विजयाने मोहिमेची सुरुवात केली आहे. इंग्लंडने सुपर-१२ फेरीच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. इंग्लंडचे लेग-स्पिनर आदिल रशीद आणि मोईन अली यांच्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज अडकले आणि वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या ५५ धावांवर गुंडाळला. मात्र ५६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना इंग्लंडनेही ४ विकेट गमावल्या. त्यांनी ८.२ षटकांत आपले लक्ष्य गाठले. यष्टीरक्षक जोस बटलर (२४*) ने विजयी चौकार मारला.

या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लडने टी२० विश्वचषकातील आपली वेस्टइंडिज विरुद्ध आपल्या पराभवाची मालिका मोडीत काढली आहे.

टी२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लड आणि वेस्टइंडिज संघ सहाव्यांदा आमने-सामने आले होते. त्यातील यापूर्वी झालेल्या पाच सामन्यांत वेस्ट इंडिज संघाने बाजी मारली आहे. २००९ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघाची ओव्हल येथे प्रथम गाठ पडली होती. हा सामना इंग्लडने पाच गड्यांनी गमावला होता.

त्यांनंतर वेस्ट इंडिजच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियम येथे २०१० सालच्या टी२० विश्वचषकात दुसऱ्यांदा दोन्ही संघ आमने -सामने आले होते. या सामन्यात इंग्लड आठ विकेट्सने पराभूत झाले होते. २०१२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत १५ धावांनी इंग्लड संघ पराभूत झाला होता, तर २०१६ च्या विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा दोन्ही संघ आमने-सामने आले आणि दोन्ही सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली होती. यातील पहिला सामना मुंबई, तर दुसरा सामना कोलकाता येथे पार पडला होता. इंग्लडने मुंबईतील सामना सहा गड्यांनी तर कोलकाता येथील सामना चार गड्यांनी गमावला होता. मात्र, दुबईतील सामना जिंकून इंग्लडने पराभवाची परतफेड केली आहे.

दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. मोईन अलीने ४ षटकांत केवळ १७ धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतल्या. तसेच आदिल राशीदने २.२ षटकांत २ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजसाठी फक्त ख्रिस गेल (१३) दुहेरी आकडा गाठू शकला. लेंडल सिमन्स आणि शिमरॉन हेटमायरने हात उघडण्याचा प्रयत्न केला, पण मोईनने दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसऱ्या टोकाकडून ख्रिस वोक्सने किफायतशीर गोलंदाजी करत एविन लुईसला (६) बाद केले. टायमल मिल्सने गेलला बाद केले. इतर फलंदाजही काही विशेष करू शकले नाही.

वेस्टइंडिजने दिलेल्या ५६ धावांचे माफक लक्ष्य गाठताना इंग्लंडच्या ४ विकेट पडल्या. इंग्लिश संघाला पहिला धक्का जेसन रॉय (११) च्या रूपात मिळाला, त्याला रवी रामपॉलने गेलकरवी झेलबाद केले. यानंतर जॉनी बेअरस्टो (९) याला अकिल हुसेनने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले, त्यामुळे संघाची धावसंख्या २ बाद ३० अशी झाली.

मोईन अली (२) धावबाद झाला आणि लियाम लिव्हिंगस्टोन (१) पुन्हा हुसेनच्याच चेंडूवर झेलबाद झाला. मात्र, बटलर खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला. विंडीज संघाकडून हुसेनने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले, तर रामपॉलला एक विकेट मिळाली.

[ad_2]

Post Comment