×

चायनीज व्हीटीएस् यंत्रणा असलेली बोट करतेय गिर्येत मासेमारी, सुरक्षा यंत्रणेची हडबडली…

चायनीज व्हीटीएस् यंत्रणा असलेली बोट करतेय गिर्येत मासेमारी, सुरक्षा यंत्रणेची हडबडली…

[ad_1]

चीनी कंपनीच्या व्हीटीएस् यंत्रणेने सुरक्षा यंत्रणेची झोप उडविली. कोस्टगार्डच्या जीपीएस लोकेशनमध्ये देवगड समुद्रात चीनी बोटींचा वावर असल्याचे निदर्शनास आले आणि सर्व सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. कोस्टगार्डने फिशरीज, पोलिस यंत्रणेला संशयित चीनी बोटींचा शोध घ्या अशा सुचना दिल्या व दोन्ही यंत्रणा कामाला लागली.सागर पोलिस विभागाने गस्तीनौकेने शोधमोहिम राबविल्यानंतर गिर्ये समुद्रात चायनीज व्हीटीएस् यंत्रणा असलेली बोट सापडली. मात्र ही बोट रत्नागिरी येथील असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास व कारवाईसाठी देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही नौका यांत्रिकी मच्छिमारी नौका आहे. मात्र यावर पर्सनेट जाळी असल्याने गोलमाल है, सब गोलमाल है अशी स्थिती झाली आहे.

देवगड समुद्रात चीनी बोटी असल्याचे लोकेशन कोस्टगार्डला जीपीएस् यंत्रणेवर मिळाले.गेले दोन ते तीन दिवस या नौका देवगड समुद्रात फिरत असल्याचे समजल्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय व पोलिसांना देण्यात आली दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाकडे गस्तीनौका नसल्याने सागर पोलिस विभागाकडे ही कामगीरी सोपविण्यात आली.
नौकांचा शोध घेण्यासाठी सागर सुरक्षा देवगड शाखेची टीम सागरकन्या गस्तीनौकेने समुद्रात रवाना झाली.या टीममध्ये सागरी सुरक्षा विभागाचे पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र साळूंखे, विशाल कराळे, तेली, पोलिस नाईक तांबे, पो.कॉ.निलेश पाटील यांचा समावेश होता.

या टीमला रविवारी दुपारी १ वा. सुमारास गिर्ये पवनचक्कीसमोर ११.५ नॉटीकल मैलमध्ये चिनी कंपनीची व्हीटीएस यंत्रणा असलेली IND-MH- 04-MM-0420 या क्रमांकाची इब्राहीम साखरकर ही नौका रत्नागिरी येथील इब्राहीम दाऊद साखरकर यांच्या मालकीची आहे.या नौेकेबरोबरच तेथिलच असलेल्या दोन नौका पसार झाल्या.पोलिसांनी या नौकेला देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिले.या नौकेवर चीनी कंपनीची व्हीटीएस् यंत्रणा बसविण्यात आली आहे मात्र या यंत्रणेचे भारतीय रजिस्टेशन करण्यात न आल्याने ही नौका चीनमधील असल्याचे लोकेशन जीपीएस यंत्रणेवर दिसत होते.यामुळे सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडाली व यंत्रणा संशयित चीनी बोटींचा शोध घेण्याचा कामाला लागली.अखेर अशी यंत्रणा असलेली रत्नागिरी येथीलच बोट सापडली असून भारतीय रजिस्टेशन न केल्यामुळे चीनची नौका असल्याची माहिती यंत्रणेला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान ही नौका भारतीय असल्याचे निष्पन्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ही नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर तपासणीअंती फिशींग करणाऱ्या या नौकेवर पर्सनेट जाळी आढळल्याने खळबळ उडाली आहे तसेच नौकेवर जनरेटर, १० पेक्षा जास्त कर्मचारी, जाळ्यांची लांबी-रूंदी नियमबाह्य असल्याचे आढळल्याने मत्स्यव्यवसाय विभाग त्यादृष्टिने तपासणी करून पुढील कारवाई करणार आहे अशी माहिती मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रविंद्र मालवणकर यांनी दिली.

[ad_2]

Post Comment