अर्जुन रामपालला का कर्जतला रहायला आवडत?
संपूर्ण जगात कोरोनाने आपली दहशत पसरविल्याने अगदी सगळ्यांना लॉक डाऊन होऊन राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सगळेच अचानक झालेल्या लॉक डाऊन मुळे विचारात पडले, कोणाला वाटले ही नाही की हे लॉक डाऊन इतका वेळ चालेल आणि हे अजून किती काळ चालेल हे ही सांगता येणार नाही .
अशातच अचानक झालेल्या लॉक डाऊन मुळे दिगदर्शक व अभिनेता असलेल्या अर्जुन रामपाललाही आपल्या रहात्या घरी मुंबई येथे परत येता आले नाही. अर्जुन रामपाल हे कर्जत येथे शुटींग करत होते . त्यांच्यासोबत त्यांची साथीदार गॅब्रिएला डेमेट्रिएड्स व त्यांचा मुलगा अरिक हेही आहेत. अलीकडेच त्यांनी मिड-डे ला दिलेल्या मुलाखतीत हे नमूद केलं आहे.
हे पण वाचा: महाराष्ट्रातील उद्द्योग होऊ शकतात बंद..! कारण ऐकून व्हाल थक्क.
कर्जत येथे रहाण्याविषयी ते म्हणतात की कोरोनाच्या दृष्टीने कर्जतचे फार्महाऊस हे योग्य ठिकाण आहे . कारण येथे कोरोनाची एकही केस नाही शिवाय कर्जत ते मुंबई हे काही तासांचेच अंतर असल्याने काही इमर्जन्सी आल्यास लगेच जाणे शक्य असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने ही जागा योग्य आहे . त्यामुळे छोट्या अरिक च्या दृष्टीने त्यांनी लॉक डाऊन काळात कर्जत येथे राहणे पसंद केल्याचे म्हटले.
तसेच आपली पहिली पत्नी मेहर व मुली मायरा व माहिका यांच्या सोबत आपण सतत संपर्कात असून त्यांच्या सोबत गप्पा मारत असल्याचे सांगितले . याच कर्जतच्या फार्महाऊसवर अर्जुन रामपालने गर्लफ्रेंड गॅब्रिएलाला एक सुंदर चित्रपटासह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
1 comment