मोघल बादशहा औरंगजेब माहीत आहे… पण त्याचा मृत्यू कसा झाला?…जाणून घ्या अज्ञात असा इतिहास
मोगल बादशाहांमध्ये औरंगजेब असा एकमेव शासक होऊन गेलाय ज्याने भारतावर १६५८ ते इसवि सन १७०७ अश्या जवळपास अर्ध्या शतकापर्यंत रा ज्य केलं. शहाजहांचा मुलगा औरंगजेब याने आपल्या चातुर्यपूर्ण रणनितीनी मोगल साम्राज्याचा विस्तार भारतातील अनेक उपमहाद्वीपांमध्ये केला. अकबर या मोगल सम्राटा नंतर औरंगजेब मोगल वं शाचे सर्वाधिक यशस्वी आणि योग्य प्रशासक म्हणून नावलौकिक मिळवते झाले.
आपल्या प्रतिभेने त्यांनी मोगल साम्राज्याला नव्या उंचीपर्यंत पोहोचविले. त्याच्या मृ त्युपश्चात मोगलांच्या साम्राज्याला हळूहळू उतरती कळा लागली. त्यानंतर मात्र एकही मोगल बादशाह मोगल सा म्राज्याला मजबूत करू शकला नाही. त्यामुळे पुढे मोगल साम्राज्य फार काळ टिकाव धरू शकले नाही आणि त्याचा अंत झाला. या लेखात मोगल शहंशहा औरंगजेब याच्या जीवनातील महत्वपूर्ण घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आलाय. तर मोगल बादशहा औरंगजेबाचा जन्म गुजरात मधील दाहोद येथे २१ ऑक्टोबर १६१८ ला मुगल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांच्या कुटुंबात झाला.
तसेच औरंगजेबाचा निकाह १८ मे १६३७ ला फारस राजघराण्यातील अत्यंत सुंदर अश्या ‘दिलरास बानो बेगम’ समवेत झाला. या व्यतिरिक्त देखील त्यांच्या अनेक बेगम होत्या. औरंगजेबाला एकूण ६ अपत्य होती, त्यात ५ मुलं आणि एक मुलगी. इसवि सन १६४५ ला औरंगजेबाला मुगल साम्राज्यातील सर्वाधीक समृद्ध आणि आनंदी अश्या गुजरात राज्याचा सुभेदार बनविण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या कौशल्यपूर्ण रणनितींच्या आणि सैन्य शक्तीच्या बळावर गुजरात येथे चांगले कार्य केले आणि त्या भागाचा विकास केला.
त्याने केलेल्या कामाने प्रभावित होत शहजहाने औरंगजेबाला उज्बेकिस्तान आणि अफगाणिस्तानचा सुभेदार बनविले आणि तेथील जवाबदारी त्याच्यावर सोपविली, जेणेकरून औरंगजेबासारख्या कुशल प्रशासकाच्या देखरेखीखाली त्या राज्यांची प्रगती व्हावी. पुढे औरंगजेबाच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे आणि कौशल्यपूर्ण रणनितींमुळे त्याच्या पद आणि प्रतिष्ठेत सतत प्रगती होत गेली. पण इसवि सन १६५२ मध्ये शाह्जाहाची प्र कृती अत्यंत खालावली होती आणि त्याच्या वाचण्याची काहीच चिन्ह दिसेनात तेंव्हा मुगल वंशाचा उत्तराधिकारी होण्याकरता त्याच्या तीनही मुलांमध्ये स्पर्धा पेटली.
आणि पुढे तर मुगल सिंहासन मिळवण्याकरता तिघांमध्ये युद्ध पेटले, शहाजहां मात्र आपल्या सर्वात मोठ्या, समंजस आणि योग्य अश्या दाराशिकोहला आपला उत्तराधिकारी बनविण्यास इच्छुक होते. तीनही भावंडांमध्ये औरंगजेब हा सर्वाधिक शक्तिशाली आणि बलाढ्य होता शिवाय मोगल सिंहासनावर विराजमान होण्यासाठी तो अत्यंत अधीर झाला होता, याकरता तो इतक्या खालच्या पातळीवर उतरला कि त्याने आपला सख्खा भाऊ दाराशिकोहला फाशीवर लटकवले व बंगालचा गवर्नर असलेला दुसरा भाऊ शाहशुजाला पराजित करून त्याची देखील हत्या केली.
आपल्या वृद्ध आणि आजारी पित्याला जवळजवळ ७ वर्ष कैदी बनवून आग्रा येथील लाल किल्ल्यात ठेवले. आपल्या पित्याला शहाजहांला बंधक बनवून ठेवण्यामागे औरंगजेबाच्या भूमिकेविषयी इतिहासकारांचे मत असे आहे की शहाजहांने आपली बेगम मुमताच्या आठवणीत आग्रा येथे बनविलेल्या ताजमहालावर प्रचंड पैसा खर्च केला होता त्याचा विपरीत परिणाम मोगल साम्राज्याच्या वित्तीय व्यवस्थेवर पडला होता. त्यामुळे औरंगजेब फार नाराज होता, याचा परिणाम म्हणून त्याने आपल्या पित्याला बंदिस्त केले होते.
अश्या पद्धतीने साम- दाम- दंड- भेद नीती वापरून क्रूर औरंगजेब हा १६५८ ला मुगल सिंहासनावर विराजमान झाला आणि आपला राज्याभिषेक “अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मुजफ्फर औरंगजेब बहादूर आलमगीर ” या उपाधीने करविला.
त्याच्या प्रजेला मात्र तो मुगल शासक झाल्याचा आनंद नव्हता कारण आपल्या दोनही भावांची हत्या करून आणि पित्याला बंदिवासात टाकल्याने प्रजेच्या मनात त्याच्याविषयी असंतोष खदखदत होता. औरंगजेबाने मात्र आपली क्रूर आणि दृष्टं वागणूक पुढेही कायम ठेवली त्यामुळे त्याचा परिणाम त्याला पुढे भोगावा लागला.
औरंगजेब हा क्रूर आणि अत्याचारी मुगल शासक तर होताच शिवाय तो जातीय स्तरावर कट्टर मुस्लीम देखील होता, संपूर्ण भारताला मुस्लीम देश बनविण्याची त्याची इच्छा होती, पण त्याचे हे मनसुबे कधीही पूर्ण झाले नाहीत. पण आपली ही इच्छा पूर्ण करण्याकरता हिंदू धर्मीयां सोबत त्याने अत्यंत क्रूर आणि द्वेष पूर्ण व्यवहार केला. अत्याचारी आणि क्रूर वृत्तीच्या औरंगजेबाच्या मनात हिंदूच्या प्रती इतका राग आणि व्देष होता की त्याला सगळ्या हिंदू आणि शिखांना मुस्लीम बनविण्याची इच्छा होती.
पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहसाला आणि शक्तीला पाहून औरंगजेबाच्या मनात देखील महाराजांविषयी दहशत पसरली होती. आपल्या शासनकाळात औरंगजेबाने आपल्या प्रजेसमवेत इतकी निर्दयी आणि क्रूर वागणूक ठेवली की छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत अनेक हिंदू शासक त्याचे शत्रू झाले होते आणि प्रजेच्या मनात देखील औरंजेबाविरुद्ध द्वेष आणि असंतोष खदखदत होता. एकीकडे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबा विरुद्ध विद्रोह पुकारल्यानंतर जाट, शीख, राजपूत, आणि सतनामी शासकांनी औरंगजेबाविरुद्ध विद्रोहाची ठिणगी पेटवली.
शिवाय इसवी सन १६८६ मध्ये इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने देखील भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या हेतूने औरंगजेबावर हल्ला केला होता. या दरम्यान मग्रूर आणि क्रूर अश्या औरंगजेबाने अनेक लढाया जिंकल्या परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शक्तिशाली शासकाशी युद्ध करताना त्याला पराजय पत्करावा लागला. या सोबतच एका मागून एक विरोधकांचा आणि विद्रोहाचा सामना करावा लागल्याने मुगल साम्राज्याला हादरे बसू लागले, मोगल साम्राज्याचा पाया कमकुवत होऊ लागला आणि मुगल साम्राज्य लयास जाऊ लागले.
दुसरीकडे मराठा शासकांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आणि हिंदुस्थानात मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. मात्र पुढे इंग्रजांनी मराठा साम्राज्याला हरवून भारतावर कब्जा केला होता. काही इतिहासकारांच्या मते जवळजवळ ४९ वर्षांपर्यंत दीर्घकाळ सत्ता उपभोगणाऱ्या औरंगजेबाचा मृत्यू हा सामान्य होता. त्यांच्या मते स्वतःला आलमगीर म्हणवून घेणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाचा महाराष्ट्रात 89 व्या वर्षी मृत्यु झाला! -२० फेब्रुवारी, १७०७ मध्ये औरंगजेबाने आपले प्राण त्यागले.
तर दुसरीकडे काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की वीर छत्रसाल यांनी आपले गुरु प्राणनाथ यांनी दिलेल्या खंजिराने औरंगजेबावर हल्ला केला आणि त्याला सोडून दिले, त्या खंजिराला काही विषारी द्रव लावण्यात आल्याने औरंगजेबाच्या जखमा पुढे कधी भरल्याच नाहीत आणि वेदनांनी तडफडत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू पश्चात मोगल साम्राज्याचा देखील अंत झाला.
Post Comment