वॉर्नर खरंच होणार का निवृत्त? पाचव्या कसोटीआधी स्वतःच दिले उत्तर
[ad_1]
ऍशेस मालिकेतील पाचवा सामना गुरुवारी (27 जुलै) खेळला जाणार आहे. हा सामना लंडनच्या केविंग्टन ओव्हल स्टेडियमवर होईल. तत्पूर्वी, मायकल वॉन याने स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात, असे म्हटलेले. वॉर्नर याला मुलाखतीत याबाबत विचारले असता तो म्हणाला,
“हा एक विनोद आहे. त्याला फारसे गांभीर्याने घेऊ नका. यापूर्वी सांगितले आहे की, पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या वेळी कसोटी खेळेल. मी नक्कीच त्यानंतर कसोटी खेळणार नाही.”
वॉर्नर याने यापूर्वी स्पष्ट केले आहे की, पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सिडनी कसोटीनंतर तो निवृत्त होऊ इच्छितो. सिडनी हे त्याचे घरचे मैदान आहे. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसून आला नाही. वॉर्नर ऍशेस मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. त्याने चार सामन्यात 25.12 च्या सरासरीने 201 धावा केल्या. यादरम्यान तो केवळ एक अर्धशतक ठोकू शकला. तर, तीन वेळा तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.
(David Warner Speaks On His Test Retirement After Ashes 2023)
[ad_2]
Post Comment