×

पितृपक्ष – सुनेने/सर्व भावांनी श्राद्ध घालावे का?.. सुतक पडले तर? तुमच्या सर्व शंकांची उत्तरे बघा …

पितृपक्ष – सुनेने/सर्व भावांनी श्राद्ध घालावे का?.. सुतक पडले तर? तुमच्या सर्व शंकांची उत्तरे बघा …

[ad_1]

पितृपक्षा विषयी आणि श्राद्ध घालण्या विषयी आपल्या काही शंका आहेत. अनेक लोकांना प्रश्न पडतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पहाणार आहोत.

सर्व भावंडांनी श्राद्ध घालणे आवश्यक आहे का? :- हिंदू ध र्म शास्त्रानुसार जर भावा भावांची चूल वेगळी असेल. तर प्रत्येक भावांनी श्राद्ध हे घालायलाच हवं. एका भवानी घातलेल्या श्रद्धाच फळ हे दुसऱ्या भावास मिळू शकत नाही. आणि तुमच्या जीवनात पितृदोष असेल काही समस्या असतील तर आवर्जुन श्राद्ध घालायला हवा.

महिलेने विशेष करून सुनेने आपल्या सासऱ्याच श्राद्ध घालावं का? :- तर हिंदू ध र्म शास्त्रानुसार पतीच्या वतीने स्त्री अमान श्राद्ध करू शकते. तर आता अमान श्राद्ध म्हणजे काय तर बटाटे, तूप, तीळ, गूळ, तांदूळ विडा आणि नारळ ही सर्व सामग्री एखाद्या देवळात आपण अर्पण करावी किंवा पुरोहिताला द्यावी याला अमान श्राद्ध असे म्हणतात.

पुढचा प्रश्न शास्त्र शुद्ध पितृ शांती करायची असेल तर ती कुठे करावी ? :- शास्त्र शुद्ध पितृ शांती म्हणजे काय तर त्रिपिंडी श्राद्ध, काल सर्प शांती, नारायण नागवली हे जे विधी असतात या विधींना पितृ शांती असे म्हंटले जाते. हे विधी आपणास शास्त्र शुद्ध रित्या करायची असेल तर वाराणसी किंवा महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर आणि बिहार राज्यातील गया या तीन ठिकाणी अत्यंत शास्त्र शुद्ध पध्दतीने पितृ शांती केली जाते.

मात्र प्रत्येकाला या ठिकाणी जाऊन पितृ शांती करून घेणे शक्य नाही ते लोक आपल्या भागातच पितृ शांती करू शकतात.
पितृ पक्षात जर सुतक पडले असेल तर काय करावं? :- जर पितृ पक्षात सुतक पडले असेल. तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या मृत व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यावर येत असेल. तर तेव्हा आपण त्या तिथीस पितृ पक्षातील विधी करू शकता.

मात्र जर मृत व्यक्तीची तिथी सुतक असलेल्या दिवसात येत असेल तर मात्र आपण सुतक काळात श्राद्ध न घालता सर्व पितृ अमावस्या असते या सर्व पितृ अमावस्येला हा श्राद्ध विधी करू शकता. केवळ आपल्या आई किंवा वडिल यापैकी कोणी मृत पावले असेल तर त्यांच श्राद्ध हे या वर्षी न करता ते पुढील वर्षी करावं.

जर जीवनात पितृदोष आहे आणि पितृदोष जाण्यासाठी शांती पण केली आहे मात्र फरक पडलेला नाही काय करावं..? अनेकदा अस होत की कधी कधी हा जो त्रास आहे पितृ शांती करून सुद्धा कमी होत नाही आहे त्या पेक्षा जास्त वाढतो. याचा अर्थ काय जर तुमच्या पितरांच्या त्रासाची तीव्रता जास्त असेल तर यावेळी एकच विधी करून अपेक्षित लाभ मिळत नाही.

किंवा कधी-कधी त्रास वाढतो आणि त्यानंतर तो कायमचा दूर होतो. एक मंत्र आपण या ठिकाणी पहाणार आहोत ।।श्री गुरुदेव दत्त।। हा मंत्र जप सातत्याने करत चला यामुळे पितृदोष बऱ्याच प्रमाणात कमी होतील. आणि आपल्या कुटुंबात ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या पत्रिका दाखवा आणि त्या पत्रिकेनुसार अन्य जे विधी करावे लागू शकतात त्यांची माहिती घ्या. केवळ पितृ शांती करून जर पितृदोष कमी होत नसेलतर हे अन्य विधी आपण करू शकता.

आपल्या पूर्वजांचे टाक जर घरात ठेवले असतील तर त्यांच काय करावं..? :- घरात टाक ठेवणे योग्य नाही. टाक लवकरात लवकर विसर्जित करावे. पित्रे संतुष्ट असतील तर ते देवाप्रमाणेच कार्य करतात आशीर्वाद देतात. पण पितरांना रोज नैवेद्य दाखवू नये त्यासाठी पितृ पंधरवाडा असतो.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

[ad_2]

Post Comment