Connect with us

देश

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर इंडिगोची खास ऑफर, सणासुदीच्या काळात हवाई प्रवास स्वस्त

Published

on

[ad_1]

IndiGo Special Homecoming Sale: ढोल ताशांच्या गजरात आज मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं (Ganeshotsav 2023) आगमन झालं. आज सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळत आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर इंडिगोनं (IndiGo) खास ऑफर आणली आहे. सणासुदीच्या काळात इंडिगोचा हवाई प्रवास स्वस्त होणार आहे. या सणासुदीच्या काळात इंडिगोकडून स्वस्त दरात विमानाची तिकटे दिली जाणार आहेत.

पाहुयात काय आहे इंडिगोची ऑफर?

तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त किंवा इतर सणाला तुमच्या घरी जायचे असेल किंवा कुठेतरी बाहेर जायचे असेल तर इंडिगोचा प्रवास स्वस्त होणार आहे. इंडिगोनं खास ऑफर आणली आहे. याद्वारे तुम्हाला स्वस्त तिकिटे मिळू शकता. गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात हवाई प्रवाशांना त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळावी यासाठी इंडिगोची ऑफर हीच बाब लक्षात घेऊन आणण्यात आली आहे. इंडिगोकडून दिली जाणारी ऑफर ही 25 सप्टेंबर 2023 पासूनच्या प्रवासासाठी सुरु होणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. याकाळात प्रवासी लाभ घेऊ शकतात. हवाई प्रवाशांना त्यांच्या तिकिटांवर 15 टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. 31 मार्चपर्यंत ही सवलत मिळणार आहे.

ऑफरसाठी किती वेळ शिल्लक?

इंडिगोनं तिकीटांवर देण्यात येणारी ऑफर ही सोमवारपासून (18 सप्टेंबर) सुरु केली होती. ही ऑफर उद्या म्हणजे 20 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. त्यामुळं पुढच्या प्रवासासाठी तिकीटे बुक करण्याची उद्या शेवटची तारीख आहे.

या ऑफरचा लाभ कसा घ्यावा

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना इंडिगोची वेबसाइट, इंडिगोचे मोबाइल अॅपद्वारे तिकीट बुक करावे लागेल. यासाठी त्यांना फ्लाइट बुक करताना प्रोमो कोड लावावा लागेल. सणासुदीच्या काळात वाढलेली प्रवासी मागणी वाढवणे आणि त्याची पूर्तता करणे हा या विक्रीचा उद्देश आहे. ही ऑफर इंडिगो कोडशेअर कनेक्शनसह सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर लागू होईल. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर इंडिगोने ट्वीटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे.

(इंडिगो ही भारत देशामधील विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगाव येथे आहे. ही कंपनी कमी दरात सेवा देणारी कंपनी म्हणून ओख आहे. जगभरातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी ही एक कंपनी आहे. इंडिगोची सर्व विमाने जांभळया आणि पांढऱ्या रंगाने रंगविलेली आहेत. विमानाचा तळभाग जांभळया रंगाने रंगविलेला असून शेपटीखाली निळसर रंगाचे पट्टे असतात. विमानाच्या पांढऱ्या पृष्ठभागावर इंडिगोचे इंग्लिश नांव मोठया अक्षरांमध्ये लिहिलेले दिसते.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *