इंग्लंडच्या भूमीत तळपली पृथ्वी शॉची बॅट! वादळी द्विशतक ठोकत उद्ध्वस्त केले मोठे रेकॉर्ड्स
[ad_1]
पृथ्वी शॉचे द्विशतक
रॉयल लंडन वनडे कप 2023 (Royal London ODI Cup 2023) स्पर्धेत समरसेट संघाविरुद्ध खेळताना नॉर्थम्प्टनशायर संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने विस्फोटक फलंदाजीचे दर्शन घडवले. त्याने वादळी फलंदाजी करत 153 चेंडूत 244 धावांची झंझावाती खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 11 षटकार आणि 28 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या स्पर्धेत द्विशतक ठोकणारा तो पहिलाच भारतीय बनला आहे. त्याने समरसेटच्या गोलंदाजांना चोप देत फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 178 धावा केल्या.
The 6th highest individual score in List A history.
Prithvi Shaw, take a bow. 👏 pic.twitter.com/nfavyLdTRh
— Northamptonshire CCC (@NorthantsCCC) August 9, 2023
विक्रम उद्ध्वस्त
पृथ्वी शॉ याने त्याच्या खेळीने इंग्लंडच्या स्पर्धेतील अनेक विक्रम उद्ध्वस्त केले आहेत. रॉयल लंडन वनडे कपमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या पृथ्वी शॉच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यासोबतच त्याच्या बॅटमधून निघालेली ही खेळी इंग्लंडच्या अ दर्जाच्या क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळीदेखील आहे. भारतीय फलंदाजाने समरसेटचा फलंदाज अली ओर्र याचा विक्रम मोडला आहे. त्याने मागील वर्षी 206 धावांची खेळी साकारली होती.
𝟮𝟰𝟰. 👑 pic.twitter.com/RHwQUbBjOi
— Northamptonshire CCC (@NorthantsCCC) August 9, 2023
पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी
या स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पृथ्वी शॉ याची बॅट तळपली नव्हती. तो पहिल्या दोन्ही सामन्यात मिळून फक्त 60 धावा करू शकला होता. तसेच, जोरदार उसळी चेंडूवर विचित्र पद्धतीने हिटविकेट होऊन तंबूत परतल्यामुळे त्याला टीकेचाही सामना करावा लागला होता. तो भारतीय संघातूनही दीर्घ काळापासून बाहेर आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना 2020मध्ये खेळला होता. तसेच, अखेरचा वनडे सामना 2021मध्ये खेळला होता. अशात आता त्याच्या या विस्फोटक खेळीनंतर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (indian cricketer prithvi shaw scored double hundred and breaks many records in royal london one day tournament in england)
[ad_2]
Post Comment