महाराष्ट्र
स्व.अश्विन पाटील मित्र परिवार आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.
Published
4 months agoon
By
Editorउरण दि. 30 (विठ्ठल ममताबादे) स्व.अश्विन पाटील हे सामाजिक कार्यकर्ते होते.ते गोर गरिबांना आपल्या परिने मदत करत होते. मात्र स्व. अश्विन पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे स्व. अश्विन पाटील यांचे समाजकार्य पूढे चालू ठेवण्याच्या दृष्टीकोणातून त्यांच्या सर्व मित्र वर्गांनी एकत्र येत स्व. अश्विन पाटील मित्र परिवारच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला.
त्या अनुषंगाने स्व. अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे दरवर्षी रक्तदान शिबीराचे व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षा श्री बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकूल विमला तलाव जवळ, उरण शहर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 137 दात्यांनी रक्तदान केले .
अश्विन पाटील मित्र परिवार व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विदयमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तर सनशाईन हॉस्पीटल आणि सेन्टर फॉर साईट यांच्या सहकार्याने रुग्णांची डोळे तपासणी, इसीजी, रक्तदाब, मधुमेह आदी तपासणी करण्यात आले.
तसेच हृदयाशी संबधित रोगावर मोफत तज्ञ डॉक्टर मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबीराला विद्यमान आमदार महेशशेठ बालदी,माजी आमदार मनोहरशेठ भोईर, भारतीय जनता पार्टीचे उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, भाजप उरण शहराध्यक्ष कौशिक शहा,नगरसेवक राजू ठाकूर, माजी सभापती जयविन कोळी आदि मान्यवरांनी भेट देऊन रक्तदान शिबीराचे, अश्विन पाटील मित्र परिवाराच्या कार्याचे कौतूक केले.
रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी अश्विन पाटील मित्र परिवाराचे आभार मानले. उत्तम नियोजन व आयोजन झाल्याने सदर शिबीर मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले. सदर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर यशस्वी पणे पार पाडण्यासाठी अश्विन पाटील मित्र परिवाराचे सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
You may like
हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने दिला 17.5 कोटींच्या खेळाडूचा बळी; IPLमधील सर्वात मोठा ट्रेड
टाटा, अदानी, मित्तल नव्हे तर मुकेश अंबानी सर्वात मोठे कर्जदार, कोणत्या कंपन्यांकडे किती कर्ज?
जम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक, 2 कॅप्टनसह चार जण हुतात्मा
ICC New Rule: क्रिकेटमध्ये आला नवा नियम, बॉलर्सचं टेन्शन वाढलं; Stop Clock आहे तरी काय?
गतवर्षी प्रमाणे यंदाही मोहर ऐवजी पालवीच का येत आहे?
भारत-कॅनडामधील आरोप-प्रत्यारोपांचा परिणाम? शेअर बाजारात मोठी पडझड, ‘हे’ शेअर्स घसरले