आरोग्य
दारुपेक्षा बदाम यकृताला जास्त हानीकारक! बदामामध्ये कॅन्सर निर्माण करणारे…सद्गुरूंनी दिला इशारा
Published
4 months agoon
By
Kokanshaktiपण सद्गुरु जग्गी वासुदेव (sadhguru jaggi vasudev) यांनी बदाम हे दारुपेक्षा यकृतासाठी हानीकारक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात की बदामामध्ये कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला तो घातक असतो. खरं तर बदाम खाण्याच्या चुकीच्या पद्धतीने हा धोका आहे. त्यामुळे बदामाचे योग्य फायदे मिळवण्यासाठी बदामाचे सेवन योग्य पद्धतीने करणे गरजेचं आहे.
बदामाचं सेवन कसे केले पाहिजे?
सद्गुरूंनी यांनी इन्स्टाग्रामवरील त्यांचा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करुन बदाम खाण्याची पद्धत सांगितली आहे. बदाम हे कायम भिजवून खाल्ले पाहिजे. बदाम रात्री झोपताना एका वाटीत भिजत ठेवायला पाहिजे. मग सकाळी उठून त्यांची साल सालून त्याचे सेवन करावे.
बदाम भिजवून खाल्ल्यास काय होतं?
बदाम भिजवून खाल्ल्यामुळे फायटिक अॅसिड नाहीसे होते. शिवाय कर्करोगाचा धोका निर्माण करणाऱ्या घटकही दूर होतो.
सद्गुरूं या व्हिडीओमध्ये म्हणतात की,”खरं तर सुकामेव्यांचा स्वरक्षणाचा आपला स्वत:चा मार्ग असतो. जेव्हा आपण बदाम भिजवतो तेव्हा त्यांना वाटतं आपल्याला आता रुजवण्यात आलं आहे. ज्यामुळे त्यांना अंकुर फुटतो. याप्रकारेच एक वृक्ष तयार होतं. या प्रक्रियेतून कार्सिनोजेनिक रसायन हे बदामाच्या सालीखाली जमा होतं. या कार्सिनोजेनिक रसायनमुळे कोणत्याही प्रकारचे कीटक बदामाचा नाश करु शकतं नाही.”
NCBI च्या अभ्यासानुसार, बदाम किंवा इतर नटांमध्ये अफलाटॉक्सिन B1 आढळून येतं. जे यकृत कर्करोगासाठी हानीकारक आहे. या रसायनामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
भिजवून बदाम खाण्याचे फायदे
1 वजन कमी होण्यास मदत होते.
2 कुशाग्र मनासाठी फायदेशीर
3 ऊर्जोचा स्त्रोत वाढण्यास मदत होते.
4 कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.
5 रक्तदाब नियंत्रणात राहतो.
6 शरीराला प्रोटीनचा मोठा साठा उपलद्ब होतो.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘कोकणशक्ती’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
You may like
‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय? वाचा यामागची लक्षणं आणि उपचार
मार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय
रक्त लाल असतं, मग आपल्या नसा निळ्या का दिसतात?
तुम्ही कच्चा कांदा खाता..? मग आधी हे वाचा, होऊ शकतो हा आजार
भात आणि चपाती एकाच वेळेस खाल्यानं काय होतं, हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा