जगातील सर्वात महाग काळा तांदूळ पनवेल जिल्ह्यात पिकतोय, कंपन्यांकडून होतेय मोठी मागणी
[ad_1]
नवी मुंबई: जगातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या व आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे औषध कंपन्यांकडून देखील मोठी मागणी असणाऱ्या काळ्या तांदळाची शेती मंडणगड तालुक्यातील भोळवली येथे करण्यात आली आहे. या गावातील तरुणांनी एकत्रित येऊन काळ्या तांदळाची शेती केली आहे, त्यांच्या या धाडसी प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भोळवली गावातील तरुण वर्ग टाळेबंदीच्या काळात शेतीकडे वळला. शांताराम सुगदरे, भावेश सुगदरे, सुनील घाडगे, संदेश सुगदरे आणि श्रीकांत कदम आणि भोळवली गावचे सरपंच रणजित कासारे यांच्या साथीने आणि अभिषेक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी काळा तांदूळ याचे पीक घेतले.
फार वर्षांपूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईसची लागवड केली जात होती. भारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. मोठ्या शहरात काळा तांदूळ किमान तीनशे रुपये ते चारशे रुपये किलो दराने विकला जातो. ॲमेझॉनसारख्या ऑनलाईन साईटवरही या तांदळाची विक्री केली जाते.
शरीरासाठी काळा तांदूळ उपयुक्त
संपूर्ण पीक हे जीवामृतचा वापर करून घेतले आहे. आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेत काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रिय पद्धतीने धान्याची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन झाले आहे.
काळ्या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँथोसायनिन असतात, काळ्या भातामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतात. हृदयासंबंधी आजारांमध्ये फायदेशीर, डायबिटीज आणि कॅन्सरवर परिणामकारक ठरते. प्रोटीन आणि आयर्न मुबलक प्रमाणात असतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो, अशी काळ्या तांदळविषयी उपयुक्त माहिती भोळवली येथील शेतकरी सुनील घाडगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
[ad_2]
Post Comment