×

लंडनची ब्लॅक टॅक्सी लवकरच भारतीय रस्त्यावर उतरणार आहे..

लंडनची ब्लॅक टॅक्सी लवकरच भारतीय रस्त्यावर उतरणार आहे..

[ad_1]

माणसाचं स्वप्न असत आयुष्यात एकदा तरी लंडन सारख्या शहरात फिरायला जावं. येथे गेल्यावर बकिंघम पॅलेस, टेम्स नदीचा किनारा,मादाम तुसाद संग्रहालय, शरलाक होम संग्रहालय, लॉर्डस क्रिकेट मैदान या गोष्टी पाहण्याचा आग्रह असतो.

मात्र याच बरोबर लंडनच्या रस्त्यावर फिरतांना डोळ्यांत एक गोष्ट भरते ती म्हणजे काळ्या रंगाची, ठुसकी टॅक्सी. ही टॅक्सी साधीसुधी नसून तिला १०० वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. आजही लंडन मध्ये या टॅक्सीने फिरणे हे अभिमानास्पद समजले जाते. ‘ब्लॅक टॅक्सी’ म्हणून ती लंडन मध्ये खूप फेमस आहे.

 आता हीच टॅक्सी भारतीय रस्त्यावर लवकरच दिसणार आहे.  

१९०८ मध्ये सुरु झालेली लंडन टॅक्सी अजूनही दिमाखात सुरु आहे  

लंडन इलेक्ट्रिक व्हेकल कंपनीची (एलइव्हीसी) स्थापना १९०८ मध्ये झाली. यावेळी फक्त काळ्या कलरमध्ये ही टॅक्सी उपलब्ध होती. सर्वसामान्य ते मोठे उद्योजक या सर्व स्थरातील प्रवासी या टॅक्सीतून प्रवास करतात अजूनही दिसतात.

२०१७ मध्ये एलइव्हीसी कंपनीने आपली आधुनिक टॅक्सी रस्त्यावर आणली आहे. ही टॅक्सी इलेक्ट्रिक आहे. यामुळे दुबई सारख्या ठिकाणी सुद्धा हिची प्रवासी सेवा सुरु झाली आहे. अमेरिका, साउथ आफ्रिका अशा अनेक देशात ही टॅक्सी प्रसिद्ध आहे. यातून प्रवास करणे अनेकांचे स्वप्न असते. 

कंपनीने आपण भारतात येणार अशी घोषणा केल्यानंतर अनेकांनी लंडनची प्रसिद्ध टॅक्सी भारतात येणार असल्याने आंनद व्यक्त केला आहे. सध्या एलइव्हीसीची मालकी Geely हा चीनच्या कंपनीकडे आहे. एलइव्हीसीने भारतासाठी एक्सक्लूसिव मोटर्स Pvt. Ltd सोबत करार केला आहे.

याचं कंपनीच्या माध्यमातून ही एलइव्हीसीची TX इलेक्ट्रोनिक कार भारतात येणार आहे. पहिल्यांदा ही टॅक्सी दिल्लीतील रस्त्यावर दिसेल. त्यानंतर हळूहळू देशभरातील मोठ्या शहरात पाहायला मिळेल.

भारताची निवड का?

एक्सक्लूसिव मोटर्स Pvt. Ltd ही कंपनी जगभरातील लग्जरी ब्रंडचे कारचे वितरण करते. याबाबत एक्सक्लूसिव मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सत्य बगला यांनी सांगितले की, सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी आहे. भारतीय बाजारात एलइव्हीसीची येण्याची ही योग्य वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या देशात कार खरेदी करतांना सर्वाधिक प्रश्न हा ‘किती मायलेज देते’ असा प्रश्न विचरण्यात येतो. त्यामुळे एलइव्हीसीच्या वतीने भारतात एन्ट्री करण्यापूर्वीच स्पष्ट केले आहे. एलइव्हीसीच्या Tx इलेक्ट्रोनिक मॉडेल एकावेळी चार्जिंग केल्या नंतर ५१० किलो मीटर जाते. त्यामुळे ग्राहकांना लांब पल्ल्याचा प्रवास करतांना सुद्धा  कुठलीही अडचण येणार नाही.

ही टॅक्सी ६ आसनी असणार आहे. दिव्यांगाना टॅक्सीत बसण्यासाठी विशेष सुविधा असणार आहे. ही टॅक्सीची बॉडी अल्युमिनियम आहे. त्यामुळे त्यामुळे टॅक्सीचे वजन बरेच कमी असणार आहे. मोठ्या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्यांसाठी ही टॅक्सी सेवा मोठी उपयोगाची असणार आहे. 

१०० वर्षानंतरही लंडनची ब्लॅक टॅक्सी प्रसिद्ध आहे. भारतातही लवकरच तिचे आगमन होणार आहे. भारतीय प्रवासी तिला कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

[ad_2]

Previous post

वीस गाड्या आणि 260 प्रवासी आणि पर्यटक वाहून नेणारी पहिली अत्याधुनिक बोट पुढील डिसेंबर पर्यंत सुरू होणार.

Next post

New Packaging Rules : दूध, चहा, बिस्कीटांसोबत एकूण 19 वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी नवे नियम, जाणून घ्या…

Post Comment