×

कासारटाका येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी | चालकला किरकोळ दुखापत

कासारटाका येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी | चालकला किरकोळ दुखापत

चौके ते कुडाळ मार्गे बेळगाव असा चिरे घेऊन जाणारा ट्रक धामापूर कासार टाका येथे पलटी होऊन अपघात झाला या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौके येथील चिरेखाणीवर चिरे भरून बेळगांव येथे वाहतूक करणारा ट्रक क्र. (KA- 22 C – 5688) हा चौकेपासून कुडाळच्या दिशेने काही अंतरावर आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने धामापूर कासारटाका परिसरातील गोडयाचीवाडी बस थांब्या नजिकच्या वळणावर रस्त्याच्या खाली जात पलटी झाला.

मंगळवार दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्रौ १० वाजता सदर अपघात झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली

Post Comment