शेतावर कापूस वेचणीसाठी गेलेल्या तरुणीवर बिबट्याचा हल्ला
[ad_1]
महागाव: शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या युवतीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करंजखंड येथे घडली. महागाव तालुक्यातील करंजखेड येथील खाली निळकंठ ठाकरे (१९) ही युवती आपल्या शेतात मजुरांसह कापुस वेचत होती, यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अकस्मात हल्ला चढविला.
यामध्ये तिच्या मांडीला गंभीर इजा झाली. या हल्ल्यामुळे मजुरांनी आरडाओरड केली. त्यामुळे विवट जंगलात पळून गेला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. जखमी युवतीला ग्रामीण रुग्णालय सवना येथे उपचारासाठी हलविण्यात आले. गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी महागाव यांना दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे, वनपाल सुरेश राठोड यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. जखमी युवतीची विचारपुस केली व नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. बिबट्याने हल्ला केल्यामुळे शेतकरी व मजूर वर्गात दहशत निर्माण झाली आहे. ऐन कापूस वेचणीत नवे संकट उभे राहिल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. विक्टाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
[ad_2]
Post Comment