×

गोवा व सिंधुदुर्गचे नाते हे ऋणानुबंधाचे…

गोवा व सिंधुदुर्गचे नाते हे ऋणानुबंधाचे…

[ad_1]

लक्ष्मीकांत पार्सेकर; बांदा येथील स्थानिकांशी साधला संवाद…

बांदा,ता.१७: गोवा व सिंधुदुर्गचे नाते हे ऋणानुबंधाचे आहे. पर्यटन, संस्कृती व शैक्षणिक क्षेत्रात दोन्ही प्रदेशात समानता आहे. आरोग्य, रोजगार व शैक्षणिक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना गोव्याची दारे ही नेहमीच खुली आहेत.

शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणारा कोकण पॅटर्न आहे. त्यामुळे भविष्यात संयुक्त विद्यमाने विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत निश्चितच प्रयत्न करू, असे आश्वासन गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले.

खासगी कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या प्रा. पार्सेकर यांनी बांद्यात काहीवेळ थांबून स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी बांद्याचे उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत, हुसेन मकानदार, निलेश कदम, श्री भक्त सेवान्यास मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, पत्रकार निलेश मोरजकर, कर सल्लागार समीर परब, रियाज खान यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

[ad_2]

Post Comment