×

32 Shirala Nagpanchami 2024: 32 शिराळा नागपंचमी….नेमक काय आहे नातं!

32 shirala nagpanchami

32 Shirala Nagpanchami 2024: 32 शिराळा नागपंचमी….नेमक काय आहे नातं!

32 Shirala Nagpanchami : नागपंचमी सणाचे विशेष महत्व हिंदू संस्कृतीत आहे, महाराष्ट्रातील असे गाव जे नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे 32 शिराळा.

श्रावण महिना म्हटलं की,अनेक हिंदू सण उत्सवाला सुरुवात होते. श्रावणातला सर्वात पहिल सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला नागाची पूजा करतात. हा सण संपूर्ण भारतात विविध पद्धतीने साजरा करतात.

32 शिराळा या नावाचा इतिहास शिवाजी महाराजांच्या काळात ला आहे. 32 शिराळ हे गाव सांगली जिल्ह्यात वसलेले असून पूर्वी याचे नाव हे ‘क्षियालय’ असे होते. शिवाजी महाराजांच्या कालखंडात या गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर सर्व खेड्यांचा मिळून महसूल जात असे. हे सर्व एकूण 32 खेडे असल्यामुळे या गावाचे नाव 32 शिराळ असे झाले.

नागपंचमी या सणाला ज्यापद्धतीने सांस्कृतिक परंपरा आहे त्याच प्रमाणे या गावाला ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की, महायोगी गोरक्षनाथांनी नागपंचमीच्या दिवसातील नाग उत्सवाला सुरुवात केली.

या उत्सवाला सुमारे हजार वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी गावातल्या कोतवाल घराण्यातील मंडळी नाग पकडण्याचे कार्य करत असे. या पकडलेल्या नागाची पूजा गावातल्या महाजनांच्या घरी केली जात होती.

नाग हे आदिमानवांचे आद्य दैवत मानले जाते. तसेच नाग हा मानव जातीचा रक्षक ही मानला जातो. गावातल्या काही लोकांच्या दबवाखाली द्रविडांच्यात नागपूजा सुरू केली गेली अशाप्रकारच्या आख्यायिका सांगितल्या जातात. आशा या पवित्र सणांचे रूपांतर अनिष्ट रूढी परांपरांमध्ये झाले आणि आजही त्याचा अवलंब केला जातो.

32 शिराळ या गावाजवळ चांदोली धरण आणि अभयारण्य आहे.त्यामुळे या भागात सर्प प्राण्याचे प्रमाण हे अधिक आहे.याठिकाणी पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने या काळात सर्प हे त्यांच्या निवास्थानतून बाहेर पडत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात नाग दिसतात.

2012 च्या आधीपर्यंत 32 शिरळा गावात नागांची शर्यत नागपंचमीच्या निमित्ताने भरवली जात होती.परंतु या खेळामुळे नागांना इजा होत त्यामुळे काही वन्यप्रेमींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि या खेळावर बंदी घालण्यात आली. परंतु याचा कोणताही परिणाम गावाच्या परंपरेवर पडला नाही.गावाने वेगळा मार्ग स्वीकारत हा सण तितक्याच उत्साहात आणि दिम्याख्यात साजरा केला जातो

Post Comment