×

ब्रिटिशांनी साऊथ इंडियाला लावला रव्याचा नाद…

british brings rava to south india

ब्रिटिशांनी साऊथ इंडियाला लावला रव्याचा नाद…

[ad_1]

रव्याचे कितीतरी पदार्थ आपल्याकडे बनले जातात, आपल्याकडे फक्त सणवार, लग्नकार्य अशा विशिष्ठ प्रसंगी बनले जातात पण साऊथ इंडियात मात्र रव्याचे पदार्थ रोजचं बनवले जातात. त्याचं लोण आता हळूहळू भारतभरात पसरत चाललय. पण एक गोष्ट तुम्हाला यात माहिती नसेल की साऊथ इंडियाला इडली, डोसा हे सगळे पदार्थ ब्रिटिशांमुळे खायला मिळाले म्हणजे थोडक्यात काय तर ब्रिटिशांनी साऊथ भूमीला रव्याचा नाद लागला आणि हा नाद अजुनही टिकून आहे हे विशेष.

तर हा सगळा काय मॅटर आहे ते आपण जाणून घेऊया. म्हणजे रोज इडली, वडा, डोसा खातो पण त्याचाही काहीतरी इतिहास असेलच की… दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. ब्रिटिशांना सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून भारताची धनधान्य भरघोस असलेली भूमी सापडली होती. शोषण करुन करुन ब्रिटिश सरकारने भारत खिळखिळा करुन टाकला होता.

ब्रिटिशांनी आजवर कुठल्याच देशातून इतकं सोनंनाणं लुटलं नसेल जितकं भारतातून त्यांनी लुटलं.

ब्रिटिशांच्या बाजूने तब्बल 2.5 मिलियन सैनिक लढले होते. पण एवढ्याने ब्रिटिशांचे मन भरेल अशी कुठलीच चिन्हे दिसत नव्हती. भारताच्या तांदूळ पुरवठ्यावर त्यांची नजर होती. तत्कालिन मद्रासच्या मोक्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने तांदूळ पिकवला जात असे आणि युध्दाच्या काळात हाच तांदूळ सैनिकांचं जेवण म्हणून वापरायचं ब्रिटिश सरकारने ठरवलं.

आजच्या काळात तामिळनाडूतील एक महत्वाचं शहर म्हणजे तत्कालिन मद्रास, नॉर्थ केरळ मधील मलबार रिजन, लक्षद्वीप बेटे, आंध्रा प्रदेशचे द कोस्टल आंध्रा आणि रॉयलसीमा रिजन, ओडीसाचे ब्रम्हपूर आणि गंजम जिल्हा, दक्षिण कन्नडच बेल्लारी, कर्नाटक राज्याच उडुपी हि सगळी फेमस शहर आहेत फक्तं तांदूळ आणि रव्यासाठी. 

इथच मोठ्या संख्येने इडली डोसा बनवला जातो आणि एक्सपोर्ट केला जातो. साऊथ इंडियाचा हा सगळयात मोठा पट्टा म्हणजे हि शहरं. मेन म्हणजे या शहरात तांदूळ जास्त पिकत नव्हता. आधीच पीक लागवड कमी आणि युद्धाची भयंकर परिस्थिती होती म्हणून ब्रिटिशांनी काय केलं तर म्यानमार देशातून तांदूळ इम्पोर्ट करायला सुरवात केली. 

त्याचवेळी जपानने म्यानमारवर अटॅक केला आणि ती तांदुळाची रसद बंद पाडली. त्यामूळे मद्रास मध्ये राईस शोर्टेज निर्माण झालं आणि कुठून तांदूळ इम्पोर्ट सुद्धा करता येईना. इडली शोर्टेज निर्माण झालं. आता एखादा कट्टर मद्रासी इडली शिवाय कसा राहील बर ? तेव्हा लग्नात सुद्धा याचा परिणाम जाणवला. वऱ्हाड म्हणून येणाऱ्या नातेवाईकांवर कपात लावण्यात आली, कारण एवढा तांदूळ आणणार कुठून? 

50 लोकं फक्त लग्नाला येतील हे लॉक डाऊन मधे आपण पाहिलं पण हे आधी होऊन गेलेलं कांड आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली होती काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. राईस मिळावा म्हणून रेशन कार्ड इश्यू करण्यात आले.

ब्रिटिशांनी ठरवलं की तांदुळाची कमी दुसर कुठलं तरी पीक भरून काढेल आणि त्याला पर्याय देण्यात आला रवा.

झालं ब्रिटिशांनी रव्याची डेंजर पब्लिसिटी केली. लोकांना ते सांगु लागले की तांदुळापेक्षाही रवा हा शरीरासाठी जास्त आरोग्यदायी आहे. सगळया साऊथ इंडियाला त्यांनी रव्याच महत्व पटवून दिलं. ब्रिटिशांनी एक निरीक्षण केलं होतं ते म्हणजे तांदूळ इथले लोक जास्त प्रमाणात खातात, चपाती इथ जास्त प्रचलित नाही त्यामूळे रवा हा तांदळासारखा खाता येऊ शकतो आणि त्यादृष्टीने त्यांनी प्रचार सुरू केला. दरम रवा, पास्ता रवा बनवून ब्रिटिश लोकांना कन्विंस करु लागले.

रवा हा मग सणावाराला वापरला जाऊ लागला. पोंगलच्या दिवशी लोकं रव्यापासून इडली, डोसा बनवू लागले.  मवाली टिफीन रूम ( MTR ) रव्याचे पदार्थ कामगार लोकांना डब्यातून देऊ लागली.अशा प्रकारे रवा हा कायमचाच हिट होऊन बसला तो आजही हिटच आहे. आजही आपण सकाळी सकाळी रव्याचा डोसा बनवून खातो त्यालाही ब्रिटिशच कारण आहे 

[ad_2]

Post Comment