मुख्यमंत्र्याना माझे काका म्हणणारी चिमुकली अंशिका आहे तरी कोण?
सोशल मीडियावर वायरल होण्याच ट्रेंड भारतात खूप आहे. असाच एका चिमूकलीचा विडियो सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होतोय अर्थात हा विडियो इतका सुंदर आहे की तुम्ही पण पाहिलात की नक्कीच त्या चिमूकलीच्या निरागासपणाने भारावून जाल.
पुणे मध्ये राहणारी अंशिका शिंदे विडियोमध्ये चक्क मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना माझे काका आहेत असे म्हणते आहे आणि त्यांना माझे नाव नका सांगू, असे ती म्हणते आहे.
हे पण वाचा: ए बी डिविलियर्स ने देखील मारला नाही असा फटका Tik Tok वरील एका मुलाने मारला
मा. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे तसेच मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी वारंवार स्वछतेचे महत्व आपल्याला पटवून देत आहेत आणि दुसऱ्या व्यक्तिशी बोलताना किंवा काही देवाण – घेवाण करताना सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला देतात. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत होईल.
त्याच अस झाल अंशिकाच्या आईने तिला दूध वाल्याचे पैसे देण्यास हातात दिले, आणि ते त्या चिमुकलीने दूध वल्याच्या थेट हातात दिले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान वारंवार देत असलेल्या सूचनाचा त्या चिमूकलीला विसर पडला, त्यावर त्या चिमूकलीच्या आईने तिचा धडा घेतला आणि अंशिकाला ठणकावल तुझ नाव आता मोदीजीना सांगते.
त्यावर अंशिका ढसा ढसा रडू लागली, आईने विचारले की मोदीजी तुझे कोण आहेत, तर अंशिका म्हणाली माझे बाबा आहेत, आणि उद्धवजी माझे काका आहेत. मला अस करायच नव्हत, मी पुन्हा अशी चूक नाही करणार, अस म्हणत ती चिमुकली रडत होती.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
हा अंशिकाचा वायरल झालेला विडियो मुख्यमंत्र्यांजवळ पोहोचला आणि त्यांनी थेट त्या चिमूकळीच्या वडिलांना संपर्क साधला आणि गंमतीने म्हणाले “तुम्ही आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता?”
अंशिकाच्या वायरल विडियो सोबत आता मुख्यमंत्रीयबरोबरचे संभाषण देखील वायरल होत आहे.
Post Comment