Connect with us

ब्लॉग

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि त्यांची महती

Published

on

maharashtratil sade tin shakti pithe

महाराष्ट्रातील सडे तीन शक्तीपीठे, हे तुम्ही बोलून चालून ऐकलीच असणार ! तर शक्तीपीठ म्हणजे काय?  आणि कोणकोणती शक्तीपीठे  महाराष्ट्रात आहेत या सर्वांचा आढावा आज आपण या लेख मध्ये घेणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये सडे तीन शक्तीपीठे आहेत. त्यात कोल्हापूरच्या महालक्ष्मीला पहिले शक्तीपीठ मानलं जातं, माहूरगडची रेणुकामाता आणि तुळजापूरची तुळजा भवानी यांना दुसरे व तिसरेपीठ संबोधले जाते तर स्पतशृंगगडची देवी श्री सप्तशृंग देवीला अर्धेपीठ म्हटले जाते.

पहिले शक्तीपीठ

श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

भारतीय माणसाचा थोडा सखोल अभ्यास केलातर प्रत्येक भारतीय  आपल्या जीवनात काशी यात्रा झाली की जीवनाची सांगता फलश्रुती झाल्याबद्दल स्वतःला धान्य मानतो. “काशीस जावे नित्य पादावे” अशी म्हण आहे. परंतु याच प्रसिद्ध असलेल्या उत्तर काशीमधून फार प्राचीन काळी, अगस्ती ऋषी मुनी क्रोधाने बाहेर पडले. परंतु दुःखामुळे  त्यांना प्रवासात मूर्च्छा येऊ लागली तेंव्हा त्यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. तुझा वियोगाने मला अतीव दुःख झाले आहे. मी काशीला परत येणे अव्यवहारिक आहे तेव्हा तुमचे वास्तव्य असणारे स्थान मला सांगा. तेव्हा भगवान शंकराने साक्षात्कार देऊन वर्णन केलेली ही करवीनगरी – कोल्हापूर म्हणजे दक्षिणकाशी होय.
 
 ज्या क्षेत्रात श्री महालक्ष्मीचे वास्तव्य आहे तिथे सर्वप्रकारची तीर्थक्षेत्र आहेत, ते महामातृक उत्तर काशीपेक्षा श्रेष्ठ स्थान याला यवाधिक काशी असेही संबोधतात. ही नागरी एक शक्तीपीठ आहे. पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली. या नगरीचा उल्लेख १८ पुराणांपैकी काशीखंड, पद्मपूराण, देवी भागवत, हरिवंशपुराण, स्कंधपुराण, मार्कंडेयपुराण, भारत इ. स. पूर्वी ४ ते ५ शतकापूर्वीचा आहे. भगवान परशुरामांच्या काळात ही नागरी असावी असा संशोधकांचा कयास आहे. कुमाउन प्रांतातील, कामेश्वरीपीठ, माहूरगडाचे मातापीठ, नाशिकजवळील सप्तशृंगीपीठी, तुळजापूरचे रामायण काळात भवानीपीठ याबरोबर यानगरीचा कालावधी मानला जातो. अगस्तीमुनी व लोपामुद्रा यांच्या आगमनाने या नगरीला यवाधीक काशी असे नाव पडले.
 
या प्राचीन नगरीचा पंचक्रोशीत प्रयाग, काशी, रुद्रगया ही तिन्ही पवित्र स्थळे आहेत. अशाच एका प्रसंगी लक्ष्मी आणि शंकर, करवीर आणि काशी यांच्या श्रेष्ठत्वाबद्दल संवाद झाला. या करवीर नगरीचे श्रेष्ठत्व अधिक ठरल्याचे इतिहास सांगतो. अशा या दक्षिण काशीत मानिकाकर्णिका, सेतुबंध, गोकुळ, कुरुक्षेत्र, श्री शैल्यद्री इ. तीर्थक्षेत्रे आहेत. हे क्षेत्र कृतयोगी ४८ योजने, त्रेतायोगी २४ व द्वापरयुगी १२ योजने परिघाचे पुण्यक्षेत्र होते. गुरुद्वारांगायन, महाप्राशन, चौयीमित्रघात, ब्रम्हहत्या, स्त्रीहत्त्या, राजवधुगोहत्त्या, पितृवध, इ. घोर पातकांपासूनही या नगरीत वास्तव्याने मुक्ती मिळेल असा पौराणिक उल्लेख आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर व मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती याची स्थापना केव्हा झाली, कशी झाली व कोणत्या पद्धतीने झाली हे प्रश्न सामान्य भक्तांना निर्माण होतात. अथार्त त्याप्रमाणे निश्चित ठामपणे सांगता येण्यासारखा पुरावा इतिहास संशोधकांना उपलब्ध झालेला नाही. तथापि विविध शिलालेख, कागदपत्रे, ऐतिहासिक पुरावे घेऊन मंदिराची अतिप्राचीनता सिद्ध होते.
 
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी हे प्रमुख शक्तीपीठ आहे. देवीची मूर्ती रत्नशिलेची आहे. अंदाजे वजन ४० किलो असून त्यामध्ये हिरकखंडमिश्रित द्रव्य असल्याचे संशोधनावरून सिद्ध झाले असून मूर्तीचा आकार, हा साळुंखीच्या आकाराप्रमाणे असून ती दगडी चबुतऱ्यावर उभी आहे.  मूर्तीच्या मध्यावर पदरागिणी असून ती नैसर्गिक आहे. मूर्ती चतुर्भुज असून हातात वेटक, ढाल, खाली असलेल्या उजव्या हातात म्हाळुंग, डाव्या हातात पानपात्र आहे. मस्तकावर मुकुट असून त्यावर शेषशाईने छाया धरली आहे. संशोधकांच्या मते या प्राचीनता ५ ते ६  हजार वर्षांपूर्वी सिद्धता सांगते. इ.स. ३० व्या वर्षांपासून शालिवाहन राजाचा अंमल होता. इ.स. १०९ मध्ये राजा कर्णदेव कोकण प्रांतातून कोल्हापुरात आला. त्यावेळी हि मूर्ती एका छोट्या मंदिरात होती. हा सर्व भाग अरण्याचा होता. त्यावेळी कर्णदेवाने हे मंदिर आजूबाजूचे जंगल तोडून उजेडात आणले. तेथे घुमटी बांधून त्यात हि देवीची मूर्ती पुढे ठेवली. सध्याचा मुख्यभाग इ.स. ६०० ते ७०० या शतकात असल्याचे दाखले मिळतात. परंतु ९८० या शिलाघराने दिलेला ताम्रशासन आणि राष्ट्रकुल राजा पहिला अमोघवध यांनी इ.स. ७९३ मध्ये ठाणे जिल्ह्यात संजान गावी मिळालेला ताम्रपट हे दोन प्राचीन पुरावे.
 
१७ व्या शतकानंतर विविध राजघराण्यातील थोर मंडळींनी या मंदिराला भेटी दिल्या. पुढे या देवीचे भक्त साऱ्या भारतभर झाले. त्यामुळे प्रतिदिनी देवीला पाद्यपूजा, महापूजा, कुंकुमार्चन, रुद्रभिषेक यामुळे मूर्तीची झीज होऊ लागली. कुंकुवात असणारे हैड्रोक्लोरिक सल्फ्युरिक ऍसिड यामुळे मूर्तीची झीज होऊ लागली. त्यावेळी शंकराचार्य करवीर संकेश्वराचे शंकराचार्य आदि विद्वान मंडळींनी शास्त्रोक्त आधार देऊन हा वाद मिटवला. अखेर आवारातील राममंदिरा समोर विविध यज्ञ, गणेश याग, शतचंडी, सहस्रचंडी, महायाग आदी होमहवन श्री श्यामराव सॅडलगेकर जोशी यांच्या पौरहित्याखाली कोल्हापूरचे छत्रपती शहाजी राजे यांच्या हस्ते फाल्गुन शुद्ध तृतीय (सोमवार अमृतसिद्धी योगावरून) सॅन १९५४ मध्ये मूर्तीला वज्रलेप करून पुन्हा मूर्ती पुनर्स्थापित करण्यात आली.
 
सन १९६० मध्ये श्री लोहिया यांच्या देखरेखीखाली मंदिराचा कायापालट सुरु करण्यात आला. मंदिराच्या चारही दरवाजांच्या आतील आठमुड्या ठिकाणी उभी असलेली लहान लहान मंदिरे एका रांगेत पूर्ववत उभी करून मंदिरातील दगडी कपाऱ्या काढून सिमेंट काँक्रीट चे ओतीव काम केले. त्यामुळे मंदिराचा आवार मोठा दिसू लागला. मंदिराच्या आवारात सध्या सात दीपमाळा, पाच प्रमुख मंदिरे आहेत. तसेच सभोवताली लहान मूर्ती ३५ देवालये असून २५ लहानमोठी दुकाने आहेत. मंदिरात ५ शिखरे असून मंदिर हेमाडपंथी बांधकामाने बांधले आहे. मूळ मंदिराला जोडून एक सभामंडप असून त्याला गरुडमंडप म्हणतात. मंदिराच्या सभोवताली २५० लहान लहान मंदिरे असून कोल्हापुरात एकूण ३००० मंदिरे आहेत. संपूर्ण धार्मिक वातावरणात व इतिहासकालीन राजे लोकांची ही देवता महाराष्ट्रातील तसेच भारतातील लाखो लोकांची कुलस्वामिनी आहे.
 

दुसरे शक्तीपीठ

श्री रेणुकामाता, माहूरगड 

महाराष्ट्रातील सडे तीन शक्तिपीठातील एक पूर्ण पीठ म्हणून माहूरगड निवासणीची रेणुकादेवी किनवर तालुक्यातील (जिल्हा नांदेड ) श्री देव माहूर हे स्थान डोंगर पठारावर असलेले असून अनुसया व दत्तात्रयाचे निवासस्थान आहे.
 
एकदा जमदग्नी ऋषी आपल्या आश्रमामध्ये ध्यानस्थ बसले होते. त्रासेनजित राजाने कन्याकामेष्ठी यज्ञ केला होता. त्यातून रेणुकेने जन्म घेतला तिला कामली हे दुसरे नाव आहे. लग्नाच्या स्वयंवरावेळी तिने ऋषी जमदग्नींना पती म्हणून पसंद केले. आर्यकन्या ऋषी पत्नी झाली त्यांना रुमावंत, सुवेण, वसू, विश्वास आणि परशुराम अशी मुले झाली. रेणुका रोज नदी वरून ताजे पाणी घेऊन येत असे. एकदा स्वर्गस्य गंधर्व अप्सारांबरोबर जलक्रीडा करताना पाहून ते बघण्यात तिचा वेळ गेला आणि आश्रमामध्ये परतायला उशीर झाला. जमदग्नींनी क्रोधीत होऊन मुलानांच आपल्या मातेला देहदंडाची शिक्षा देण्यास सांगितले. परंतु चारही मुलांनी नकार दिला. परंतु परशुरामांनी वडिलांची आज्ञा पाळली आणि मातेचे शीर धडावेगळे केले. जमदग्नी प्रसन्न होऊन परशुरामाला वर माग असे म्हणाले तेव्हा परशुरामांनी आईला पुन्हा जिवंत करण्याचा वर मागितला. रेणुका पुन्हा जिवंत झाली. रेणुका आणि जमदग्नीच्या काळात दैत्य कुळातील राजा सहस्त्राजुन हा अत्यंत उन्मत होता.ऋषी जमदग्नीकडे सर्वांची मनकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय होती आणि राजा सहस्त्राजूनला त्या गाईची मोह अनावर झाला नाही त्याने वेळ साधून पराक्रमी परशुराम नसताना, आश्रमावर हल्ला करून जमदग्नीचा वध  करतो आणि कामधेनू ला घेऊन जातो. परशुरामाला हे समजताच तो क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा करतो. जमदग्नींना अग्नी देण्यासाठी त्याला कोरी भूमी हवी असते म्हणून परशुराम कावडीच्या एका पारड्यात पित्याचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात आई रेणुकेला बसवितो. परशुराम भटकत भटकत माहूरगडवर पोचतो. माहूरगडावर दत्तत्रयांचे वास्तव्य होते, त्यांनी परशुरामाला कोरी भूमी दाखवली व ‘इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर’ असे सूचित केले, असे सांगितले जाते. परशुरामांनी प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ तयार केले आणि त्यापाण्याने स्नान घालून पित्यावर अंतिमसत्कार केले. त्याच वेळी ऋषी जमदग्नीच्या च्या पत्नी रेणुका सती गेल्या.

परशुरामांना माता रेणुका अतिशय प्रिय होती, आईच्या आठवणीने परशुराम शोक करीत होते, त्याच वेळी आकाशवाणी झाली, “तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. परंतु आईच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या परशुरामांनी मागे वळून पहिले. रेणुका मातेचे मुखच जिमिनीतून बाहेर आले होते आणि परशुरामास तेवढेच दिसले. मातेच्या तांदुळरूपातल्या मुखाची माहूरगडावर पूजा होते. परशुरामांनी ह्या गडावर मातेचे दर्शन केले म्हणून त्याला “मातापूर” असे नाव पडले, तसेच शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर ‘ नावाचे गाव होते त्यावरून  ते ‘ माऊर‘ झाले आणि त्याचे पुढे ‘माहूर‘ झाले.

तिसरे  शक्तीपीठ

श्री तुळजाभवानी माता, तुळजापूर 

जयभवानी या एका शब्दाने मराठी मावळ्यांना स्फूरण देणारी, छत्रपतींना भावना तलवार देणारी भवानीमाता म्हणजे तुळजाभवानी सोलापूरच्या जवळ बालाघाट डोंगराच्या पठारावर वसली आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील पूर्ण पीठ म्हणून या देवीकडे पाहिले जाते.

तुळजाभवानीबद्दल स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये एक कथा सांगितली आहे. कृतयुगाचा काळात दंडकारण्यातील दिडीर वाणाच्या सीमेवरील निसर्गरम्य तपोभूमीत कर्दम नावाचे सत्वस्य तपोधिनी ऋषी राहत होते. त्यांची पत्नी सुशील व रूपसुंदर होती. त्यांना एक पुत्र होता. दुर्दैवाने तिला वैधत्व प्राप्त झाले. तिला अतिव दुःख होऊन मंदाकिनी नदीच्या परिसरात तिने घोर तपश्चर्या आरंभली. एका कुकर नावाच्या राक्षसाची तिच्यावर दृष्टी पडली. ती समाधी अवस्थेत असताना या कुकर राक्षसाने आसक्त होऊन तिला स्पर्श करताच तिची समाधी भांग पावली. तिने आदिशक्ती जगदंबे ला हाक मारली. आदिशक्तीने कुकर राक्षसाशी घनघोर युद्ध आरंभले. तो राक्षस महिष रूप घेऊन लढत असतानाच देवीने अश्विन शुद्ध दशमीला त्याचा वाढ केला. अनुभूतीच्या आपत्काळी, त्वरित धावून आलेली, रजोगुणाधिष्टित महाशक्ती म्हणजेच तुळजाभवानी, महिषासूर मर्दिनी होय. भक्तांच्या हाकेला धावणारी आई म्हणून तिला त्वरित पुढे तुराजा आणि कालांतराने तुळजाभवानी हे नाव प्राप्त झाले.

सोलापूर पासून सुमारे ४६ कि. मी. वर असलेल्या तुळजापूर शक्तीपीठात पोहचण्यासाठी बऱ्याच पायऱ्या उत्तराव्या लागतात. प्रथम नारदाच्या मूर्तीचे दर्शन घडते. मग डाव्याहाताला पुष्पकर्णी म्हणजेच कल्लोळ तीर्थ लागते. तिथेच समोर गोमुख तीर्थ नजरेस पडते. नंतर निंबाळकर दरवाजा उजव्या हाताला गणेश मंदिर आणि नंतर तुळजाभवानी मंदिर आणि उंच चांदीच्या सिंहासनावर आई भवानीची देखणी मूर्ती नजरेस पडते. हि मूर्ती काळ्या शाळीग्राम शिळेची असून सिंहवाहीने आहे. ती अष्टभुजा असून तिच्या पायाखाली महिषाचे शव असून जवळच त्याचे शीर पडले आहे. मातेने आपल्या डाव्याहाताने त्याची शेंडी पकडली असून उजव्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूल खुपसले. इतर हातात आयुधे, पाठीवर भाला आहे. खार तर एकदा प्रतिष्ठापना केलेली मूर्ती हलवीत नाहीत. परुंतु ही मूर्ती चल आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष हलवितात. नवरात्र महोत्सवापूर्वी कृष्णपक्षाच्या कालाष्टमीला तुळजाभवानीची मूर्ती शेजगृहात निद्रेसाठी हलविण्यात येते. वर्षातून तीन वेळा देवी निद्रा घेते. भाद्रपद कृष्ण अष्टमी ते अमावस्या, अश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी असे देवीचे तीन निद्राकाळ आहेत.

नवरात्र हा मातेचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव असतो. नवरात्रीत रोज महापूजेबरोबरच देवीचे वाहन बदलून तिला सप्तचंडीचे पाठ करतात. अष्टमी नवमीला होम होतो. शिलंगणाचा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नवरात्रीमध्ये या देवीचे रूप अद्भुत दिसते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य निर्माण करणारे संस्थापक शिवछत्रपती आणि समर्थ रामदासांची आराध्य दैवत आहे. हि देवता भक्तांना सौख्य, आनंद, वैभव देणारी असून पराक्रमी पुरुषांना सामर्थ्य देणारी आहे.

अर्ध्ये शक्तीपीठ

श्री सप्तशृंगी  देवी, सप्तशृंगगड, वाणी  

गाथा सप्तशक्ती मध्ये वर्णन केल्याप्रमाणे सप्तशृंग शक्तीपीठ त्रवणकार अर्धा मात्रा स्वरूप परमपवित्र दिव्य शक्तीपीठ समजले जाते. नाशिक जिल्ह्यात उत्तरेस सुमारे ४३ कि. मी. अंतरावर चांदवड डोंगराच्या रांगेत सप्तशृंग गड आहे. इंद्रायणी, कार्तिकेयी, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा, नारसिंह , आणि सप्तशृंग या सात देवता सात शिखरावर वास्तव्य करून आहेत.या गडाच्या पायथ्याशी वणी गाव आहे. त्यामुळे सप्तशृंगी मातेला वणीची देवी असेही म्हणतात. ४५९ दगडी पायऱ्या चढल्यावर प्रथम गणेश कुंड लागते आणि त्यामुळे यादेवीची भव्य मूर्ती दिसते. शिखरांच्या मधोमध कळ्यांमध्ये जगदंबे चे पवित्र स्थान आहे. पहाडामध्ये १८-१९ फूट उंचीची कपार असून तेथे महिरपी खडकात ही मूर्ती कोरली आहे. तिथे प्रदक्षिणा घातली जात नाही. ही मूर्ती १०-१२ फूट उंचीची असून तिला १८ हात आहेत. माणिक, माल, कमल, बाण, खड़ग, वज्र, गदा, चक्र, त्रिशुल, कुऱ्हाड, शंख, दंड, घंटा, ढाल, धनुष्य, पानपात्र, धनुष्यबाण, तलवार व कमंडलू अशी विविध आयुधे प्रत्येक हातात आहेत. ही जगदंबा असुरमर्दनार्थ अवतरून तिने शुभंनिशुभं व महिषासुर यांचा वाढ केल्याने तिचे उग्र रूप आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची मान दक्षिणेकडे झुकली आहे. कपाळावर खूप मोठे कुंकू, रेखीव भुवया, नाकातील नाथ डोक्यावर मुकुट यामुळे मातेचे रूप आकर्षक वाटते. मूर्ती शेंदुरी रक्तवर्णी आहे. मूर्तीचे तेजस्वी डोळे द्रुष्टांचा थरकाप उडवतात.

या देवीची दिवसातून तीन वेळा तीन रूपे दिसतात. सकाळी बालिका दुपारी तरुण, संध्याकाळी वृद्ध दिसते. स्त्रीच्या जीवनातील तीन रुपचं जणू तिच्यात एकवटली आहेत. चैत्र पौर्णिमा आणि नवरात्र असे वर्षातून दोन उत्सव मोठ्या प्रमाणावर होतात. नवरात्राचा दिवस १० दिवसांचा असतो. देवीची पालखी निघते शतचंडीचा यज्ञ होतो. या सात पर्वत शिखरांवर सप्तशृंगी विराजमान झाली आहे. त्या शिखरांवर जाणारी वाट अत्यंत अवघड आहे. एक शिखर ४७५५ फूट उंच. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिथे पहिल्यांदा भगवा ध्वज लागतो व नवरात्रीचा प्रारंभ हतो व नवरात्रीच्या दिवसात इथे अत्यंत धार्मिक वातावरण असते. रोज संध्याकाळली मुली आणि स्त्रियांसाठी भोंडला होतो.

हे नाथ संप्रदायाचे आराध्यदैवत आहे. ज्ञानेश्वरांनी निवृत्तिनाथांनीही या देवीची जत्रा केली होती. चंद्रधार स्वामी,
समर्थ रामदास, शिवाजी महाराज यांनीही सप्तशृंगीचे दर्शन घेतल्याची नोंद इतिहासात आहे.

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग डोंगरावरी तेथे तू राहसी, भोवती नानापरी वो जाई-जुई, शेवंती, पूजा रोखली वो भक्त संकटी पडतो झेलुनी घेसी वरचे वारी वो 

या आरतीत वर्णनाप्रमाणे देवी संकटे निवारण करते. या साडेतीन पिठांची माहिती अद्भूत आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *