×

उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर!

lonar lake

उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर!

जगात चमत्कारांचे दोन प्रकारआहेत, एक मानव निर्मित चमत्कार तर दुसरा नैसर्गिक चमत्कार. त्यातील लोणार सरोवर हे नैसर्गिक चमत्कारामध्ये मोडते. निसर्गहाही  चमत्कार घडविणारा अवलियाच आहे.

मग गगनाला गवसणी घालणारे उंचच उंच पर्वत असो की  अरबस्तानातील विशाल वाळवंट असो. लोणार सरोवर हे देखील निसर्गाने घडविलेला चमत्कारच म्हणावा लागेल आणि हा चमत्कार महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे झालाआहे.

लोणार म्हणजे काय?

लोणार हे जगातल सर्वात मोठं अंडाकृती सरोवर आहे. उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली आहे. आपल्याला माहीतच असेल की  पृथ्वीतलावर असंख्य उल्का  पडत असतात. पण त्या पृथ्वीवर  पोहोचण्यापूर्वीच जळून राख होतात.

हे पण वाचा: ओझोनच्या थराचे छिद्र आश्चर्यकारक रित्या बंद झाले!

लोणार सरोवर कसे तयार झाले?

परंतु बावन्न हजार वर्षांपूर्वी किंवा त्याही पूर्वी वीस लाख टन वजनाची उल्का पृथ्वीवर 90 हजार किलोमीटर वेगाने येऊन आदळली आणि त्यामुळे पृथ्वीवर प्रचंड मोठा , १.८ किलोमीटर व्यासाचा व 200 मिटर खोलीचा खड्डा तयार झाला. हेच ते  लोणार सरोवर. परंतु अग्निजन्य जन्य  खडकातलं खाऱ्या पाण्याचं जगातल्या एकमेव सरोवराची देणगी लाभलेल लोणार सरोवर आहे. 

पृथ्वीवर उल्कापातामुळे निर्माण झालेली सरोवरे?

त्यावेळी झालेल्या उल्कापातामुळे पृथ्वीवर एकूण चार सरोवरे निर्माण झाली. त्यापैकी  अमेरिकेमध्ये  दोन ,ऑस्ट्रेलिया  येथे  एक  व भारतातील आपल्या महाराष्ट्रात लोणार येथे एक आहे. निसर्गाकडून आपल्याला  मिळालेली अनमोल भेटच म्हणायला हरकत नाही. सरकारने, आपल्या लोणार सरोवराला राष्ट्रीय भू वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. 

बुलढाणा जिल्ह्यामध्ये बेसाल्ट जातीचा खडक सापडतो. कारण त्याकाळी अंनत ज्वालामुखी होत असत. त्यातूनच याखडकाची निर्मिती झाली असावी. कालांतराने उल्का पातामुळे या ठिकाणी  अग्निजन्य खडकामध्ये लोणार सरोवराची निर्मिती  झाली असावी. या सरोवरातले पाणी आश्चर्यकारकपणे खारे  आहे. 

लोणार सरोवराच्या दंत कथा

अशा नैसर्गिक चमत्कारांमागे काही दन्त कथा ही असतात. अशीच एक कथा या लोणारसरोवरा मागे सुद्धा सांगितली जाते. श्री भगवान विष्णूनी लवणासूर नावाच्या दैत्याचा वध केल्याने लवणासुराच्या नावावरून या ठिकाणाला लोणार हे नातव पडले असावे असे काहींचे मत आहे. 

या सरोवरातील पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने या पाण्यात एकही  जलचर नाही. असे असले तरी हे पाणी त्वचाविकारासाठी खूप गुणकारी आहे. यासरोवराच्या परिसरात अनेक औषधी वनस्पती देखीलआहेत. येथील परिसरात सुमारे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत, त्यातील जवळजवळ पंधरा मंदिरे सरोवराच्या परिसरातच आहेत.

ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर याने इ.स.  १८२३ मध्ये या सरोवराची नोंद केलेली आहे. सध्या या सरोवरातील पाण्याची पातळी कमी होताना दिसते आहे. त्यामुळेच यासरोवरात असलेल्या सासूसुनेच्या विहिराचाही शोध लागला आहे.

या विहिरीतील देवीच्या मंदिराकडील विहिरीचे पाणी गोड  आहे तर त्याच्या विरुध्द्व दिशेचे पाणी खारट आहे. म्हणूनच या विहिरीला जलतिर्थ व मोक्ष तीर्थ असेही म्हटले जाते. या सरोवराची सुंदरता , तेथील  विहिरी , औषधी वनस्पती या साऱ्या मुळे जगभरातील पर्यटक येथे आल्याशिवाय  रहात नाहीत.

यासरोवराला एकूण पाच नैसर्गक स्रोत आहेत, परंतु आता यापैकी दोन स्रोत बंद पडले आहेत. कारण सरकारने बंदी करूनही शंभर मिटर च्या परिसरात बांधकामे करण्यात आली आहेत. खूप खोलीच्या बोअरवेल्स  ही  मारण्यात आलेल्या आहेत याचाच परिणाम म्हणून या सरोवरातील पाण्याची पातळी कमी झाल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. 

तर मित्रांनो तुम्हीही या जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवराला एकदा तरी अवश्य भेट द्यायला विसरू नका आणि लोणारसरोवरा विषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि अशा प्रकारची नवनवीन माहिती मिळविण्यासाठी कोकणशक्तिला फेसबुकवरती लाईक करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा.

Post Comment