Connect with us

तंत्रज्ञान

Video: भारधाव वेगात कारने पावसाचं पाणी उडवण्याचा मोह भोवला! भीषण अपघात कॅमेरात कैद

Published

on

[ad_1]

Car Accident Shocking Video: पावसाळ्यामध्ये वाहानांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं. देखभालीबरोबरच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर कार किंवा बाईक चालवतना अधिक सतर्क राहाणं आवश्यक असतं. मागील काही दिवसांपासून भारतामधील अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत असताना अनेक ठिकाणी गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलं. अनेक मार्गाही पाण्याखाली गेले. या पावसाचा फटका बसल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. अगदी वाहून जाणाऱ्या गाड्यांपासून ते रस्त्यावर फिरणाऱ्या मगरींपर्यंतचे व्हिडीओ पाहायला मिळाले. खरं तर पावसाळ्यामध्ये गाडी चालवताना अधिक सावध राहणं आवश्यक असतं. भारतामध्ये तर खड्डे आणि रस्त्यांवर साचणारं पाणी पाहता अधिक काळजी घेतली पाहिले. मात्र सर्वजण इतकी काळजी घेऊन वाहन चालवतात असं नाही.

अशी गाडी चालवणं धोक्याचं

अनेकदा वाहनचालक बेदरकारपणे गाड्या चालवताना दिसतात. साचलेल्या पाण्यामधून इतरांवर पाणी उडवत अत्यंत वेगाने जाणाऱ्या गाड्या पाहून कशासाठी जीव धोक्यात घालतात हे लोक असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांनी उडवलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्यांही त्रास सहन करावा लागतो. मात्र अशाप्रकारे वेगाने गाडी चालवणं धोक्याचंही ठरु शकतं. अशाप्रकारे अत्यंत वेगाने साचलेल्या पाण्यामधून कार चालवणं एकाला फारच महागात पडलं. साचलेल्या पाण्यातून भरधाव कार चालवत वळण घेण्याचा प्रयत्न करणारी एक कार पलटल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

..अन् कार पलटली

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, रस्त्यावर पाणी साचल्याचं दिसत आहे. या रस्त्याच्या कडेला उभं राहून शूट केलेल्या व्हिडीओमध्ये दुरून भरधाव वेगात एक कार येताना दिसते. कार एवढ्या वेगाने साचलेल्या पाण्यातून येते की दोन्ही बाजूला या पाण्याची कारंजी उडतात. मात्र वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटतो आणि कार रस्त्याच्या उजव्या बाजूला सरकू लागते. अखेर ही कार रस्त्यावरुन खाली उतरून पलटते.

हायड्रोप्लॅनिंगमुळे झाला अपघात

“कारचा हा अपघात हायड्रोप्लॅनिंगमुळे झाला आहे. जेव्हा कारचे टायर्स आणि रस्त्याच्या पृष्ठभागादरम्यान पाण्याचा एक पातळ पडदा तयार होतो तेव्हा कार घसरते. यालाच हायड्रोप्लॅनिंग म्हणतात. त्यामुळेच रस्ता ओला असेल तर वाहनाचा वेग कमी करा आणि गाडी रस्त्यावर ग्रीप धरुन ठेवेल याची काळजी घ्या,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गाडी रस्त्याच्या बाजूला पलटते तेव्हा ती गवत चरणाऱ्या एका गायीपासून अवघ्या काही अंतरावर उलटून पडते. या अपघातामध्ये गाडीमधील लोकांचं काय झालं याची माहिती समोर आलेली नाही.

या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. व्हिडीओला 3 लाखांहून अधिक लाईक्स आहेत. या वाहनचालकाला फार अनुभव नसेल असं अनेकांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *