×

युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू

युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू

[ad_1]

रशियाने युक्रेनवर आक्रमण करून (रशिया-युक्रेन युद्ध) एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. याठिकाणी अजूनही लढाई सुरू आहे. दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिक मरण पावले आहेत, तर अनेक निष्पाप युक्रेनियन नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. रशियाच्या हल्ल्याने उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनमधून क्रीडा जगतासाठी एक धक्कादायक बातमी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या दोन व्यावसायिक फुटबॉलपटूंचा मृत्यू झाला आहे . व्यावसायिक फुटबॉलपटूंची जागतिक संघटना असलेल्या फिफप्रो (FIFpro) ने गुरुवारी (३ मार्च) एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. त्यानुसार रशियाच्या हल्ल्यात विटाली सपिलो (२१) आणि दिमित्रो मार्टिनेन्को (२५) यांना जीव गमवावा लागला. ही या संघर्षात फुटबॉलपटूंच्या मृत्यूची पहिली घटना आहे.

फिफप्रोच्या माहितीनुसार, युक्रेनमधील बहुतांशी फुटबॉलपटू शेजारील पोलंड व रोमानिया या देशांमध्ये गेले आहेत. असे असले तरी तब्बल २०० नोंदणीकृत फुटबॉलपटूंचा अद्याप काहीही ठावठिकाणा नाही.

फुटबॉलच्या प्रशासकीय संस्थांकडून रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरूच आहे. युरोपियन फुटबॉलची प्रशासकीय संस्था UEFA ने गुरुवारी रशियाचा राष्ट्रीय संघ आणि क्लब निलंबित केले होते. बेलारूसच्या सर्व संघांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने आयोजित करण्यावर बंदी घातली. तर रशियाच्या युक्रेनवरील लष्करी हल्ल्याशी संबंध असल्याच्या कारणावरून देशाला युरोपियन स्पर्धांमध्ये बंदी घातली गेली. तसेच त्यांना स्पर्धांमधून बाहेरही केले जाऊ शकते. बेलारूसला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून बंदी घालण्याचा धोका आहे. बेलारूस ७ एप्रिलला त्यांच्या घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार होता. आइसलँडचा संघ २०२३ महिला विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता गटातील सामन्यासाठी बेलारूसमधील बोरिसोव्ह येथे जाणार होता.

[ad_2]

Post Comment