कोकणातील सर्प आणि त्यांच्या प्रजाती
सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या भागाला कोकण संबोधले जाते. कोकणाला विस्तीर्ण समुद्रकिनारा व सह्याद्री पर्वताच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. याचा परिणाम सह्याद्री पर्वतरांगा वनसंपत्ती नटलेल्या आहेत. अरबी समुद्र व सह्याद्री पर्वता मुळे कोकण मर्यादित भागात एकवटला आहे. कोकणात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने जंगलाचे प्रमाण मुबलक आहे. त्यामानाने कोकणात लोकसंख्या कमी आहे. कोकणात दरोडेखोरांचे प्रमाण जास्त असल्याने काही विशिष्ट भागातच लोकसंख्या एकवटलेली आहे. इतर ठिकाणी लोकवस्ती विखुरलेल्या स्वरूपात आहे.
कोकण रेल्वे:-
कोकणातील जंगल संपल्यामुळे साप काहीशा प्रमाणात सुरक्षित आहेत. परंतु मानवाच्या अतिक्रमणामुळे सापांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कोकण रेल्वे आल्यामुळे कोकणात उद्योग धंदे झपाट्याने वाढू लागले आहेत. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अन्न व निवार्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे. जास्तीत जास्त जंगले तोडून त्या ठिकाणी शेती करून जास्तीत जास्त शेतीजन्य उत्पादन घेणे गरजेचे बनले आहे.
कोकणात शहरीकरण झपाट्याने होत असल्याने निवाऱ्याचा प्रश्न व त्या ठिकाणी राहण्यासाठी मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे कोकणात काँक्रीटचे जंगल वाढत चालले आहे. त्यामुळे सापांना त्यांच्याच वस्ती स्थानातून काढून मारले जाते व त्या ठिकाणी आपण आपले शानदार बंगले उभारतो.
हाराष्ट्रात सापडणार्या बाराच्या सापांच्या जाती कोकणात आढळतात. कोकणात विषारी सापाच्या सगळ्या जातीचे साप आढळतात. नाग, मन्यार, घोणस तर मुबलक प्रमाणात सापडतातच त्याचबरोबर प्रामुख्याने कोकणात सापडणारे फुरसे चापडा मोठ्या प्रमाणावर सापडायचे. चापडा हा प्रामुख्याने कोकणात सापडणारा दुर्मिळ साप आहे.
कोकणी माणूस व कोकणातील जंगल यांचे अतूट नाते असल्याने त्याचा संबंध वन्यप्राण्यांची व मोठ्या प्रमाणावर सापांशी येतो व कोकणात विषारी सापांचे प्रमाण चांगले असल्याने सर्पदंशाचे प्रमाण मोठे आहे. कोकणी माणूस दऱ्याखोऱ्यात राहणारा असल्याने वैद्यकीय सुविधा तात्काळ मिळत नसल्याने मृत्यूचा संभव असतो. त्यामुळे सापांबद्दल गैरसमजही मोठ्या प्रमाणावर आहेत.
सर्पदंश:-
ज्यावेळी सर्पदंशावर वैद्यकीय उपचार नव्हते त्यावेळी मृत्यूचे प्रमाण अधिक होते. परंतु आज वैज्ञानिक प्रगतीमुळे सर्पदंशावर प्रभावी औषधे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आज सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर योग्य औषध उपचार झाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून सर्पदंशावर वैद्यकीय उपचार प्रभावीपणे होऊ लागल्याने आज खेड्यापाड्यातून होणाऱ्या सर्पदंशावर योग्य उपचार
होत आहेत, त्यामुळे कोकणातील सर्पदंशाने येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
कोकणातील विविध सर्पप्रेमी, निसर्गप्रेमी संस्थांकडून सापान बद्दलचे गैरसमज घालविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होताना दिसत असल्याने आज सापांना विनाकारण मारण्यापेक्षा त्यांना जीवदान देण्यात कोकणी माणूस सरसावला आहे. तरी लोकांच्या मनातली सापाबद्दल ची खोलवर रुजलेली भीती जाणवते.
कोकणात सर्व महाराष्ट्रात सापडणाऱ्या भरात जातीचे साप सापडत असले तरी काही सापांच्या भितीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांचे जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोकणात नाग, धामण, दिवड, कवड्या, घोणस, अजगर इत्यादी साप मोठ्या प्रमाणावर घरात किंवा घराच्या
आसपास भक्ष्याच्या शोध येताना दिसतात. आम्हाला साप पकडून सुमारे अडीच वर्षे झाली आहेत. गेल्या अडीच वर्षात अनेक जातींचे साप पकडून जंगलात सोडले आहेत.
त्याखालोखाल मण्यार जातीचे साप खूपच कमी घराजवळ येताना दिसतात. कारण मण्यार या सापाचे मुख्य अन्न साप असल्याने मण्यार हा साप आपल्या घराच्या आसपास किंवा घरात कमीच येतो. परंतु मण्यात प्रमाणे हुबेहूब दिसणारा कवड्या जातीचा साप मोठ्या प्रमाणावर आढळतो. दुरड्या घोणस, नानेरी, तस्कर, घुळनागिन, कुकरी, पोवळा, मांजऱ्या, वाळा, रुका इत्यादी साप घरात किंवा घराच्या आसपास त्यामानाने कमी आढळतात. तरी कोकणात या सर्वांची संख्या समाधानकारक आहे.
दुर्मिळ साप:-
काही साप जंगलात शोधून मिळतात त्यात चापडा, गवत्या इत्यादी दुर्मिळ साप येतात. हे साप सहसा मानवी वस्तीत आढळत नाहीत कारण हे साफ दुर्मिळ आहेत. त्याचबरोबर हे साप घनदाट अरण्यात सापडणारे असल्याने मानवी वस्तीपासून दूरच राहणे पसंत करतात.
अजगर:-
अजगर हा साप उत्तर कोकण पेक्षा दक्षिण कोकणात मोठ्या प्रमाणावर सापडतो. कारण उत्तर कोकणाला मुंबई हे महानगर जवळ असल्याने मुंबईच्या औद्योगीकरणाचा फटका बसल्याने वनसंपदा नष्ट करून त्याठिकाणी काँक्रीटचे जंगल मोठ्याप्रमाणावर आहे. परिणामी जंगलात राहणारा अजगर दुर्मिळ झाला आहे. परंतु घराच्या बाबतीत आनंदाची गोष्ट म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गोव्यात अजगारांचे प्रमाण समाधानकारक आहे. परंतु अजगर हा साप आकाराने, जाडीने वजनाने मोठा असल्याने त्याच्याबद्दल अकारण आपल्याकडून मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याने अगर अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागले आहेत.
आपण प्रेमाने पाळलेली गुरांची पिल्ले, शेळ्यामेंढ्या, कोंबड्या पाळीव प्राणी यांच्या मागावर अजगर मानव वस्तीत येतात व विनाकारण मारले जातात. उत्तर कोकणातून दुर्मिळ बंदीला असाच अजगर मारला गेला तर दक्षिण कोकणातूनही अजगर दुर्मिळ होईल.
चापडा:-
चापडा हा साप प्रामुख्याने कोकणात आढळणारा एक दुर्मिळ साप आहे. तरीही सह्याद्रीच्या पायांशी काही प्रमाणात का होईना तो सापडतो परंतु या सापाला संरक्षण मिळाले नाही चापडा या जातीच्या सापांचे संरक्षण व संगोपन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोकणात सर्पालय याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
फुरसे:-
फुरसे जातीचा साप कोकणात कातळावर हमखास सापडणारा साप परंतु या सापाचे ही अस्तित्व धोक्यात आले आहे. चारही सापांचे विष विशिष्ट प्रमाणात घेऊन त्यापासून सर प्रतिविष तयार केले जाते. ज्यावेळी फुरसे या सापाचे विष हाफकिन लागते तेव्हा हाफकिन चे लोक येऊन फुरसे पकडून नेत असत व त्यांचे विष काढत, परंतु आता त्यांचे विष काढून त्यांना जंगलात सोडले जाते.
आता साफ पाळणे विक्रीची झाल्याने त्यांचे विष काढून फुरस्यांना जंगलात सोडले जाते. प्रामुख्याने कोकणात आढळणारे फुरसे देवगडात मोठ्याप्रमाणावर सापडतात. 15000 फुरसी पकडून त्यांचे विष गोळा करण्यासाठी हाफकिन जीव औषध महामंडळाची टीम पुण्याहून देवगडात येते.
हाफकिन च्या गाड्या दिसतात फुरसी पकडण्याचा व्यवसाय हौसेने करणारी मंडळी गोळा होतात व कातळावर मिळतील तिथून फुरसी पकडून आणून देतात. पकडलेल्या फुरसी विष तात्पुरती प्रयोगशाळा उभी करून वेळोवेळी दोन फुरस्यांचे विष काढले जाते. पाचशे ते सहाशे फुरस्यापासून एक ग्रॅम वीस मिळते हे डीफ्रीजमध्ये ठेवून नंतर पुण्याला नेले जाते.
आता देवगड मधून फुरसी दुर्मिळ होत आहेत. पावसात दगडा गणित फुरसी असायची. जेवढे दगड तेवढी फुरसी सापडत. आता मानवी अतिक्रमण व मानवी वस्ती मुळे देवगडच्या कातळावर ची फुरसी दुर्मिळ झाली आहेत. शासनाने फुरसे संरक्षित म्हणून जाहीर केले आहे.
१९४० झाली एका दिवसात सव्वा दोन लाख फुरसी पकडली होती. आता दिवसाला शंभर ते दोनशे पुरुषी पकडणे शक्य होत नाही. पूर्वी देवगड मध्ये फुरसी पकडणाऱ्या माणसांची मंडळी असायची. शासकीय विश्रामगृहावर हाफकिन वाले आले की गावागावात आपोआप वार्यासारखी बातमी पसरायची. प्रत्येक मंडळी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने मातीच्या मडक्यांना फडकी बांधून हातावरची फुरसी गोळा करायची.
झाडावरचे साप:-
प्रामुख्याने झाडावर राहणाऱ्या सापांना घनदाट करण्याची आवश्यकता असते. माळरानावर एखादे झाड असेल तर अशा झाडावर झुडपात साप सहसा राहत नाही. कारण त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने झाडे उपयुक्त नसतात. झाडावरचे साप एका झाडावरून दुसर्या झाडावर सहज फिरतात. ते एका ठिकाणी बरेच दिवस वास्तव्य करीत नाहीत. कारण झाडावरच्या सापांना, गरूड, ससाणा, घार इत्यादी पक्षापासून स्वतःचा बचाव करायचा असतो. त्याचबरोबर भक्ष्याचा शोध घ्यायचा असतो
झाडावरच्या सापांचे मुख्य खाद्य पक्षी व त्यांची अंडी, सरडे, पाली इत्यादी असतात. झाडावर पक्षी बसतात तेव्हा लपत-छपत याप जाऊन त्याला पकडणे खूपच कौशल्याचे काम असते. थोडा जरी आवाज झाल्यास किंवा पाला फांद्या हल्ल्यास पक्षी उडून जातात व सापाची मेहनत पाण्यात जाते. अशावेळी झाडावरचे पक्षी पकडणे हे सापांना किती त्रासदायक ठरते याचा आपण विचार करू शकतो.
पक्ष्यांना पंख असल्याने त्यांना सापापासून सहज बचाव करता येतो. त्यामुळे सापांना पक्षी पकडण्यासाठी बराच वेळ लागतो. त्याच प्रमाणे सरडे झाडावर आपल्या रंग बदलून वावरतात. त्यांना ओळखून पकडावे लागते. पहिल्याच प्रयत्नात गडावरच्या सापांना वृक्ष मिळेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे झाडावरच्या सापांना सतत भक्ष्याच्या शोधात फिरावे लागते.
जेव्हा भक्ष्याच्या शोधात झाडावर फिरत असतो त्यावेळी सापांचे शत्रू, गरुड, ससाणा, घार इत्यादी पक्षी आपल्या पक्षाच्या म्हणजे झाडावरच्या सापांच्या शोधात फिरत असतात. त्यांना झाडावर साप दिसताच अचानक सापांवर झडप घालून सापांना पकडून पष्ट करतात. झाडावर ती साफ गडद हिरव्या रंगाचे असतात. त्या सापांची लांबी जास्त असत. त्यामुळे हे साप एखाद्या वेली प्रमाणे दिसतात. झाडांवर अनेक वेली चदलेल्या असतात. त्यात ते मिसळून जातात. हरणटोळ या सापाच्या तोंडाचा आकार एखाद्या पानाप्रमाणे किंवा पक्ष्यांच्या चोची प्रमाणे असतो. त्यामुळे सापांचे तोंड पानाप्रमाणे दिसत असल्याने सापांना झाडावर सहज लपून बसता येते.
झाडावरचे साप खूपच चपळ असतात. उदाहरणार्थ हरणटोळ, रुका, चापडा, मांजऱ्या, तस्कर, अजगर, इत्यादी काही साप झाडावर ज्याप्रमाणे सहज वावरतात त्याच प्रमाणे जमिनीवर ही सहज वावरतात. त्यात धामण, नाग, हरणटोळ, चापडा, रुका, मांजऱ्या, तस्कर इत्यादी झाडावरच्या सापांचा रंग हिरवा असतो. त्याचप्रमाणे फिक्कट चॉकलेटी रंगाचे सापही झाडावर राहतात. त्यात तस्कर ,मांजऱ्या, अजगर, रुका, धामण, इत्यादी असतात.
जंगल तोड : कोकणाची ओळख सह्याद्रीच्या पर्वत रांगा त्यामुळे निर्माण होणाऱ्या डोंगर-दऱ्या त्यात बसणारी वनसंपदा व या या वनसंपदे मध्ये सुरक्षित असणारे साप कोकणच्या दक्षिण भागात वनसंपदा काही प्रमाणात का होईना आज सुरक्षित आहे. त्यामुळे उत्तर कोकणामध्ये व दक्षिण कोकणात सापांचे भवितव्य चांगले आहे. परंतु जंगल संपत्तीची झपाट्याने होणारी तोड झपाट्याने होणारी तोड, वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली भूजल पातळी इत्यादीमुळे दिवसेंदिवस जंगले नष्ट होत आहेत. उदाहरणार्थ दरवर्षी रत्नागिरीतील 25 चौरस किलोमीटर जंगले नष्ट होत आहेत. वृक्ष लागवडीचे प्रमाण फक्त पाच चौरस किलो आहे. त्यापेक्षाही कमी आहे.
1981 सालच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात 8165 चौरस किलो जमीन जंगलाने व्याप्त होती. प्रमाण एकूण जमिनीच्या 64 टक्क्यांपेक्षा जास्त होते. त्यामुळे जिकडे तिकडे जंगल जंगल होते. यापैकी केवळ 58 चौरस किलो जमीन पडीक होती. परंतु आज जंगलांचे प्रमाण झपाट्याने कमी मी तर पडीक जमिनीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे साफ दूर होताना दिसत आहेत.
आज रत्नागिरी जिल्ह्यात जंगलव्याप्त जमीन फक्त सात हजार हेक्टर आहे. तरण क्षेत्र 39,000 हेक्टर तर झाडू खाली 4000 हेक्टर आहे. रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा जाहीर झाला आहे. तेथे फळझाडांची संख्या आंबा 5271 हेक्टर जमीन, काजू 62,962 हेक्टर, सुपारी 53 हेक्टर, शेत जमीन 247 हेक्टर पिकाखाली आहे. यावरून कोकणातल्या जंगल संपत्तीचा अंदाज येतो.
Post Comment