Post Office Scheme : पोस्टाच्या ह्या योजनेतून दरमहा पती-पत्नीला मिळतील सुमारे 5000 रुपये ; जाणून घ्या कस करायच ते
[ad_1]
Post office Scheme: रिस्क न घेता गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. कारण या ठिकाणी पैसे बुडण्याची भीती नाही आणि ग्यारंटेड रिटर्न तुम्हाला मिळतात. लोक त्याच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकतात.
पोस्टाची एक योजना आहे त्यात गुंतवणूक करून पती-पत्नी संयुक्त खात्याद्वारे दरमहा फिक्स इन्कम मिळते. पोस्टाची मासिक उत्पन्न योजनेंतर्गत ग्यारंटेड इन्कम तुम्ही मिळवू शकतात. मात्र यासाठी तुम्हाला या योजनेत एकरकमी रक्कम जमा करावी लागेल.
यामध्ये, संयुक्त खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामध्ये सिंगल आणि संयुक्त (3 व्यक्तींपर्यंत) दोन्ही खाती उघडता येतात. ज्याची मॅच्युरिटी पाच वर्षांसाठी आहे. परंतु जर आपणास वाटले तर आपण ते आणखी पाच पाच वर्षांनी वाढवू शकता. या योजनेत, 1000 रुपयांपासून खाते उघडले जाते .
तुम्हाला महिन्याला फिक्स इन्कम हवा असेल तर एकच वेळी 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवावे लागतात. यामध्ये तुम्हाला वार्षिक 6.6% व्याज दिले जाते. तुम्हाला पाच वर्षांनंतर पर्याय दिला जातो, कि तुम्ही एकतर प्रीमियमचे पैसे काढू शकता किंवा या योजनेत पुढे जाऊ शकता.
अशा प्रकारे तुम्ही दरमहा सुमारे पाच हजार रुपये कमवू शकता
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना तुम्हाला दरमहा पैसे देण्याची हमी देते. जर पती-पत्नीने संयुक्त खाते उघडले असेल आणि त्यात एकरकमी 9 लाख रुपये जमा केले असतील तर 6.6 टक्के दराने वार्षिक 59,400 रुपये व्याज मिळेल. जे तुम्हाला दरमहा 4950 रुपये देऊ शकतात.
खाते उघडल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून 2 टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल. खाते उघडल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर आणि 5 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून 1 टक्के वजावट केली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल.
यात कोण गुंतवणूक करू शकतो
यामध्ये, केवळ कोणताही भारतीय रहिवासी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतो. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन व्यक्ती हे खाते स्वतःच्या नावाने उघडू शकतो, अशी तरतूद यात आहे. खाते उघडण्यासाठी तुम्ही कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता.
[ad_2]
Post Comment