माऊंट अबू राजस्थानचा स्वर्ग
अरवली पर्वत राज्यातील अबूचा पहाड सर्वात उंच म्हणजे सुमारे चार हजार फूट आहे. अरवली हा भारतातील सर्वात जुना पर्वत आहे. त्यामानाने हिमालय हा तरुण आहे. ब्रिटिशांनी भारतात जी थंड हवेचे ठिकाणे शोधून तिथे वसाहती केल्या, त्यात महाबळेश्वर, शिमला, पाचगणीसारखे अबूचेही नाव घेतले जाते.
१८२२ मध्ये ब्रिटीश कर्नल टॉड याने या स्थळाची ब्रिटिश सरकार जवळ शिफारस केली. यांच्या सल्ल्यानुसार ब्रिटिश रेसिडेंटची रोटी कचेरी तेथे उभारली नि तेथून अबू या थंड हवेच्या स्थळाचा कायापालट झाला. एकेकाळी ब्रिटिश रेसिडेंटचा राजपुताना संस्थानाचा सगळा कारभार कबूतर पहाडावरुन चालायचा येथे त्यांनी एक मोठे रुग्णालयही बांधले, ते आजतागायत सुरू आहे.
गुजरात वरून राजस्थान कडून सीमेवरच राजस्थानचा हा स्वर्ग उभा असल्याचे लक्षात आले. येथे येणार्या पर्यटकांच्या पैशावर हे शहर चालते. हा शांत आणि थंड प्रदेश धर्मसाधनेला अतिशय उत्तम असल्यामुळे नंतरच्या काळात या ठिकाणी जशी हिंदूंनी देवालये उभारली, तशीच जैन धर्मियांनीही येथे स्मरणीय अशी देवालये उभारली आणि माउंट अबू हे या दोन्ही धर्मियांचे धर्मस्थान बनले.
एका टेकडीवर असलेले अर्वुदा देवीचे मंदिर, दुसऱ्या टेकडीवरील गुरुशिखर, नखी तळ्याच्या काठी असलेले रघुनाथाचे मंदिर, अचल गडावरील शिवालय, विश्वविख्यात प्रजापती ब्रह्मकुमारी या संस्थेने निर्माण केलेले हिंदूंचे संस्मरणीय शांतीवन, ओम शांतीभवन, हिंदू संस्कृती नि हिंदुधर्माच्या खुणा जागवताना दिसतात. अचल गडावरील जैन मंदिर नि दिलवाडा मंदिरे, ले जैन संस्कृतीच्या खुणा सांगतात.
दुसऱ्या दिवशी आम्ही पहाडावरील प्रेक्षणीय स्थळे पाहावयास निघालो. सगळीकडे डोळ्यात भरणारे उंच उंच खडक पाहून असे वाटले की, येथील सर्वात पहिली वस्ती, जर कोणाची असेल तर या काळात चित्रविचित्र आकाराच्या अजस्त्र खडकांची असावी.
जणू काही अजस्त्र असे प्राणी दिमाखात उभे आहेत. त्यालगत पाणोठ्याच्या जागी असलेल्या एका खडकाचा आकार दिमाखात उभ्या असलेल्या वाघासारखा होता, तर नखी तळ्याच्या काठी असलेल्या टेकडीवरील अजस्त्र खडक बेडकाच्या आकाराचा होता. असे वाटत होते की, की कोणत्या क्षणी तलावात उडी मारेल. ब्रिटिशांनी त्याला “टोड रॉक” असे नाव दिले.
बाजूला एखाद्या घुंगट ओढलेल्या नवरीसारखा एका खडकाचा आकार होता. प्रचंड आकाराची नदी, बुलडोग, उंट, यासारख्या प्राण्यांचे आकार दिसत होते. संपूर्ण अबू शहराभोवती या खडकांनी अशी काही भक्कम तटबंदी केलेली आहे की, शत्रूला वाकड्या नजरेने अबू कडे पाहता येऊ नये. तुमचा परिसर सुमारे पंधरा किलोमीटर लांब नि आठ किलोमीटर रुंद आहे.
राजस्थानातील हे एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. अद्वितीय निसर्गसौंदर्य, अल्हाददायक हवा, हिरवीगार वनश्री आणि येथून दिसणारा रम्य परिसर, यामुळे दरवर्षी देशी-विदेशी पर्यटक येथे येतात. अबू हे थंड हवेचे ठिकाण आहे, अशीच ती एक तपोभूमी हि आहे. प्राचीन काळी या ठिकाणी ऋषीमुनी तपश्चर्या करीत असत.
नखी तळ्याच्या परिसरातील डोंगरांच्या कपारीत, गुहांमध्येमध्ये तप करीत असल्याचे सांगितले जाते. आजही तेथे चंपक गुहा, हत्ती गुहा, राम कपार दाखवितात.
हिंदू धर्मातील नाद संप्रदायी नि शाक्त पंथिय साधकांनी येथे तप करून सिद्धअवस्था प्राप्त केल्याची माहिती मिळते. १८५२ मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगण्यात येते. कार्तिकी पौर्णिमेस आजही तेथे मोठी यात्रा भरत असल्याचे आमच्या गाईडने सांगितले. त्या रात्री स्नान करणे पुण्यपद मानले जाते.
प्राचीन काळी गिरणार प्रमाणे अबू हे त्यादृष्टीने तंत्र मार्गियांचेयांचे एक श्रद्धास्थान व वस्तीस्थान मानले जाते. सौंदर्य श्रद्धा यांचा मनोज्ञ मिलाप माउंट अबू येथे पहावयास मिळतो. पावसाळ्यात धुंवाधार पाऊस नि हिवाळ्याच्या कही महिन्यांमध्ये प्रचंड गारवा असल्यामुळे या काळात पर्यटक येथे येत नाही. तर मार्च ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये पर्यटक विशेष गर्दी करताना दिसतात.
मी जानेवारीत गेलो होतो तेव्हाही कमालीचा गारवा जाणवत होता. अपमान सात अंशाच्या खाली आले होते. या काळातही चिनी जपानी पर्यटक उंटावर घोड्यावर फिरताना दिसत होते.
माउंट आबू मधील लगतच्या परिसरात नखी तळे, सनसेट पॉईंट, शांतीवन, अचलगड, शंकर मठ, ओम शांती भवन, ही स्थळे पाहण्यासारखी आहेत. प्रथम आम्ही गुरु शिखरावर गेलो. सुमारे अडीचशे पायऱ्या चढून आम्ही गुरु दत्तात्रेयाच्या पादुकांचे दर्शन घेतले. गुरू शिखर माउंट अबूतीलच नव्हते तर, अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची ५६५३ फूट आहे.
या शिखरावरून आसपासच्या सिरोहि परिसराचे संगम दर्शन घडते. निरभ्र निळे आकाश, त्याखाली असलेले जांभळे डोंगर, हिरवी रम्य वनश्री नि त्याखाली लपलेले अबु शहर दिसते. क्षितिजापर्यंत धूसर आसमंत एका वेगळ्या जगाच्या खुणा सांगतो. गुरू शिखर म्हणजे एक पांढराशुभ्र उंच असा एकाकी सुळका.
तो पाहताना जणू एखादा साधू ध्यानाला बसला आहे असे वाटते. दूरवरच्या पठारावर केंद्र सरकारचे दूरसंचार नि रडार दिसते. गुरु पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शांतीवनात आलो. हे अबू पहाडावरील अतिशय रमणीय असे ठिकाण आहे. या पहाडावरील ती सर्वात मोठी बाग आहे, तसेच ते ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे प्रचार केंद्रही आहे.
येथे विविध फुलांच्या ताटव्यांपासून विविध प्राण्यांच्या आकाराच्या वेली पहावयास मिळतात. उंच वृक्ष, प्रचंड आकाराचे ओम हे चिन्ह, संगमरवरी दगडातून कोरून काढलेले विविध प्राणी दिसतात. परंतु त्यातूनही पर्यटकांना धर्म संदेश देण्याचा प्रयत्न दिसून येतो. उदा. एका दृश्यात पाणवठ्यावर एकाच ठिकाणी आणि पीत असलेला सिंह, गाय नि हरीण दाखविले आहे.
शांतीवन पाहून आम्ही अचलेश्वर महादेव मंदिरात गेलो. अचलेश्वर महादेव हा अबूचा अधिष्ठाता देव मानला जातो. हे सर्वात प्राचीन देवालय असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाच्या जागी जो खड्डा आहे, त्याला “ब्रह्म खड्डा” असे म्हणतात. तो खाली पाताळापर्यंत गेल्याचे सांगितले जाते.
काशी विश्वेश्वराच्या पायाचा अंगठा येथपर्यंत आल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. विश्वेश्वराचे भव्यदिव्य त्व यावरून प्रत्ययाला येते. महादेवा समोरचा नंदी पितळेचा असून, तो प्रचंड आकाराचा आहे. जवळच्या टेकडीवर जैन मंदिरे उभी आहेत. ती सोळाव्या शतकातली आहेत.
या मंदिरातील चौदा मूर्ती सुमारे सातशे किलो वजनाच्या पंचधातूच्या आहेत. १४५२ मध्ये मेवाडचा राजा कुभ याने येथील अचलगड हा किल्ला बांधल्याची माहिती मिळते. राजाने येथे राणीवसा नि धान्याची कोठारे बांधल्याची माहीती मिळाली. येथील ९०० फूट लांब आणि २४० फूट रुंद मंदाकिनी कुंडाजवळ प्रचंड आकारातील तीन स्फटिकी पाषाण रेडे उभे आहेत.
असे म्हणतात की, रेड्यांच्या रुपात येथे चाललेल्या यज्ञातील तूप प्राशन करण्यात येत असत. अबूचा राजा अदिपाल याने त्यांना एका बाणाने ठार केले. अबूपासून जवळच एका टेकडीवर अबूची अधिश्ट अबूची अधिष्ठात्री देवता अर्बुदा देवीचे स्थान आहे. आता तेथे जाण्यासाठी रोप वे ची सोय केलेली आहे.
देवीच्या स्थानकावरून या शहराला अबू हे नाव पडले. देवीचे मंदिर असलेला सुळका अंधातरी असल्यामुळे या देवीला अठरा देवी असेही संबोधण्यात येते. इथून आजूबाजूचा परिसर फारच अल्हाददायक दिसतो. श्री देवीचे दर्शन घेऊन दिलवारा मंदिर पहावयास गेलो.
अबूची जी काही आकर्षणे आहेत, त्यात या दिलवारा मंदिराचा समावेश होतो. केवळ अबू परिसरातच नव्हे, तर संपूर्ण राजस्थान आणि गुजरात या संस्कृतीवर जर, कशाची छाप असेल, तर ती संगमरवराची होय. येथील मंदिरे, किल्ले, कलाकुसरीची कामे, मूर्ती, ती वस्तू यावर त्या स्फटिकाची कधीही न पुसणारी छाप आहे.
येथील संगमरवरी म्हणजे राजस्थानच्या मातीला पडले एक सुंदर शुभ्रधवल असे स्वप्न आहे. इथे शुभ्र पांढरा स्फटिक सगळीकडेच दिसतो. दिलवारा जैन मंदिर म्हणजे जैन तीर्थकरांच्या श्रद्धेची नी भक्तीची स्फटकमिय स्मारकेच होत. दिलवाडा म्हणजेच देऊळवाडा, देवळांचा परिसर.
भारतातील सर्वश्रेष्ठ कला कुसर, मुर्तीकला नि वास्तुकला येथे पहावयास मिळते. प्रत्येक मंदिराला कमानी, त्यातील पानाफुलांच्या, विविध देवदेवतांच्या मूर्ती, वासुदेवाचे कृष्णाला यमुनेच्या पलीकडे येणारे दृश्य, यासारखी पौराणिक संदर्भ जागविणारी कलाकुसर, धर्म सहिष्णुतेची ग्वाही देणारे आहे.
खांब, छत, कमानीवर असलेली कला डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. या मंदिराच्या समूहात एकूण पाच मंदिरे आहेत. ती विविध तीर्थकार यांची आहेत. दिलवाडा मंदिरातील पहिले मंदिर पार्श्वनाथ भगवानाचे आहे. परंतु मंदिराची रचना कलात्मक आहे. दुसरे ऋषभ देवाचे मंदिर पाटणा चा राजा राणा भीमदेव याने १८ कोटी ५३ लाख रुपये खर्चून बांधले आहे.
मंदिरातील सर्व कलात्मक काम संगम्रवरातून कोरून काढलेले आहे. घुमठ, कमानी, छत, झुंबर, मूर्ती यांना पेलून धरणारा खांबही तितकेच कलात्मक आहेत. मंदिरातील कलाकुसर पाहताना स्फटिकांच्या खांबातून जावे लागते. प्रचंड खांब पाहताना आपण स्पटिक खांबांच्या जंगलातून वावरतो असे वाटते. ऋषभ देवाच्या मूर्ती समोरील विमल शहा याची घोड्यावर स्वार झालेली स्फटिकाची प्रचंड मूर्ती डोळ्यात भरते.
तिसरे मंदिर नेमिनाथ भगवानाचे आहे. या मंदिरातील कलाकुसर विशेष पाहण्यासारखी आहे. हे मंदिर वीरधवल राजाचा मंत्री वस्तूपाल याने इ.स. १२३१ मध्ये १२ कोटी ३३ लाख रुपये खर्च करून बांधल्याचे सांगण्यात येते. गाभार्याच्या दाराजवळ दोन्ही बाजूंनी फोन कलात्मक गोकले पहावयास मिळतात.
त्यांचि नावे आहेत जेठानिना गोकला व देरानीना गोकला (तेजपाल व वस्तूपाल यांच्या बायका) गोक्ला म्हणजे कोनाडे. दोन भावजयिंच्या इर्शेतुन हे कलात्मक गोकले तयार झाल्याचे सांगतात.
चौथे मंदिर ऋषभ देवाचे असुन त्यातील प्रचंड मूर्ती सोने-चांदी पितळे आणि रत्नजडित अशी आहे. दिलवाडा मंदिर समूहाच्या परिसरात शिरतानाच डाव्या बाजूला दे मंदिर दिसते ते मंदिर बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी उरलेल्या स्फटिकांच्या तुकड्यातून फुरसतीचा वेळेला साकारलेले आहे.
एका बाजूला स्फटिकांचे मोठे हत्ती पहावयास मिळतात. सर्व स्फटिकमय नितांत रमणीय परिसर पाहून झाल्यावर मनात विचार येतो की, एवढे कोट्यावधी रूपये खर्च करून बांधलेली ही मंदिरे लपवून का ठेवावी? मंदिराच्या कळसा ऐवजी घुमट दिसतात. शिरताना जुनाट भिंत बुरसटलेली बांधकाम पाहून स्फटिकाची स्वप्ननगरी आत असेल ते कोणालाही वाटणार नाही.
मुघल आक्रमणाच्या भीतीने हरिकला जनपद झाकोळली गेली आहे. ही मंदिरे पाहताना ताजमहालाची आठवण झाली. परंतु तेथील भव्य परिसर, त्याला लाभलेली यमुनेचे सुंदर पार्श्वभूमी, कलात्मक कारंजे, हिरवळ, नि त्यांची भव्यदिव्यता सारेच अविस्मरणीय आहे. ताजमहल मोकळेपणी वावरताना दिसतो. परंतु तितक्याच तोलामोलाची असणारी दिलवारा मंदिरे अजूनही चोरून ठेवण्यासारखी का?आता प्रश्न पडतो.
माउंट अबू वरील नखी तळे पाहताना अबुला राजस्थानचा स्वर्ग का म्हणतात, हे लक्षात येते, तळ्याच्या काठी चारी बाजूला डोंगर असून दाट हिरवी रुक्षराजा, वर निळे आकाश, शेवाळलेला हिरवट रंगाचा जलाशय अल्हाददायक हवा पर्यटकांचे मन वेधून घेते. नखी तळ्यात बद्दल अनेक पौराणिक कथा किंवा दंतकथा ऐकायला मिळतात.
प्राचीन काळी या परिसरात फिरत असताना देवाला पाणी मिळेना म्हणून देवाने नखाने खणलेले असता आणि भरून वाहू लागले. म्हणून या तलावाला नखी तळे म्हणून संबोधले जाते. हा संपूर्ण परिसर डोंगर कळ्यांना वेढलेला आहे.
✒ प्रा. डॉ. पांडुरंग भानुशाली
Post Comment