देश

तिरुपती मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू, विशेष प्रवेश पास फक्त 300 रूपयात

Published

on

[ad_1]

तिरुपती : तिरुमला तिरुपती देवस्थान यांनी (TTD) नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यासाठी 300 रुपयांच्या  विशेष प्रवेश पासचा कोटा जाहिर केला आहे. संस्थेने तिकिटांचा ऑनलाइन कोटा शुक्रवारी (22 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाहिर केला. तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराच्या संस्थे म्हटले आहे की, नोव्हेंबर महिन्यातील ऑनलाइन पास बूकिंग शनिवारी (23 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता ऑनलाइन पद्धतीने सुरू केली जाईल.

तिरुपती देवस्थाना संस्थेने ऑनलाइन बुकिंगसाठी जाहिर केल्या जाणाऱ्या  तिकीटांची नेमकी संख्या स्पष्ट केली नाही. त्यामुळे भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करून तिरूपती मंदिराला दर्शनला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढवण्याचा दबाव तिरुमला तिरुपती देवस्थान संस्थेवर असणार आहे. तिरूपती मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोना रिपोर्टसोबत ठेवावा लागेल तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. सध्या तिरूपती मंदिरात  दररोज 30,000 भाविक दर्शनासाठी येत आहेत. कोरान काळाच्या आधी तिरूपती मंदिरात अंदाजे 70-80,000 भाविक दर्शनासाठी येत होते.

ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी पद्धत 

तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची अधिकृत वेबसाइटच्या संकेतस्थळ ऑपन करा. संकेस्थळऑपन केल्यानंतर त्यामध्ये मोबाईल नंबर, कॅप्चा कोड भरा त्यानंतर जनरेट ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मिळालेला सहा अंकी ओटीपी भरा त्यानंतर ‘लॉगिन’ वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कॅलेंडर दिसेल. त्यामध्ये बूकिंग डेट सिलेक्ट करा. त्यानंतर तिथे दिसणारा फोर्म भरा. 

Advertisement

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेंडिंग

Exit mobile version