कणकवली येथील हळवल फाटा येथे दोन कार मध्ये अपघात
[ad_1]
कणकवली वरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला कसाल वरून येणाऱ्या बोलेरोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. सकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात प्रवाशांना दुखापत झाल्याचे त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते आहे.
हा अपघात गडनदी ब्रिजजवळील हळवल फाट्यावर झाला असून डायवर्षनच चा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघात एवढा जोरदार होता की दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच महामार्ग वाहतूक पोलिस तातडीने दाखल होत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
[ad_2]
Post Comment