तंत्रज्ञान

तुमचीही गाडी देतेय कमी मायलेज? ‘या’ 5 चुका ठरतात कारणीभूत

Published

on

[ad_1]

Fuel Consumption in Vehicle: जर तुम्ही कारने प्रवास करत असाल आणि तुमची कार सर्वात कमी मायलेज देत असेल, तर यामागे काही सामान्य कारण असू शकते. परंतु तुम्ही देखील या चुका करत असाल तर तुम्ही प्रवास करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. इंजिनमध्ये अनेक प्रकारचे बिघाड होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या कारचे मायलेज देखील कमी होऊ शकते. स्पार्क प्लगमुळे, इंजिन योग्यरित्या जळत नाही, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो. त्याच वेळी, खराब एअर फिल्टरमुळे, इंजिनला हवा योग्यरित्या मिळू शकत नाही, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो.

1. चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग करणे

जर तुम्ही देखील वेगाने गाडी चालवत असाल किंवा अचानक ब्रेक लावत असाल तर त्यावेळी इंधनाचा वापर वाढतो. जास्त वेगाने गाडी चालवल्याने इंजिनवर जास्त दबाव येतो. त्यामुळे मायलेज कमी होते. त्याचबरोबर विनाकारण गाडी चालू ठेवल्याने देखील त्याचा मायलेजवर परिणाम होतो.

2. टायरचा चुकीचा दाब

Advertisement

जर तुमच्या गाडीमधील सर्व टायरमधील हवेचा दाब बरोबर नसेल तर इंजिनला वाहन हलवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि गाडी मायलेज कमी देते.

3. इंजिनची देखभाल न करणे

जर तुम्ही तुमच्या गाडीच्या इंजिनचे तेल वेळेवर बदलले नाही किंवा एअर फिल्टर गलिच्छ झाला असेल स्पार्क प्लग खराब झाले असतील तर इंजिनच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होते. यामुळे वाहन कमी मायलेज देते.

4. अतिरिक्त वजन

गाडीमध्ये जास्त वजनामुळे इंजिनवर देखील दबाव येतो. ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि मायलेज कमी होते. त्यामुळे कारमध्ये अनावश्यक वस्तू ठेऊ नका.

Advertisement

5. चुकीच्या इंधनाचा वापर

तुम्ही जर तुमच्या वाहनामध्ये चुकीचे इंधन टाकले किंवा निकृष्ट दर्जाचे इंधन वापरल्यास ते इंजिनची कार्यक्षमता कमी करु शकते. त्यामुळे वाहन कमी मायलेज देऊ शकते.

त्यामुळे तुम्ही या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या कारचे मायलेज वाढवू शकता आणि इंधनाची देखील बचत करू शकता.

[ad_2]

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेंडिंग

Exit mobile version