GK: चहा प्याल तर काळे व्हाल! लहानपणी तुम्हाला असं सांगितलं होतं? काय सांगत विज्ञान
[ad_1]
मेलेनिन आनुवंशिकता त्वचेचा रंग ठरवते
शास्त्रानुसार मेलॅनिनच्या अनुवांशिकतेने माणसाच्या त्वचेचा रंग हा ठरला जातो. मेलॅनिन यटा घटकामुळे मानव हा गोरा, सावळा किंवा काळा रंगाची त्वचा घेऊन जन्माला येतो. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चहा प्यायल्याने त्वचेच्या रंगावर त्याचा काहीही परिणाम होतं नाही. या उलट योग्य प्रमाणात चहा प्यायल्याने शरीराला अनेक फायदेच होतात.
मग लहान मुलांनी चहा का प्यायला नको?
खरं तर, चहाच्या पानात आढळणारे कॅफिन हे मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक असतं. जर एखाद्याला चहाचं व्यसन लागलं तर त्यातून तुमची मुक्तता होणे कठीण असतं. त्यामुळे लहान मुलांना चहा पिण्याची सवय लागू नाही म्हणून घरातील मंडळी रंग काळा होण्याची भीती दाखवून त्यांना चहा देत नाहीत.
चहा प्यायचा हट्ट करणाऱ्या मुलांना भीतीसाठी हे वाक्य नंतर घरोघरी बोलं जाऊ लागलं. मुलांना चहा पिण्यापासून रोखण्याची ही पद्धत हळूहळू अगदी देशभर लोकप्रिय झाली.
‘हे’ आहेत चहा पिण्याचे तोटे
चहाच्या पानात कॅफिन असल्यामुळे अनेक वेळा पोटात गॅस होऊन पचनशक्तीशी संबंधित समस्यांना तुम्हाला होऊ शकतो.शिवाय रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हायपर अॅसिडिटी आणि अल्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
चहा किती प्यावा?
एका अहवालानुसार, निरोगी व्यक्तीने दिवसभरात फक्त 1-2 कप चहा घेणे योग्य आहे. त्यापेक्षात जास्त चहा घेऊ नये. शिवाय, सर्दी किंवा घसा खवखवल्यास आपण 2-3 कप हर्बल चहा घेऊ शकतो.
Post Comment