ब्लॉग
घटस्थापना 2021 बघा शुभ मुहूर्त कधी आहे. पण या अशुभ वेळेत चुकनही घट बसवू नका; नाहीतर त्रास होईल.
[ad_1]
नमस्कार मित्रांनो, 7 ऑक्टोबर 2021 गुरुवारच्या दिवशी नवरात्री सुरू होत. आहेत या दिवशी घरा घरात घटस्थापना केली जाईल. ही घटस्थापना करताना जर ती योग्य मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर करण्यात आली तर तीच फळ हे नक्कीच चांगलं मिळत. शुभ मुहूर्तावर केलेलं कोणतही कार्य यशस्वी होत आणि शुभ फळे देत.
म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की 7 ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त नक्की कोणता आहे. दर वर्षी अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथिस आपण घटस्थापना करतो. यालाच काही भागात कलश स्थापना किंवा देवी स्थापना अशी विविध नावे आहेत.
दोन अत्यंत शुभ मुहूर्त याठिकाणी आहेत. मात्र एक खूप मोठी अडचण हिंदू ध र्म शास्त्र आणि जोतिष शास्त्रानुसार अशी आहे की यावर्षी घटस्थापनेस चित्रा नक्षत्र आणि वैतुत्री योग हे एकत्र आलेले आहेत. आणि जेव्हा चित्रा नक्षत्र वैतुत्री योगात येत तेव्हा घटस्थापना वर्जित असते.
म्हणूनच आज दोन अत्यंत महत्वाचे योग सांगणार आहे केवळ याच शुभ मुहूर्तावर आपण घटस्थापना करावी. पहिला मुहूर्त हा सकाळी 6 वाजून 23 मिनीटांनी प्रारंभ होत आहे आणि त्याची समाप्ती सकाळी 7 वाजून 51 मिनीटांनी होईल.
यानंतर दुसरा जो मुहूर्त आहे याची सुरुवात सकाळी 11 वाजून 52 मिनीटांनी होईल आणि समाप्ती दुपारी 2 वाजून 38 मिनीटांनी होत आहे. याच कालावधीत आपण घटस्थापना करा. घटस्थापनेचे देवी पूजनाचे सर्व फळ आपणास नक्की लाभेल. जर या कालावधीत तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही. तर इतर वेळेमध्ये देवीची क्षमा याचना करून आपण घटस्थापना करू शकता.
पण आपण दुपारी ४ वाजून १४ मिनिटांनी ते ५ पर्यंत आपण घट बसवू नये. ही वेळ अशुभ आहे. फक्त ही वेळ आपण लक्षपूर्वक टाळावी. कारण, किती जरी काय म्हणले तर सर्व वेळ ही नक्षत्र कसे आहे त्यावर ती वेळ किती शुभ आणि अशुभ ठरत असते. म्हणून वेळ पाळावी व योग्य वेळेतच असे धार्मिक कार्य करावे, जेणेकरून आपल्या कुटुंबाला त्याचा लाभ होईल.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.
[ad_2]