×

भारतीय अणुशक्तीचे उदगाते डॉ. होमी जहांगीर भाभा !

homi bhabha

भारतीय अणुशक्तीचे उदगाते डॉ. होमी जहांगीर भाभा !

भारत विश्वातील एक म्हणू शक्ती बनवावी, असे स्वप्न भारताचे माजी पंतप्रधान, भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद त्यांनी वीस वर्षापूर्वी पाहिले होते. विजन इंडिया ट्वेंटी-ट्वेंटी एक घोषणा केली. मी त्याप्रमाणे ती घोषणा कार्यवाहीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आणखी अकरा वर्षांनी त्या प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आपण या साऱ्या भारतीयांनी पूर्ण करायची आहे.

या विजन मध्ये वैज्ञानिक प्रगतीचा सर्वात मोठा वाटा आहे. या क्षेत्रात भारतीयांनी ची प्रगती केली आहे, ती डोळे दिपवणारी आहे, यात शंका नाही. प्राचीन काळापासून आर्यभट्ट पासून ते आजचा जयंत नारळीकरांना पर्यंत सर्व वैज्ञानिकांचा त्याचा सहभाग होता. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट, वनस्पतीशास्त्र मध्ये काम करणारे सर जगदीश चंद्र बोस, भौतिक शास्त्रांच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळवणारे डॉक्टर सी.व्ही.रमण, अवकाश संशोधन करणारे डॉक्टर विक्रम साराभाई, गणित व खगोलशास्त्र संशोधन करणारे डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्यांच्याप्रमाणे भारतीय अनुषक्ती चे उद्गाते डॉ. होमी जहांगीर भाभा, यांचा अग्रक्रमाने करावा लागेल.

डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे कार्य हे भारताच्या अणू ऊर्जा संशोधनात अगणित आहे आणि त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन आणि कार्याचा परिचय करून देऊन त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे.

यांच्या संशोधनामुळे भारताला उपलब्ध झालेली आहे. अवकाश संशोधन, दूरदर्शन ,रडार यंत्रणा पाण्याचे नियोजन यांसारख्या मूलभूत संशोधनासाठी जी अनुऊर्जा वापरण्यात येत आहे. अनुषक्ती चे संशोधन करणारे डॉक्टर होमी जहांगीर भाभा, भौतिकशास्त्रातील महान संशोधक होते. ज्या अनुशक्ती प्रणालीला भाभा स्कॅटरिंग हे नाव दिले गेले.

ती कॉस्मिक किरणोत्सर्गातील इलेक्ट्रॉन रेणूंचे शोषण, प्रणाली अनुशक्ती संशोधनाला एक वेगळे वळण देणारी होती. वरील विषयावर डॉक्टर होमी बाबा यांनी १९३३ मध्ये इंग्लंड येथील केंब्रिज विद्यापीठ शोधप्रबंध सादर केला. एखाद्या पदार्थातून वेगाने जाणाऱ्या इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन्समधून न्यूक्लिअर चे विघटन होऊ शकते, व त्या प्रक्रियेत न्यूक्लियर युग्म तयार होतात.

कोणत्याही पदार्थात विखुरलेल्या पॉझिट्रॉन्सच्या विरोधी गतीमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, हे सिद्ध करणारे डॉक्टर बाबांचे संशोधन संपूर्ण अनु संशोधनाला चालना देणारे ठरले. अणूंच्या विलयातून इलेकट्रोन्स व न्युट्रॉन्स प्रचंड प्रमाणात गतिमान होतात, हा सिद्धांत थोर संशोधक आईन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला पुष्टी देणारा होता.

डॉक्टर बाबा यांना भेटून त्यांच्याशी त्यांनी या विषयावर चर्चा केली. १९३५ साली केंब्रिज विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी प्रदान केली. आहे त्याच विद्यापीठात १९३९ पर्यंत राहिले नंतर ते भारतात परतले.

भारतात परतल्या बरोबर डॉक्टर भाभा यांनी बंगलोरच्या इन्स्टिट्यूटमध्ये काही काळ डॉ. सी. व्ही. रमण यांच्याबरोबर संशोधन केले. डॉ. होमी भाभा यांनी १९४०-१९४५ या काळात जे भौतिक व तंत्रज्ञान शास्त्र संशोधन केले, त्यातूनच त्यांना आपल्या जीवनाचे ध्येय सापडले. त्यांनी १९३८ पासूनच अनुऊर्जा संशोधनावर भर दिला होता.

यादरम्यान सर दोरावजी टाटा यांनी ट्रॉम्बे, मुंबई येथे इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था सुरू केली. या संस्थेत डॉ. भाभा यांची संचालक म्हणून नेमणूक केली. त्यांनी भारतातील हुशार व बुद्धिमान अशा तरुण संशोधकांना पाचारण केले. जा सेंटर मध्ये त्यांनी तरुण संशोधकांना देश विकासाच्या कार्याला प्रेरित केले.

या संशोधकांना उद्देशून ते म्हणाले,

” तरुण मित्रांनो प्रकल्प अहवाल लिहिण्यात आपला अमूल्य वेळ घालवू नका. सांघिक अशा कार्यातून देशाला प्रगतिपथावर न्या.” ” तरुण मित्रांनो प्रकल्प अहवाल लिहिण्यात आपला अमूल्य वेळ घालवू नका. सांघिक अशा कार्यातून देशाला प्रगतिपथावर न्या.”

तेव्हापासून ट्रॉम्बे येथील ही संस्था साऱ्या जगातील संशोधकांची प्रेरणा बनून राहिली आहे. मुंबई येथे परतल्यावर ते दिल्लीला जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटले.

भारताच्या अनु ऊर्जा संशोधनासंबंधी त्यांनी नेहरूं बरोबर चर्चा केली. मुंबईला परतल्यावर त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, भारत अणुऊर्जा साठी सर्वात मोठा रिॲक्टर बदलणार आहे. त्याद्वारे भारत स्वतंत्रपणे वीजनिर्मितीला सुरुवात करीत आहे. या बातमीने जगातील अमेरिकेसारख्या राष्ट्रांचे धाबे दणाणले. याचे कारणही तसेच होते.

अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात, जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या महानगरावर हल्ले करून लाखो लोकांचे बळी घेतले होते. अणू शक्तीच्या अशाप्रकारच्या वापराने तिसरे महायुद्ध होऊ नये असे जगातील अनेक राष्ट्रांना वाटत होते.

डॉ. होमी भाभा या दडपणाला बांधले नाहीत. त्यांनी हे संशोधन व रिॲक्टर बनविणे सुरू ठेवले. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व डॉ. होमी भाभा युनोतील आपल्या भाषणात साऱ्या जगाला अशी ग्वाही दिली की, अणू संशोधनाचा उपयोग मूलभूत अशा संशोधन कार्यासाठी करण्यात येणार आहे.

या संशोधनाने जगात शांतता प्रस्थापित व्हावी, असे आम्हाला वाटते. भारतात शांतता आणि समृद्धी नांदावी, या उद्देशाने त्यांनी अनु प्रकल्प सुरू केला आहे. त्यांच्या नंतर भारतानेही त्यांचे धोरण पुढे चालू ठेवले. युनो मधील त्यांच्या या भाषणाने युनोचे सदस्य इतके प्रभावित झाले की, त्यांनी डॉक्टर बाबा यांना युनोचे अध्यक्ष केले.

त्यावेळी डॉ. होमी भाभा यांच्या मदतीने इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी ही जगातील संस्था सुरू करून डॉ. होमी भाभा यांना नातीचे गव्हर्नर केले. युनो तील काही कामगिरी आटोपल्यावर ते लंडनला गेले. तेथील डॉ. कॉफ्ट ज्या अनुशक्ती च्या शास्त्रज्ञा सोबत भारतातील अनुसंशोधन संबंधी चर्चा केली.

पुढे त्यांना घेऊन ते मुंबईला आले. त्यांच्या सहाय्याने डॉ. भाभा यांनी भारतातला पहिला रिॲक्टर बनविला. त्या रिॲक्टरच्या सहाय्याने भारताने अनुषक्ती वर विज निर्मिती सुरू केली. आणि भारतात अनुषक्ती ते एक नवे पर्व सुरू झाले. इतर शास्त्रज्ञांच्या मदतीने त्यांनी आणखी दोन रिॲक्टर्स बनविली.

पहिला रिॲक्टर गुजरात व महाराष्ट्र साठी, दुसरा तामिळनाडू साठी तर तिसरा रिॲक्टर राजस्थान साठी बनविला. त्यासाठी लागणारा युरेनियम हा धातू सुरुवातीला अमेरिकेकडून व नंतर रशियाकडून मिळविण्यात आला. युरेनियमचे परावलंबित्व ही नंतरच्या काळात दूर झाले.

डॉ. एस. के. जैन यांनी तामिळनाडूच्या मरीन बीचवर फिरत असताना, एक चमकणारा पदार्थ पाहिला. तो पदार्थ रसायन प्रक्रिया करता पाठविण्यात आला नि सुमारे दीडशे किलोमीटर परिसरात युरेनियमचे साठे असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी चेन्नईच्या पर्वतरांजीतही अशा प्रकारचे युरेनियमचे साठे सापडतील असा आशावाद व्यक्त केला.

आज भारताने अवकाश संशोधन, शेती, अन्न, औषधे, वीज निर्मिती, दूरदर्शन यासारख्या क्षेत्रात जी प्रगती केली, त्याचे सारे श्रेय डॉ. होमी भाभा यांना दिले पाहिजे.

मुंबईच्या सुखवस्तू पारशी घराण्यात जन्मलेले होमी भाभा हे एक अद्वितीय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. बालपणापासून त्यांचा ओढा संशोधनाकडे दिसून आला. त्यांच्या वडिलांनी त्यांना सिनेमा, कपडे, खेळणी याऐवजी पुस्तक वाचण्याचा छंद लावला.

त्यांच्या लहानपणी त्यांच्या घरातील ग्रंथालयात विविध वैज्ञानिक, संगीतातील, चित्रकले संबंधी पुस्तके होती. चांगल्या वाचनाचे असेच संस्कार होमींवर केले गेले. विद्यार्थिदशेत गणितातील दोन ट्राइपॉज मिळवणारे डॉ. भाभा हे एकमेव विद्यार्थी होते. ते उत्तम चित्रकार देखील होते. ते व्हायलिन छान वाजवायचे. अशक्त संगीतातील सिंफनीचे चाहते होते.

बिथोवन या प्रसिद्ध पाश्‍चात्त्य संगीतकाराचे ते चाहते होते. इंग्लंडला असताना त्यांनी अनेक आर्ट गॅलरीज ना भेट दिल्या होत्या. कर्नाटकी संगीताची त्यांना विशेष आवड होती. यांनी काढलेली स्केचेस आजही त्यांच्या मधील कलावंताची साक्ष देतात. आईच्या एका वाढदिवशी त्यांनी गाय आणि वासरू चे चित्र काढून ते आईला भेट दिले होते.

त्यांनी लहानपणीच आपल्या घरातील एका खोलीत छोटी प्रयोगशाळा उभारली होती. त्यात प्रयोग करीत वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी आईन्स्टाईन चा सापेक्षतावादाचा सिद्धांत समजावून घेतला होता. अर्भकावस्थेत त्यांना संगीताची जाण असल्याचे त्यांच्या आईच्या लक्षात आले. छोटा होमी जेव्हा जेव्हा रडायचा तेव्हा तेव्हा आई त्याला संगीत ऐकवायची आणि होमी रडायचे थांबवायचा. अष्टपैलू शास्त्रज्ञाचे चरित्र कार्याचे स्मरण करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.

१९५७ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा बहुमानाचा किताब बहाल केला. युरोपातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी दिली. असे डॉ. होमी भाभा हे युनोच्या कॉन्फरन्ससाठी जिनेव्हाला जात असताना २४ जानेवारी १९६६ रोजी त्यांच्या विमानाच्या जबरदस्त अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले.

या महान शास्त्रज्ञाचे विचार व अनु ऊर्जेचे स्वप्न वास्तवात आणून भारत खऱ्या अर्थाने एक शक्तिशाली राष्ट्र बनविणे, हेच त्यांना अलौकिक अशी श्रद्धांजली ठरावी.

प्रा. डॉ. पांडुरंग भानुशाली

Post Comment