देश

तब्बल साडेसहा महिन्यांनंतर रुग्णसंख्या 20 हजाराच्या आत, गेल्या 24 तासात 179 जणांचा मृत्यू

Published

on

[ad_1]

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसतोय. गेल्या 24 तासात देशात 18 हजार 795 रुग्णांची भर पडली असून 179 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी नोंद झालेली रुग्णसंख्या ही गेल्या साडेसहा महिन्यांनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे देशासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 24 तासात देशात 26 हजार 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात सोमवारी पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाच्या लसीचे एक कोटी डोस देण्यात आले असून आतापर्यंत 87 कोटी डोस पूर्ण झाले आहेत. केरळमध्ये काल 11 हजार 699 नव्या रुग्णांची भर पडली असून 58 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या एक लाख 57 हजार 158  सक्रिय रुग्ण संख्या आहे.

देशातील सध्याची कोरोना स्थिती : 

Advertisement
    • कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 36 लाख 97 हजार 581
    • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 29 लाख 58 हजार 002
    • सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : दोन लाख 92 हजार 206
    • एकूण मृत्यू : चार लाख 47 हजार 373
    • देशातील एकूण लसीकरण : 87 कोटी 07 लाख 08 हजार 636 डोस

महाराष्ट्रातील स्थिती 
कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख राज्यातही खाली येताना पहायला मिळत असून कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी  2895 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात काल 2 हजार 432  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 62  हजार 248  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या :

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेंडिंग

Exit mobile version