आरोग्य
Baby Care Tips : पावसाळ्याच्या दिवसांत लहान बाळाची ‘अशी’ घ्या काळजी!
[ad_1]
बालरोगतज्ञ डॉ. सीमा जोशी यांनी माहिती दिलीये की, दूषित अन्न व पाण्यामुळे होणारे आजार तसेच त्वचेवर पुरळ उठणे, डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या डासांपासून पसरणाऱ्या आजारही लहान मुलांमध्ये पहायला मिळतात. या समस्या मुलांबरोबर पालकांनाही हैराण करतात. अशावेळी पालकांनी घाबरून जाऊ नये आणि वेळीच निदान व उपचार केल्यास मुलं लवकर बरे होण्यास मदत होते.
पावसाळ्यात पालकांनी ही खबरदारी घ्यावी
डॉ. जोशी पुढे म्हणतात की, शिंका येणे, सर्दी, ताप किंवा अंगदुखी यांसारख्या पावसाळ्याशी संबंधित दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा. जसं की, आजारी व्यक्तींपासून मुलांना दूर ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता, आपले घर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखणे, पावसात भिजल्यानंतर डोकं कोरड करावे आणि ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नये इत्यादी. संसर्ग वाढू नये म्हणून त्वरित आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.
घरगुती उपचार किंवा ओव्हर-द-काउंटर औषधांचा मारा करुन बाळाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. असे करणे बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
1. बाळाला पूर्ण बाह्यांचे सुती कपडे घाला. जेणेकरुन डास चावणार नाही तसेच थंड वातावरणापासून संरक्षण होईल. डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करा.
2. घरात डासांना प्रतिबंध करण्यासाठी जाळीच्या खिडक्या , झोपताना मच्छरदाणीचा वापर, डासांपासून बचाव करणारी औषधे वापरा तसेच नैसर्गिक घटकांचा समावेश असलेले पर्याय निवडा.
3. संध्याकाळच्या वेळी फिरणे टाळा.
4. घराजवळ टायर, बॅरल, जार, बादल्या, भांडी किंवा ड्रममध्ये पाणी साचणार नाही याची खात्री करा.
5. वेळोवेळी फवारणी केले जाते की नाही हे पालकांनी तपासून घ्यावे.
6. तुमचे घर वेळोवेळी स्वच्छ करा.
7. घरात गळती किंवा ओलसरपणा नसावा बुरशीची वाढ होऊ शकते आणि बाळाला ऍलर्जी आणि संक्रमण होऊ शकते. बाळाच्या आरोग्यासाठी घर निर्जंतुक करणे अत्यावश्यक आहे.
पावसाळ्याच्या दिवसात बाळाची काळजी कशी घ्यावी, यासाठी डॉ. सीमा जोशी यांनी काही टीप्स दिल्यात आहेत.
बाळाच्या स्वच्छतेची काळजी घ्या
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे येणारा घाम टाळण्यासाठी, तुमच्या बाळाला स्व्छ पुसून घ्या. त्यांचे कान, काखेतील भाग आणि जननेंद्रियांकडे विशेष लक्ष द्या कारण या भागात संक्रमणाची शक्यता अधिक असते. बाळाला स्वच्छ आणि कोरडे कपडे घाला. फक्त डॉक्टरांनी शिफारस केलेली त्वचा आणि केसांच्या स्वच्छतेकरिता उत्पादने वापरा. वेळोवेळी मुलांची नखं कापा.
बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
तापमानात चढउतार झाल्यामुळे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. पोषक आहार आणि स्तनपान हा एक उत्तम उपाय ठरु शकतो. आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करण्यासाठी आपल्या बाळाच्या आहारात विविध फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
बाळाचे डायपर
बाळाचे डायपर वारंवार बदलण्याचा प्रयत्न करा कारण ओले डायपर रॅश तसेच त्वचेसंबंधीत संसर्गास कारणीभूट ठरते.
बालरोगतज्ञांना वेळोवेळी भेट द्या
बाळाच्या आरोग्याचे आणि विकासाचे निरीक्षण करण्यासाठी नियमित तपासणी करणे टाळू नका.तुमच्या बाळाला विविध आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरण, फ्लूचे शॉट्स द्यायला विसरु नका. आवश्यक असल्यास तुमचे डॉक्टर तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी घेण्यास सुचवू शकतात.घरातील लहान मुलांच्या आरोग्यास बाळाचे प्राधान्य देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात मुलांना आजारपणापासून दूर ठेवण्यासाठी वर दिलेल्या टिप्सचा अवलंब करा.
[ad_2]