×

एक आगळा वेगळा माणूस अण्णा हजारे

Anna Hajare

एक आगळा वेगळा माणूस अण्णा हजारे

मी अण्णा हजारे. मी अण्णा हजारे असे लिहिलेली पांढरीशुभ्र टोपी प्रत्येक मनुष्याच्या, मग पुरुष असो, मी असो किंवा मुलगा मुलगी, कोणीही असो, डोक्यावर हजारोंच्या संख्येने घातलेले प्रत्येक शहरात दिसत होते. अण्णा हजारे यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले आणि हा चमत्कार घडला असा चमत्कार भारताला स्वातंत्र्य मिळून आता 64 वर्षे पूर्ण झाली, पण केव्हाही घडला नाही. पण हा असा चमत्कार घडवणारे अण्णा हजारे कोण? त्यांच्याबद्दल किती लोकांना माहिती आहे. मराठी माणसाला ती किती माहिती आहे कारण अण्णा हजारे महाराष्ट्र आहे.. मराठी माणूस आहेत.

अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन छेडले या अगोदर त्यांनी माहितीचा अधिकार मिळण्यासाठी आंदोलन छेडले होते आणि सामान्य जनतेला त्यांनी हा अधिकार मिळवून दिला. 9 ऑगस्ट 2003 रोजी अण्णा हजारे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर माहितीचा अधिकार मिळावा म्हणून उपोषण केले होते. गरीब माणसाला न्याय मिळावा, वाढत्या भ्रष्टाचाराला आळा बसावा, स्वातंत्र्याचा लाभ व्हावा. त्यासाठी त्यांनी आझाद क्रांती मैदानावर उपोषणास सुरुवात केली. यांच्या प्रमुख मागण्या होत्या-

-माहितीचा अधिकार जनतेला कायद्याने मिळायलाच पाहिजे.

  • कायद्याने अधिकार मिळालाच पाहिजे .
  • ऑफिस कामातील दिरंगाईदूर झालीच पाहिजे .
  • अधिकाऱ्यांच्या बदल्या संबंधाने कायदा करा .
  • पन्नास टक्के महिलांना ठराव केलेल्या गावात दारूबंदीची अंमलबजावणी करा .
  • धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सोडवा.
  • उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव द्या.

या सर्व मागण्या महत्त्वाच्या आहेत. अण्णांच्या उपोषणानंतर आपल्याला माहितीचा अधिकाराचा कायदा संमत करण्यात आला. त्याचा किती फायदा झाला आहे. याचा अनुभव आपण घेतलाच आहे. हा फायदा सोनिया गांधींनी केला असा प्रचार काँग्रेसवाले करतात. त्याचे श्रेय तिला देत असतील, पण हा कायदा अण्णांमुळे प्रत्यक्षात आला आहे हे नक्कीच,.

आपल्याला माहीतच आहे भ्रष्टाचारा विरुद्ध अण्णांनी आंदोलन छेडले होते. त्याला सर्व वयाच्या जनमानसाचा भरपूर पाठिंबा मिळाला होता.. त्यामुळे यूपीए सरकार हादरून गेले होते. यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला अनेक तर यांनी मोडण्याचे कारस्थान सुरू केले होते. या अगोदरही वाकड्या तोंडाचा गांधी आणि धोतरात ला खैरनार असे म्हणून त्यांना हिणवण्यात आले होते. पण अण्णांनी त्याला महत्त्व दिले नाही. आपले भ्रष्टाचाराचे आंदोलन सुरूच ठेवले.

हजारे यांना त्यांच्या राळेगण-सिद्धी गावाच्या आमसभेचे त्यांना गांधी या नावाने संबोधनाचे ठरवले होते. अर्थात या देशात आणि जगात एकच गांधी होऊन गेले उपमा दिल्याने दुसरा कोणी गांधी होणार नाही. हे जितके खरे असले तरी अण्णा हजारे यांनी जे काम केले आहे आणि ते काम ते करत आहेत ते महात्मा गांधी यांनी केलेल्या कामा इतकेच आणि त्या तोडीचे आहे हे नक्कीच. पण त्यांनी असे काय केले आहे.

अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी या गावचे सुपुत्र पुणे-नगर महामार्गावर शिरूर पासून 15 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. शिरूर पासून पुढे गेल्यावर सहा किलोमीटर अंतरावर डावीकडे पारनेर ला एक रस्ता जातो. रस्त्याने तीन किलोमीटर आत गेले की वृक्षराजी च्या कुशीत राळेगण आहे. राळेगणसिद्धीला तीर्थक्षेत्राचे रूप आले आहे. हे गाव एक नंदनवन आहे आणि ते नंदनवन करण्याचे श्रेय अण्णा हजारे यांना जाते.

अण्णा हजारे यांचा जन्म राळेगणचा हे गाव आणि तेथील लोक दैनावस्थेत जीवन जगत. कारण हा भाग काही दुष्काळी होता. अण्णांचे कुटुंब ही हे दुष्काळाचे चटके सहन करत होते. कसे तसे तरी जीवन जगावे म्हणून मजुरी करून पोट भरत. अशा हालाखीत अण्णांचे बालपण गेले. शाळेची सोय नव्हती. त्यामुळे शिक्षण आठवीपर्यंतचे झाले. पुढे शिकायची इच्छा असून ऐपत नसल्याने जमले नाही. मोलमजुरी करणे एवढाच मार्ग होता. पण अण्णांच्या नशिबाने त्यांना आर्मीमध्ये जाण्याचा योग आणला. आर्मी सर्विस कोर मध्ये ड्रायव्हर म्हणून जॉईन झाले. अण्णा शांत स्वभावाचे. त्यामुळे त्यांचे दोस्त अनेक. 1965 सातच्या भारत-पाक युद्धात ते आघाडीवर होते. त्यानंतर त्यांनी आपली सेवा संपवली आणि ते राळेगणला परतले.

त्यांना वाचनाचा छंद होता. योगायोगाने विवेकानंदांचे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. विवेकानंद ब्रह्मचारी होते. ब्रह्मचारी राहून प्रपंच करता येतो हे त्यांना समजले. सैन्यात असताना त्यांनी हे पुस्तक वाचले होते. त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निश्चय केला आणि सैन्यातून ते परतले. घरी परतल्यावर राळेगणसिद्धीचे भग्न माळरान पाहून ते उद्विग्न झाले.

गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ वणवण करावी लागत होते. मोलमजुरी करणे, ऊस तोडी च्या दिवसात साखर कारखान्याकडे जाणे. जाताना बरोबर चिमुकल्यांना आपल्याबरोबर चालवत नेणे. लहानग्यांचे हाल बघवत नसत. पुरुष मंडळी हातात पैसे मिळाले की दारूच्या दुकानाकडे वळत . संसाराची नासधूस होई. पण या सर्व संकटातून गाव कसे वाचवायचे, गावात समृद्धी कशी आणायची की हा मोठा आणि कठीण प्रश्न अन्न पुढे होता.

राळेगणसिद्धीचे दैवत यादव बाबा मंदिर, त्याची पडझड झाली होती. अण्णा नेहमी यादव बाबांच्या दर्शनाला जात त्यांनी त्यांची, मंदिराची डागडुजी करण्याचे ठरवले. कुणाकडे हात पसरला नाही. त्यांनी आर्मी सोडल्यानंतर त्यांना मिळालेले 15000 खर्च केले.गावकऱ्यांना प्रश्न पडला मंदिरासाठी पैसा कुठून आला. गावकरी एकत्र आले. त्यांना आपणही या गावासाठी, माणसांसाठी काहीतरी करावे असे ठरवले. अण्णांशी चर्चा करून गावाची उन्नती करण्यासाठी पाच सूत्रे ठरवण्यात आली.

  1. व्यसनमुक्ती
  2. स्वावलंबन
  3. .श्रमदान
  4. श्रद्धा
  5. परिश्रम

गावकरी अण्णा भोवती गोळा झाले. या पाच सूत्रांप्रमाणे राळेगण सिद्धीचा कायापालट करायला सुरुवात झाली. गावातील तरुणांना गावातील दारू भट्ट्या बंद करायला सांगण्यात आले. विरोध झाला, त्रास सोसावा लागला, पण पहिली दारूबंदीची मोहीम यशस्वी झाली. व्यसनासाठी होणारा खर्च थांबला. घरात चार पैसे पाठवू लागले. लोक कामाला लागले

त्यानंतर ची मोहीम होती स्वावलंबन. यादव बाबाच्या मंदिरात नंदी दीप उजळला. अण्णा स्वतः सर्व गावकऱ्यांना घेऊन गावाच्या नाल्या कडे गेले. पाणी अडवण्याचे काम सुरू झाले. लोकांनी श्रमदान करून नाल्यावर बांध घालायला सुरुवात झाली. पाण्याच्या ओघळीचे मार्ग बंद झाले. पावसाळा आला.ओढ्यात साठलेले पाणी धरणी जिरू लागले.

गावातल्या विहिरीला भरपूर पाणी लागले. काळातही विहिरी तुडुंब भरल्या. बागायती क्षेत्र वाढले. फळे, भाजीपाला, धान्य नागपूर निघाले. गावकरी खुश झाले. यादव बाबा मंदिरात दिवे पेटले जत्रा मोठ्या प्रमाणावर झाली. राळेगण सिद्धी चा कायापालट व्हायला सुरुवात झाली. माणसे चांगल्या वाईटाचा विचार करू लागले. विकास होऊ लागला पूर्वी 70 एकर बागायत क्षेत्र होते, आता ते वाढून बाराशे एकर पर्यंत झाले. आधुनिक कृषी तंत्राचा उपयोग करण्यात येऊ लागला. गावातल्या शेतकऱ्यांच्या हाती भरपूर पैसा आला ते एकत्र आले. गावची हरिजन दलित माणसे कर्जाने पीचली होती ती आपलीच आहेत त्यांचे कर्ज फेडावे असा विचार करण्यात आला. सर्वांनी मिळून हरिजन दलित भावंडांचे कर्ज फेडले. सामाजिक बांधिलकीचा नवा प्रवास सुरू केला. सर्व गावकरी जात-पात माणुसकीच्या भावनेने एकत्र आले बंधुभाव निर्माण झाला.

अण्णांनी केलेल्या राळेगणसिद्धीमध्ये केलेल्या परिवर्तनाने अचंबित झाले. सरकारनेही त्याची दखल घेतली. त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार प्रदान केला. अण्णा म्हणतात आपल्याला मिळालेला, देवाने दिलेला महा पुरस्कार आहे. यापुढे मानव निर्मित पुरस्कार थिटे आहेत. खरतर या पुरस्कारांचे उपयोग मनुष्याने आपले कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी केला पाहिजे. मला मिळालेला पद्मभूषण हा पुरस्कार म्हणजे यादव बाबांचा आशीर्वाद व राळेगणांच्या लोकांचे सहकार्य.

विकासासाठी 300 खेडी दत्तक घेतली. प्रत्येक खेड्याने अण्णांना केलेल्या नियमाप्रमाणे काम करावे हि एकच अट होती. राळेगणला विद्यामंदिर नावाचे एकविद्यालय आहे. तिथे मानवता व्यावहारिक शिक्षण दिले जाते. कैलास विद्यामंदिर म्हणायला हवे अशी अण्णांची धारणा. या विद्यामंदिरात इतर शाळांच्या प्रवेश देण्यात येत नाही अशाच मुलांना प्रवेश मिळतो. ही शाळा विद्यार्थ्यांना आजही शिक्षण देते की विद्यार्थी बाहेर पडला की योग्य नागरिक म्हणून तो वावरतो. अनेकांनी त्याचा आजपर्यंत फायदा घेतला आहे. राळेगणमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शक्तीवर चालणारी सूर्यचूल, सौरशक्ती वर चालणारी मोटर ,माणूस जनावरांच्या मलमूत्र पासून तयार होणारा बायोगॅस, गांडूळ शेती वगैरे गोष्टी आहेतच.

अण्णा हाडाचे सैनिक आहेत, देशभक्त आहेत. आजन्म ब्रह्मचारी राहून आपले गाव हे आपले कुटुंब समजून काम करतात कर्मयोगी म्हटले. अण्णा जे काम करत आहेत ते काम एक शिस्तबद्ध सैनिकच करू शकतो. अण्णांच्या मध्ये सैनिक कोण त्याने काम करायला हवे ते काय म्हणतात पहा, खरं तर भारत मातेचे प्रत्येक बालक व बालिका व तरुण-तरुणी देशाचे सेवक आहेत. अर्थात त्यांना मी सैनिक म्हणतो. मात्र कर्म घालू शस्त्र दराने सेवा करणारा सैनिक अष्टपैलू हिरा बनतो.

कोणत्याही क्षेत्रात त्याने हिरा प्रमाणे चमकायला हवे ही. दयेची याचना तर सैनिकाने मुळीच करू नये. आताच्या बाळावर हिमतीने प्रेरणादायी ठरेल असे कार्य करण्यासाठी प्रयत्नशील बनायला हवे. कार्य मोठे असुद्या अगर छोटे असुद्या त्यात निष्ठा परिश्रम हे सदैव असले पाहिजेत. प्रगत तंत्रज्ञानाचा परिचय करून त्याचा व्यवहारात डोळसपणे उपयोग करून घेतला पाहिजे. पली मुले तुझा नागरिक होऊन मायभूमीच्‍या सेवेसाठी कोणत्याही व कुठल्याही क्षेत्रात योगदान कशी देतील यासाठी संस्कार घडवले पाहिजे. याचक न बनता दानशूर बनण्यासाठी सैनिकाने कार्य करावे.

अण्णांचे राळेगणसिद्धीमध्ये घर आहे. पण गेल्या पस्तीस वर्षात ते स्वतःच्या घरी गेले नाहीत. जमीन आहे तीन भाऊ आहेत त्या भावाच्या मुलांची नावे काय आहेत हे जाणूनही घेतले नाही. ब्रह्मचर्य घेऊन ही अण्णांचा प्रपंच सुटलेला नाही, चार भिंतीच्या आत लहान प्रपंच करण्याचे यांची मोठा प्रपंच झाला आहे. याप्रमाणे लहान प्रपंचामध्ये कुटुंबावर कुणाचा अन्याय झाला की कुटुंबाला सहन होत नाही, त्याचप्रमाणे अण्णांचा प्रपंच मोठा झालेला असल्याने सामान्य माणसावर अन्याय झाला की सहन होत नाही. गरीब माणसावर होणारा अन्याय सहन होत नसल्याने, गरीब माणसांना दिलासा देण्यासाठी अण्णांचे कार्य सुरू आहे.

आज त्यांचे वय 82 वर्ष आहे या वयातही ते सर्व ठिकाणी लोकांपुढे जात आहेत. पण आमचे आजचे भ्रष्ट पुढारी अण्णा बदनाम करून त्यांना ते स्वतः भ्रष्ट ठरवत आहेत.. एकच ध्यानात ठेवायची गरज आहे स्वतः भ्रष्ट असलेला माणूस लोकांसमोर उजळ माथ्याने जाऊ शकणार नाही.आपल्या भारत देशातील भ्रष्टाचाराने मिश्रित असलेल्या जनतेने त्यांना भक्कम साथ दिली पाहिजे. स्वतः अण्णा हजारे व्हायला हवे, तेव्हा मी अण्णा हजारे म्हणा.

Post Comment