×

जगप्रसिद्ध टाईम मासिक विचारतय खरंच… फेसबुक डिलीट करायची वेळ आली आहे का ?

जगप्रसिद्ध टाईम मासिक विचारतय खरंच… फेसबुक डिलीट करायची वेळ आली आहे का ?

[ad_1]

जग प्रसिद्ध  टाइम या मासिकने नुकतच फेसबुक चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा फोटो कव्हर पेज वर प्रकाशित केलं आता तुम्हाला वाटत असेल यामध्ये नवीन काय आहे . तर यामध्ये झालंय असं कि टाइम्स मासिकाने एवढ्यावरच न थांबता वाचकांना सरळ सरळ प्रश्न विचारून टाकला कि “Delete ‘Facebook ?” आणि त्याला पर्याय सुद्धा दिला. त्यामध्ये त्यांनी “Cancel” किंवा “Delete” हि दोन पर्याय सुद्धा दिलीत.

फेसबुक चे मॅटर समजून घेण्याआधी आपण हे समजून घेऊ कि ज्या मासिकाच्या मुखपृष्टाची एवढी जगभर दखल घेतली जात आहे, ते टाइम मासिक आहे तरी काय ?

३ मार्च १९२३ रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात ब्रिटन हेडन आणि हेनरी लुईस या जोडीने टाइम मासिक सुरु केले.सुरुवातीला टाइम हे दर आठवड्याला प्रकाशित करण्यात येत होतं. काळाच्या ओघात टाइम मासिक प्रसिद्ध होत गेले. त्यांचा खप मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता.

इतर खंडामध्ये सुद्धा त्यांना उत्तम प्रतिसाद  मिळत गेला आणि त्यांचा खप मोठ्या प्रमाणात वाढत गेला. त्यामुळे ते एक जागतिक स्तरावरील मासिक बनले. त्याचवेळी त्यांनी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली. तसेच ‘मॅन ऑफ द इयर’ म्हणून दरवर्षी ते जगातील सर्वात प्रभावी व्यक्तीची निवड करून त्यांचा फोटो मुखपृष्ठावर छापू लागले. त्यामुळे टाइम मासिकाच्या मुखपृष्टाची चर्चा जगभर गाजू लागली.

आता आपण बघूया कि याच टाइम मॅगझीन ने मार्क झुकेरबर्ग यांचा मुखपृष्ठावर फोटो छापून मासिकात काय म्हटलंय ते..

या मासिकात फेसबुक वर जो लेख लिहण्यात आला आहे त्याचे लेखक आहेत बिली पेरेगो यामध्ये ते म्हणतात कि,

“फेसबुक ची भविष्यातील वाटचाल जरी कशीही असली तरी हे स्पष्ट आहे कि तेथे अंतर्गत असंतोष पसरत आहे. होगन यांनी कागद पत्र लीक केल्याने आणि खासदारांना माहिती पुरविल्याने सोशल मेडिया वरील नियम अधिक कडक होण्यास मदत मिळाली आहे.”

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि फ्रॅन्सिस होगन आहेत तरी कोण. तर त्या आहेत फेसबुकच्या माजी कर्मचारी ज्यांच्यावर माहिती लीक करण्याचा आरोप करण्यात आला. पण फेसबुकवर असे आरोप होण्याची हि काय पहिली वेळ नाही. या आधीही फेसबुक वर माहिती लीक करण्याचे, हिंसा भडकवण्याचे, राजकीय पक्षांना मदत केल्याचे आरोप झाले आहेत.

मोठ्या वादाची सुरुवात हि झालीये २०१६ च्या अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांपासुन. तेव्हा फेसबुक वर आरोप करण्यात आला होता कि फेसबुक ने ट्रम्प यांना निवडून येण्यासाठी मदत केली.फेसबुक वर येणारे ट्रेंडिंग सेक्शन कंपनी स्वतः ठरवत असे असा आरोप कंपनीच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी केला होता.

त्यानंतर लगेच २०१८मध्ये  केम्ब्रिज ऍनॅलिटीका घोटाळा उघडीस आला यामध्ये केम्ब्रिज ऍनालिटिका कडे फेसबुक ८७ मिलियन लोकांचा डेटा सापडला ज्यामध्ये ते याचा वापर अमेरिकेतील निवडणुकीमध्ये तसेच ब्रेग्झिट च्या निवडणुकींमध्ये त्याचा वापर होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं

गेल्या वर्षी सुद्धा अमेरिकेतील वॉल स्ट्रीट या मॅगझीन ने एक अहवाल प्रकाशित करून खळबळ माजवली होती त्यांमध्ये त्यांनी सांगितलं होत कि फेसबुक ने मुद्दामहून भारतीय जनता पार्टी च्या नेत्याने दिलेल्या ‘हेट स्पीच’ वर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.

जगभरात फेसबुक वर होणारे आरोप बघता फेसबुक च्या विश्वासहार्यतेवर पुन्हा पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. सर्वोत्कृष्ट प्रायव्हसी असा टेंभा मिरवत जगभरात नावारूपास आलेल्या फेसबुक वर युजर ची प्रायव्हसी धोक्यात घातल्याचा आरोप विविध स्तरातून होणे ही चिंतेची बाब आहे. फेसबुक चे जगभरातील युजर ची संख्या बघता हे जगभरची धोकादायक आहे.

आता फेसबुक वापरायचं कि नाही हे आता लोकांनीच ठरवायचं आहे हेच टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावरून सांगण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.

[ad_2]

Post Comment