×

ठाकरे सेनेच्या माध्यमातून बांदा आरोग्य केंद्रात औषध वाटप

ठाकरे सेनेच्या माध्यमातून बांदा आरोग्य केंद्रात औषध वाटप

[ad_1]

बांदा ता.२८: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक असणाऱ्या जनरल मेडीसिनचे वाटप तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आज बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला या औषधांचे वाटप करण्यात आले.

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्राना असलेला औषधांचा तुटवडा पाहता या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ही औषधे उपलब्ध करून उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेले कार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सर्वसामान्य जनतेला ही जनरल मेडिसिन उपलब्ध करून जनसेवा करण्याचा उद्देश असून या आरोग्य केंद्रात अन्य कोणत्याही वस्तूची आवश्यकता असल्यास त्याची पूर्तता करू अशी ग्वाही रुपेश राऊळ यांनी दिली.

यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांच्याकडे ही औषधे सुपूर्द करण्यात आली. तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी ही औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर पटवर्धन यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, सावंतवाडी तालुका अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज खान, आबा सावंत, बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर, विभाग प्रमुख ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, अशोक परब, बांदा ग्रामपंचायत सदस्या सौ. देवल येडवे, सौ. रिया येडवे, ज्ञानेश्वर येडवे, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, बाळू गावडे, मंथन गवस, महेश शिरोडकर महिला आघाडी प्रमुख भारती कासार, रश्मी माळवदे, सुनील गावडे, प्रशांत बुगडे, सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे, व्यंकटेश उरूमकर आदी उपस्थित होते.

[ad_2]

Post Comment