विश्व

१०,००० खोल्यांचे हॉटेल, का होत ७० वर्षे खाली?

Published

on

कदाचित  आपण हॉटेल प्रोरा  हे नाव  ऐकलेही असेल. हे हॉटेल जर्मन आयलंड रुगेन मधील बाल्टिक समुद्राच्या किनारी आहे. हे हॉटेल म्हणजे  हिटलरच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न होय. 

जगात आजही अशा काही वास्तू आहेत की, त्यांच्या विषयीचे रहस्य आजपर्यंत कोणालाच सापडलेले नाही. त्यामुळे  अशा ठिकाणी जाणे सारेच टाळतात. त्यापैकीच हे हॉटेल आहे प्रोरा.

या हॉटेल मध्ये एकूण दहा हजार खोल्या आहेत. असे असून सुद्धा गेल्या ७० वर्षात  इथे  कोणीच  रहायला आलेले  नाही.  जर्मन मधील स्थानिकांच्या मते या हॉटेल विषयी अनेक रहस्यमय कथा असाव्यात. परंत्तू या विषयी अद्याप कोणताच ठोस पुरावा सापडलेला नाही. 

हे पण वाचा: सलग तीन वेळा भारताला लूटणारा वास्को-द-गामा!

एखाद्या वास्तूला दैवी शाप असतो त्या प्रमाणे या वास्तूला ही जणूकाही शापच मिळालेला आहे असच म्हणावे लागेल. परंत्तू मुख्य गोष्ट ही  की, हॉटेल सुरु झाल्यापासून आजपर्यंत येथे कोणीच रहायला आलेले नाही. असे का घडले याचे  खरे कारण आज पर्यंत कोणालाच सांगता आलेले नाही.

Advertisement

प्रोरा हॉटेल ची  निर्मिती – 

एडॉल्फ हिटलरची महत्वकांक्षा होती की , सर्वात सामर्थ्यवान एक प्रचंड भव्य दिव्य हॉटेल बांधायचे ज्यामध्ये एका वेळी वीस हजार हॉलीडेमेकर राहू शकतील. त्यावेळी या हॉटेलचे बांधकाम नाझींनी केले होते. या हॉटेलच्या बांधकामासाठी नऊ हजार कामगारांची नियुक्ती करण्यात अलीहोती. 

१९३६ ते १९३९ च्या दरम्यान नाझींनी या हॉटेलचे बांधकाम पूर्ण केले. हे हॉटेल बाल्टिक समद्राच्या किनाऱ्यापासून अवघ्या १५० मीटरवर  आहे. हे एक भव्यदिव्य कॉम्प्लेक्स असून यात आठ इमारती आहेत. या हॉटेल मध्ये सांस्कृतिक हॉल, सिनेमागृह, स्विमिंगपूल, हाऊसिंग ब्लॉक्स इत्यादींची  निर्मिती  करण्यात  आलेली  आहे. 

हॉटेल  प्रोरा  मध्ये  कोणी  केले  वास्तव्य –  

या हॉटेलच्या निर्मितीचा उद्देशच हा होता की , जर्मन लोकांचे मनोरंजनाचे ठिकाण असे वरदर्शनी दाखवायचे पण प्रत्यक्ष नाझी चळवळ पसरविणे हा होता. या हॉटेलच्या पूर्ततेच्या  दरम्यानच  दुसरे महायुद्ध झाले.त्यावेळी शरण आलेल्या जर्मन व हॅमबर्ग येथील लोकांना हिटलरने अतिथी म्हणून या हॉटेल मध्ये ठेवले. त्यांनतर पूर्व जर्मनीच्या लष्कराने लष्करी आउटपोस्ट म्हणून या इमारतीचा वापर केला. १९९० मध्ये  जर्मनीचे  एकीकरण  झाले. आणि तेव्हा पासून हे हॉटेल रिकामेच आहे. 

Advertisement

हॉटेल  प्रोरा मध्ये  काही  बदल घडू शकतात  का ? 

आज  जगामध्ये  व्यावसयिक घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत.त्यामध्ये हे हॉटेल समुद्र किनारी असल्याने अनेक मोठमोठाले व्यावसायिक यामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. असेही म्हटले जाते की , एका गुंतवणूक दाराने या हॉटेल मधील पाच ब्लॉक्स खरेदी केले असून येथे भविष्यात  हॉलीडे रिसॉर्ट बनविण्याचा मानस  आहे.

म्हणजेच गेल्या सत्तर  वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले हे हॉटेल पुन्हा लवकरच सुरु होऊन निसर्ग प्रेमींना येथे रहाण्याचा आस्वाद लुटता येईल.

आपणही भविष्यात जर्मनीला गेलात तर या अफलातून भव्यदिव्य वस्तूला भेट द्यायला विसरू नका.

Advertisement

1 Comment

  1. Pingback: YouTube पासून कमाई कशी होते? ✒ कोकणशक्ति

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेंडिंग

Exit mobile version