×

भारत-कॅनडामधील आरोप-प्रत्यारोपांचा परिणाम? शेअर बाजारात मोठी पडझड, ‘हे’ शेअर्स घसरले

भारत-कॅनडामधील आरोप-प्रत्यारोपांचा परिणाम? शेअर बाजारात मोठी पडझड, ‘हे’ शेअर्स घसरले

[ad_1]

Canada India Tension: कॅनडा (Canada) आणि भारत (India) यांच्यातील तणावाचा परिणाम आता शेअर बाजारावरही (Stock Market) दिसून येत आहे. आज बुधवारी शेअर बाजारात मोठे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी संथ सुरुवात केल्यानंतर शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक काही वेळातच घसरले. एकीकडे, बीएसईचा सेन्सेक्स (Sensex) 608 अंकांनी घसरून 66,988.77 वर व्यवहार करत होता, तर एनएसईचा निफ्टी इंडेक्स (NSE Nifty) 173.80 अंकांनी घसरून 19,959.50 वर व्यवहार करत होता.

शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच काही बँकिंग आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स पडले. यामध्ये विप्रो ते इन्फोसिस आणि कोटक महिंद्रा बँक ते आयसीआयसीआय बँकेपर्यंतच्या शेअर्सचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे, या सर्व कंपन्या त्याच आहेत, ज्यात कॅनडा पेन्शन फंड इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIN) चे पैसे गुंतवले जातात. मात्र, या शेअर्समध्ये सुरुवातीच्या घसरणीनंतर काहींमध्ये रिकव्हरी नक्कीच दिसून आली.

पेटीएम आणि नायकाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारत यांच्या तणाव निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. यासोबतच कॅनडा पेन्शन फंडानं गुंतवलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. आज शेअर बाजार उघडताच, ऑनलाईन पेमेंट सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications Ltd चे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले, तर फॅशन ब्युटी ब्रँड Nykaa चे शेअर्सही सुरुवातीच्या व्यवहारात दीड टक्क्यांनी घसरले.

बातमी अपडेट करेपर्यंत, पेटीएम स्टॉक 1.78 टक्क्यांनी घसरून 857.65 रुपयांवर व्यवहार करत होता, तर Nykaa स्टॉक 1.74 टक्क्यांनी घसरून 146.50 रुपयांवर व्यवहार करत होता. दोन्ही कंपन्यांच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कॅनडा पेन्शन फंडमध्ये पेटीएममध्ये सुमारे 970 कोटी रुपये आणि Nykaa मध्ये सुमारे 620 कोटी रुपये आहेत.

कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स गडगडले

कॅनडा पेन्शन फंड इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIN) नं अनेक भारतीय कंपन्यांमध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सुमारे 30 भारतीय कंपन्या आहेत ज्यांचा व्यवसाय कॅनडामध्ये पसरलेला आहे आणि त्यांनी 40 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत हा ताण वाढल्यानं या कंपन्यांवरील संकटही वाढू शकतं.

कोटक महिंद्रा बँकेबद्दल बोलायचं तर, कॅनडा पेन्शन फंडातून सुमारे 9,500 कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झालेल्या कोटक महिंद्रा बँकेनं (Kotak Mahindra Bank) बुधवारी बाजार उघडला तेव्हा तो 1,786.95 रुपयांच्या घसरणीसह उघडला, त्यानंतर त्यात थोडीशी रिकव्हरी दिसून आली आणि तो 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 1,791.70 रुपयांवर व्यवहार करत होता.

‘या’ आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरले

कॅनडा पेन्शन फंडातून गुंतवणूक मिळालेल्या कंपन्यांच्या यादीत ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्स (Zomato Share Fall) मध्येही पडझड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. Zomato Stock 0.88 टक्क्यांनी घसरुन 101.25 रुपयांवर व्यवहार करत होता. जर आपण कॅनडामध्ये व्यवसाय करणाऱ्या आयटी कंपन्यांकडे पाहिलं तर विप्रो लिमिटेडचे शेअर्स घसरणीसह उघडले आणि बातमी अपडेट करेपर्यंत ते 0.78 टक्क्यांनी घसरून 432.75 रुपयांवर पोहोचले होते. तर इन्फोसिसचा शेअर (Infosys Share) सुमारे एक टक्का घसरून 1,478.00 रुपयांवर आला होता.

[ad_2]

Post Comment