देश

फोनवर हिंदी बोलणं महाग पडलं, इंजिनिअरला नोकरी गमवावी लागली

Published

on

[ad_1]

Fired for speaking Hindi: नोकर कपात (Job Cut) अथवा शिस्तभंगाच्या कारणाने नोकरी जाणे ही नेहमीची बाब आहे. अशा घटना सतत घडत असतात. गेल्या दीड वर्षापासून जगभरात नोकर कपात सुरू आहे. पण नोकरीवरून काढल्याचं हे प्रकरण मात्र धक्कादायक आहे. फोनवर हिंदीत (Hindi) किंवा इतर कोणत्याही भाषेत बोलल्याने नोकरी जाऊ शकते, याची तुम्ही कधी कल्पना करू शकता का? मात्र, असे घडलं आहे.

कंपनीविरुद्ध खटला दाखल केला

नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे. फोनवर हिंदीत बोलल्यामुळे एका इंजिनिअरला आपली नोकरी गमवावी लागली आहे. हे प्रकरण अमेरिकेतील असून भारतीय वंशाच्या अभियंत्याशी संबंधित आहे. भारतीय वंशाचे अभियंता अनिल वार्ष्णेय यांनी त्यांच्या तत्कालीन कंपनीविरुद्ध याबाबत खटला दाखल केला आहे. अनिल वार्ष्णेय हे 78 वर्षांचे आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गमावली नोकरी

वार्ष्णेय यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ते आपल्या कुटुंबातील एका आजारी सदस्याशी फोनवर बोलत होते. त्यांचे संभाषण हिंदीत होत होते आणि याच कारणावरून ते काम करत असलेले पार्सन्स कॉर्पोरेशनने त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोकरीवरून काढून टाकले. या कारणाने आता अनिल यांनी जून महिन्यात अलाबामा प्रांतातील न्यायालयात खटला दाखल केला आहे.

अनेक दशके अमेरिकेत वास्तव्य

वार्ष्णेय यांच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि त्यानंतर त्यांनी अमेरिका गाठली. वार्ष्णेय हे अनेक दशकांपासून अमेरिकेत आहेत आणि आता त्यांचे वय 78 वर्ष आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत तो हंट्सविले क्षेपणास्त्र संरक्षण कंत्राटदार कंपनी पार्सन्स कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ यंत्रणा अभियंता म्हणून काम करत होते.

Advertisement

वर्णद्वेषाचा आरोप

वार्ष्णेय हे 1968 पासून अमेरिकेत आहेत. त्यांनी ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीमधून इंडस्ट्रियल अॅण्ड सिस्टम्स इंजिनियरिंग मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांची पत्नी शशी यांनी नासामध्ये काम केले आहे. वार्ष्णेय यांनी या खटल्यात सांगितले की, ते सर्वोत्कृष्ट संरक्षण अभियंत्यांपैकी एक आहे आणि त्याला कॉन्ट्रॅक्टर ऑफ द इयरचा पुरस्कारही मिळाला आहे. वार्ष्णेय यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांवरही वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. वर्णद्वेषातून आपली तक्रार करण्यात आली आणि नोकरी गमवावी लागली असल्याचे त्यांनी म्हटले.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेंडिंग

Exit mobile version