×

नियोजित झाराप पत्रादेवी महामार्गावर लावलेली ७२ कोटीची झाडे कुजली…

नियोजित झाराप पत्रादेवी महामार्गावर लावलेली ७२ कोटीची झाडे कुजली…

[ad_1]

कोटयावधीचा अपहार; शैलेश लाड यांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी…
बांदा ता.०२: झाराप पत्रादेवी चौपदरी महामार्गावरील २२ किलोमीटर परिसरात तब्बल ७२ कोटी रुपये खर्च करुन लावण्यात आलेली झाडे ही अतिवृष्टीत कुजल्याची धक्कादायक माहीती पुढे आली असून या कामात कोट्यावधीचा अपहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे विधानसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष शैलेश लाड यांनी केला आहे.

दरम्यान या कामात आर्थिक अपहार करणार्‍या संबधित ठेकेदाराची व झालेल्या कामाची सखोल चौकशी होवून संबधितांकडून ही रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबत त्यांनी महामार्ग विभागाचे प्रभारी अभियंता एम आर सांळूखे यांच्याशी संपर्क साधत कारवाईची मागणी केली. यावेळी प्रशांत गवस, शैलेश गवस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

[ad_2]

Post Comment